कुठलीही पीक घेताना त्याची लागवड पद्धत हे फार महत्वाचे असते. कारण योग्य तंत्रज्ञान आला धरून लागवड केली तर त्याचा परिणाम नक्कीच उत्पादन वाढीवर होतो. याप्रमाणेच कांद्याची लागवड करताना योग्य काळजी घेतली गेली तर पीक जोमात वाढून शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
कांद्याचे उत्पादन चांगले हवे असेल तर शेतकऱ्यांनी योग्य लागवड पद्धत व सुव्यवस्थित नियोजन करून लागवड करणे गरजेचे असते. कांदा लागवड च्या बाबतीत कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी हा सल्ला आला तर शेतकरी कांदा पिकामध्ये लाखो रुपयांची उत्पादन घेऊ शकतात. नेमका कृषी तज्ञांचा सल्ला काय आहे? याबाबतीत या लेखात आपण माहिती घेणार आहोत.
कांद्याची लागवड पद्धत
- कांदा लागवड करताना शक्यतो कांदारोपांचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही रोपे 6 आठवड्यांपेक्षा जास्त जुनी नसावीत.
- कांदा रोपांची लागवड करण्यापूर्वी 10 ते 15 दिवस अगोदर एकरी 20 ते 25 टन शेणखत टाकने गरजेचे आहे. त्यानंतर लहान वाफेसोडावेत कारण त्याचा फायदा असा होतो की कांदा पिकाला खत आणि पाणी सुरळीत पोहोचू शकेल व कांदा पीक वाढीला जास्त वेळ लागणार नाही.
- कांद्याचे पुनर्लागवड करताना रोपांची लागवड जास्त खोलवर करू नये. मशागत करताना लागवडीच्या क्षेत्रात 20 किलो नायट्रोजन, 60 ते 70 किलो फॉस्फरस आणि 80 ते 100 किलो पोटॅश द्यावे.
- दोन ओळींतील अंतर 15 सेंटिमीटर ठेवावे व रोपांच्या अंतर दहा सेंटिमीटर ठेवले पाहिजे.यामुळे उत्पादनात भर पडते.
सध्या कोणत्याही प्रकारची फवारणी करू नका……
भारतीय कृषी संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी ही बदलत्या वातावरणाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. सद्य परिस्थितीत कांदा लागवडीचे कामे चांगली चालू आहेत. सध्या कुठल्याही प्रकारची फवारणी करू नका असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
Published on: 31 January 2022, 06:35 IST