Agripedia

मंडळी'फायटोप्थोरा' व 'कोलेटोट्रीकम' बुरशीची

Updated on 20 July, 2022 7:48 AM IST

मंडळी'फायटोप्थोरा' व 'कोलेटोट्रीकम' बुरशीची लागण मोसंबी च्या नर्सरीमधील झाडांची पाने आकाराने मोठे असल्या कारणाने त्यावर पाणी साचून त्यावर कथ्थ्या रंगाचे डाग म्हणजेच ‘फायटोप्थोरा' या बुरशीची लागण झाल्याचे तसेच 'कोलेटोट्रीकम' या बुरशीचे गोल रिंग असल्याचे आढळून आले आहे. सतत येणाऱ्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे या दोन्ही बुरशीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनात येत आहे.झाडांच्या पानांवर 5 ते 6 तास पाणी राहिल्यास या दोन्ही बुरशीची लागण सर्वप्रथम नर्सरीमधून होते.

परिणामी, पानगळ होऊन त्यातील बुरशीचे कण पाणी व हवेच्या सहाय्याने मोसंबीच्या बागेत व नंतर संत्र्याच्या बागेत पसरून पिकांचे नुकसान करू शकते. या बुरशीमुळे संत्रा व मोसंबीची मोठ्या प्रमाणावर फळगळ होण्याची दाट शक्यता असते. Due to this fungus, there is a high possibility of fruit rot of oranges and mosambi.दोन वर्षापूर्वी संत्रा व मोसंबीच्या बागांमध्ये अशाच प्रकारची फळगळ दिसून आली होती. काही नर्सरीमध्ये नागअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.त्यामुळे मोसंबी व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी वेळीच योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. नर्सरीमधील झाडांची पाने कथ्थ्या रंगाची होणे, पानांवर कथ्थ्या रंगाचे डाग पडणे, पानांच्या कॉर्नरला

कथ्थे डाग पडणे,गोल रिंग होणे म्हणजेच कोलेटोट्रीकम व फायटोप्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाचा परिणाम होय.या बुरशीमुळे मोठ्या प्रमाणात पानगळ होते.उपाययोजनाया बुरशीच्या व्यवस्थापनासाठी एलीएट 20 ते 25 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून किंवा बोरडॅक्स मिक्चर 0.6 टक्के किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्राम किंवा ॲझाक्सस्ट्रोबीन + डायफेनकोनाझोल 90 मिली पाण्यात मिसळून फवारणी करावी.कोलेट्रोक्ट्रीकम बुरशीच्या व्यवस्थापनासाठी थायफोनेट मिथाईल (रोको) 20 ग्राम किंवा कार्बेडाझिम 10 ग्राम (बाव्हीस्टीन) 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नागअळीच्या

व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8 एस.एल. किंवा थायमेथॉक्झाम 25 डब्ल्यू. जी. 3 ग्राम यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी 8 ते 10 दिवसाच्या अंतराने करावी.मोसंबीची फळगळ आढळून येत आहे. ज्या बागेत पूर्व परिपक्व फाळे गळताना दिसून येत आहेत, त्या बागेत शेतकऱ्यांनी मोसंबीच्या झाडास 50 ग्राम फेरस सल्फेट व 50 ग्राम झिंक सल्फेट 5 किलो गांडूळ खतासोबत जमिनीतून द्यावे.सततचा पाऊस व यात खंड पडल्यास किंवा उघाड पडल्यास जिब्रेलिक आम्ल 1.5 ग्राम, कॅल्शीयम नायट्रेट दीड किलो 100 लिटर पाण्यात मिसळून त्याची मोसंबी बागेत उघाडीत फवारणी करावी.

English Summary: This causes leaf drop and fruit drop in Mosambi crop. Follow this simple solution
Published on: 20 July 2022, 07:48 IST