खरिपाच्या तुलनेमध्ये उन्हाळी सोयाबीनचे उत्पन्न कमी होते. तसेच दाण्यांचा आकार पिवळसर हिरवट आणि आकार लहान राहतो. खरीप हंगामात बीजोत्पादन कमी झाल्यास किंवा बियाण्याचीप्रत,उगवणशक्ती चांगली नसल्यास आपत्कालीन परिस्थिती मध्ये पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांना उन्हाळी बिजोत्पादन घेता येईल.
जमीन
मध्यम व भारी प्रतीची, उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक. अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन येत नाही. खरिपामध्ये सोयाबीन घेतलेल्या शेतात उन्हाळी सोयाबीन उत्पादन घेऊ नये. घ्यायची वेळ आल्यास पेरणी आधी हलकी पाण्याची पाळी देऊन उगवलेले सोयाबीन झाडे व तने नष्ट करावी.
हवामान
हे पीक सूर्यप्रकाशस संवेदनशील आहे.सोयाबीन पिकासाठी समशीतोष्ण हवामान अनुकूल असते. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये पिकाची कायिक वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्यता असते. सोयाबीन पीक 22 ते 30 अंश सेल्सियस तापमानात चांगली येते. मात्र कमाल तापमान 35 अंश सेल्सियस पेक्षा जास्त झाल्यास फुले व शेंगा गळतात. शेंगांची योग्य वाढ होत नाही. दाण्यांचा आकार कमी होतो.
वाण
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला विकसित वाण- सुवर्णा सोया (एएमएस- एमबी 5-18),पीडीकेव्हीअंबा (एएमएस 100-39) किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विकसित वाण-एमएयुएस 158, एमएयु एस-612 किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी विकसित वाण-केडीएस-726, केडीएस-753किंवा जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय, जबलपूर विकसित वाण-जेएस335, जेएस 93-05 जेएस 20 -29, जेएस20-69, जेएस20-116 वरीलपैकी एखादी वाण खरीप हंगामामध्ये पेरले असल्यास अशा बियाण्यांची उगवण शक्ती तपासून 70 टक्के व अधिक उगवन क्षमतेचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.
बीज प्रक्रिया ( प्रक्रिया- प्रति किलो बियाणे )
करबोक्सिन(37.5%) अधिक थायरम (37.5%डीएस) ( संयुक्त बुरशीनाशक)तीन ग्रॅम किंवा पेनफ्लूफेन(13.28%) अधिक ट्रायफ्लोकसिस्ट्राबीन(13-28%)(संयुक्त बुरशीनाशक)1 मी. ली. किंवाथायोफेनेटमिथाईलअधिकपायरॅक्लोस्ट्राबीन( संयुक्त बुरशीनाशक)2.5 ग्राम ते 3 ग्राम
- रोपावस्थेत खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी,थायमेथॉक्झाम (30 एफ एस ) 10 मिली त्यानंतर नत्र उपलब्धता करून देणारे जिवाणू संवर्धक ब्रेडीरायझोबियम जापोनिकम 25 ग्रॅम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रक्रिया करावी.
पेरणीची वेळ व पद्धत
उन्हाळी हंगामासाठी डिसेंबर अखेर ते जानेवारी पहिला पंधरवड्यापर्यंत पेरणी करावी. पेरणीस त्यापेक्षा उशीर झाल्यास पीक फुलोऱ्यात असताना व दाणे भरण्याच्या अवस्थेत ( म्हणजे मार्च एप्रिल महिन्यात )जास्त तापमानामुळे फुले व शेंगा गळ होते. दाण्यांचा आकार लहान राहतो.उत्पादनात घट होऊ शकते. जर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पेरणी थोडी लांबवूनतापमान 15 अंश सेल्सिअस झाल्यावर करावे. पेरणी 45×10 से.मी. व चार से.मी.खोलीवर करावी. पेरणीच्या वेळी बियाणे जास्त खोलीवर पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही. उन्हाळी हंगामामध्ये पिकाची पाण्याची गरज लक्षात घेता, पेरणी बीबीएफपद्धतीने किंवा पट्टा पद्धतीने किंवा तीन ओळीनंतर एक ओळ रिकामी ठेवून पेरणी करावी.त्यामुळे पाणी देणे सोयीचे होईल ओलावा टिकून राहील.
खत व्यवस्थापन
पेरणी करतेवेळी हेक्टरी 30 किलो नत्र 60 किलो स्फुरद 30 किलो पालाश(म्हणजेच हेक्टरी 65 किलो युरिया,375 किलो सिंगल सुपर फास्फेट व 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश)द्यावे खत व्यवस्थापना साठी शक्यतो सरळ खते द्यावीत. मात्र शक्य नसल्यास मिश्र खत देतेवेळी 20 किलो गंधक प्रति हेक्टर पेरणी वेळी द्यावे. पेरणीनंतर 15 व 70 दिवसांनी युरिया 2 टक्के ( 20 ग्रॅम प्रति लिटर पाणी ) फवारणी करावी किंवा शेंगा भरतेवेळी 19:19:19 ची 2% ( 20 ग्रॅम प्रति लिटर पाणी ) फवारणी करावी किंवा प्रमाणे फवारणी करावी.
कीड व रोगाचे व्यवस्थापन
उन्हाळी सोयाबीन पिकामध्ये यलो मोझक चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. तो येऊ नये यासाठी रस शोषक किडी उदा. पांढरी माशी,मावा, तुडतुडे यांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. त्यांना आटोक्यात ठेवण्यासाठी उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी पिवळे चिकट सापळे 15×30 सेमी आकाराचे किंवा तत्सम आकाराचे हेक्टरी किमान 160 प्रमाणे लावावेत.
- पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी निंबोळी अर्क(5 टक्के)किंवाॲझाडीरॅक्टिन(1000 पीपीएम )2 ते 3 प्रति लिटर फवारणी करावी.
- खोडमाशी, उंट आळी व तंबाखूची पाने खाणारी अळी व्यवस्थापन, फवारणी प्रति लिटर पाणी इंडोक्साकार्ब(15.8 इसी)0.67 मि.ली ( लेबल क्लेम )
आंतर मशागत
पीक 20 ते 25 दिवसांचे असताना दोन कोळपण्या( 15 ते 20 दिवसांनी पहिली व 30 ते 35 दिवसांनी दुसरी ) व एक निंदणी करून शेत तणविरहित ठेवावे.
पाण्याचे नियोजन
पेरणी अगोदर तुषार सिंचनाने पाणी देऊन पेरणी करावी. थंडीमुळे तापमान कमी असेल तर पूर्णत ;उगवणीसाठी दहा ते बारा दिवस लागू शकतात.चांगल्या उगवणीसाठी पेरणीनंतर 5 दिवसांनी पुन्हा तुषार सिंचनाने
- हलके पाणी द्यावे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने, तर मार्च एप्रिल महिन्यात परिस्थितीनुसार आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. पिक पेरणी व काढणीदरम्यान जमिनीच्या मगदुराप्रमाणे आठ ते दहा पाणी पाळ्याची आवश्यकता असते. विशेषत ; पीक फुलोरा अवस्थेत तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसू देऊ नये.
भेसळ काढणे
बिजोत्पादनाकरिता घेतलेल्या वाण्याची गुणधर्माशी न जुळणारी झाडे व रोगग्रस्त झाडे उपटून टाकावीत बीजोत्पादनात क्षेत्रातील पिकाच्या निरनिराळ्या वस्तीत अवस्थेत उदा.वाढीची अवस्था फुलोरा,शेंगा भरण्याच्या वेळी झाडाचे निरीक्षणकरून वेगळ्या गुणधर्मांची झाडे (उदा. फुलाचारंग,खोड व फांद्या वरील लव,शेंगा चा रंग व केसाळपणा, वाडी चा प्रकारइ.)वेळावेळी उपटून काढावी.
काढणी व मळणी
बीजोत्पादन क्षेत्रांमध्ये पीक कापणी चा दहा ते पंधरा अगोदर बुरशीनाशकाची उदा. कार्बेन्डाझिम 1 ग्रॅमपत्र लिटर प्राणी याप्रमाणे फवारणी करावी. कापणीच्या वेळी पाऊस आल्यास बियाण्यास बुरशीच्या प्रादुर्भाव पासून संरक्षण मिळेल. शेंगापिवळा पडून पक्व होताच पिकाची काढणी करावी. कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण15-27 % असावी. मळणी यंत्राच्याड्रमची गती 350-400फेरे प्रति मिनिट या दरम्यान असावी.
बियाणे साठवणूक
मळणीनंतर बियाणे ताडपत्री किंवा सिमेंट सपाट केलेले पृष्ठभागावर पातळ पसरावे बियाण्यातील अर्दतेचे प्रमाण दहा ते बारा टक्क्यांपर्यंत आणावे.नंतर बियाणे पोत्यात भरून लाकडी फळ्यावर ठेवावेत. जास्तीत जास्त पाच पोत्यांची थप्पी मारावी. बियाणाचे पोते साठवण्याच्या जागेवर चारही बाजूंनी हवा खेळती राहील.याचे नियोजन करावे. बियाणे साठवणूक करण्याचे ठिकाण थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. मात्र त्यासाठी वॉटर कुलरच्या वापर करू नये. कुलर मुळे बियाण्यातील आर्द्रता वाढून बियाणे खराब होऊ शकते. उन्हाळी सोयाबीनचे एकरी तीन ते चार क्विंटल पर्यंत सरासरी उत्पादन येऊ शकते.
Published on: 04 February 2022, 08:03 IST