1. कृषीपीडिया

हा व्यवसाय दहा वर्षात नामशेस होईल

त्याचे भविष्य मी आपल्या समोर ठेवतो,पहिले गावात दोन किराणा दुकान होते आता गल्लीत पाच दुकान आहे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले

त्याचे भविष्य मी आपल्या समोर ठेवतो,पहिले गावात दोन किराणा दुकान होते आता गल्लीत पाच दुकान आहे परिणामी ग्राहक कमी झाले, पेट्रोल पंप पंचवीस किलोमीटरवर होता पहिले दहा वर्षापूर्वी आता पाच किलोमीटर वर आहे भविष्यात एक किलोमीटर राहील. रसाचे दुकान प्रत्येक लिंबाच्या झाडाखाली आहे,कापड दुकान,मोबाईल दुकान,हार्डवेअर कुठलही सेल्सचं दुकान त्याच भविष्य हे अंधारात आहे कारण,

   ऑनलाईन शॉपिंग कंपनी आज होलसेल व ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत सेवा देत आहे त्यामुळे येत्या दहा वर्षानंतर हे सर्व व्यवसाय बंद किंवा मंद अवस्थेत आपल्याला दिसतील.

      शेती हा व्यवसाय कधी बंद होत नाही, नैसर्गिक आपत्ती आली तरी त्यातुन सावरण्याची ताकद त्या शेतकऱ्यात आहे शेती हा उत्तम व टिकाऊ व्यवसाय आहे त्याला जगातील कोणतीच कंपनी टक्कर देऊ शकत नाही कि त्याला कॉम्पिटिशन नाही. 

       गरज आहे ती शेतीकडे व्यवसाय दृष्टीने बघण्याची, जगाच्या पाठीवरील सर्वात जास्त व्याप्ती असलेली इंडस्ट्री म्हणुन बघण्याची, दृष्टी बदला दृष्टिकोन बदलेल.

शेतकरी हा उत्तम व्यावसायिक आहे

                           शेती हा खानदानी व्यवसाय आहे,पहिले शेती व्यवसाय हा वरिष्ठ,नोकरी हा कनिष्ठ मानला जायचा,आज ही शेती व्यवसाय वरिष्ठच आहे फक्त कष्ट नको म्हणून नोकरी वरिष्ठ वाटायला लागली,हेच कटु सत्य आहे पण शेती हा व्यवसाय पहिल्या सारखा कष्टाचा नाही राहिला त्यात कमालीचा बदल झाला आहे यांत्रीकीकरणामुळे अनेक काम सोपे झाले आहे.शेती हा व्यवसाय पूर्वी पासून सुरु आहे म्हणुन भारत देश हा सत्तर टक्के कृषी प्रधान आहे.शेती व्यवसाय हा पिढ्यान पिढ्या टिकणारा आहे आज तुम्ही करताय उद्या तुमचे मुलं करतील तो न बंद होणारा व्यवसाय आहे,आज कोणताच शेतकरी जमीन विकायला तयार नाही,असली कोणाची विकाऊ तरी एक पण नोकरीवाला शेती विकत घेऊ शकत नाही अगदी बारा लाख रुपये पॅकेज असेल तरी दोन एकर शेती घेऊ शकत नाही,शेतकरी हा उत्तम,टिकाऊ व्यवसाय आहे,

भविष्यात नोकरी कोणतीच राहणार नाही म्हणून शेतकऱ्याला महत्व येणार आहे,शेतकरी मुलाची किंमत येत्या पाच वर्षात आपल्याला कळेल त्या वेळेस आपल्याकडे पश्चाताप शिल्लक राहील. आज ही कित्येक मुलं ही फक्त लग्न करण्यासाठी कंपनीत कामाला गेली आहे हे लग्न झाले की एक मुलं झालं की घरी येतात मग आपण भामटे होतो. तर काही लोकं मग मुलीची फारकत घेतात आणि समाजात इज्जत घालुन घेतात. त्यापेक्षा आजच शेतकरी मुलगा निवडा तीन एकर,पाच एकर शेती असेल, मुलगा निर्व्यसनी असेल,शेती हंगामी बागायती असेल तरी तो पाच ते सात लाखांचं उत्पन्न काढतो.

जास्त शेती ही कोणाकडे राहिली नाही म्हणून सात एकर,बारा एकर हा विषय सोडुन द्या.गावातुन एक किंवा दोन मुलांना पाच एकर शेती वाट्याला येती जेव्हढी जास्त शेती तेवढेच कष्ट जास्त,खर्च जास्त,नुकसान झाले तर ते जास्त प्रमाणात होते.शेती ह्या व्यवसायात कोणाचा रुबाब ऐकायची गरज नाही,टार्गेट नाही,कोणी आपले मालक नाही,

कॉम्पिटिशन नाही, व्यवसाय कायम स्वरूपी टिकाऊ,शेतात थोडे फार काम केल्यामुळे शरीर मजुबूत राहते, प्रदूषण मुक्त हवा,लॉकडाउन असले तरी पाच किलोमीटर पर्यंत शेतात फिरा,सर्व भाजीपाला,दुध,आपल्याच शेतातील उपलब्ध,घर भाडे नाही,पाणीपट्टी नाही,ग्रामीण भागातील मज्जा जरा वेगळीच आहे,सर्व गाव ओळखीचं.

 

जैसा खायोगे अन्न,वैसा होगा मन', 'विषमुक्त अन्न तणावमुक्त जीवन', शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी'                                            

शहरामध्ये कोण शेजारी राहते हे माहिती नसते. शेतकरी हा परत राजा होणार आहे फक्त पाच वर्ष वेळ आहे म्हणुन शेतकरीच मुलगा निवडा आयुष्याच कल्याण होईल.शेतकरी हा परत राजा होणार आहे कारण त्यांना जे मुलं होतील ते परत शेती करतील कारण त्यांना वरील सांगितल्या प्रमाणे शेती असल्यामुळे रस्त्यावर भीक मागायची वेळ येणार नाही.

English Summary: This business will be extinct in ten years Published on: 11 March 2022, 10:12 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters