Agripedia

महाराष्ट्र व भारतभर जे शेवगा प्रसिद्ध वाण आहेत, त्यातील नामवंत व जास्तीत जास्त शेंगा देणाऱ्या निवडक वाणाची माहिती या लेखात आहे.

Updated on 06 January, 2022 4:03 PM IST

महाराष्ट्र व भारतभर जे शेवगा प्रसिद्ध वाण आहेत, त्यातील नामवंत व जास्तीत जास्त शेंगा देणाऱ्या निवडक वाणाची माहिती या लेखात आहे.

आपण बांधावर, बंगल्यात परसदारी किंवा स्वतंत्रशेवगा शेती लावा. अगर फळबागेत अंतर पीक म्हणतलावा, या शेवगा वाणाची खासियत व वैशिष्टय़ेलक्षात घ्या. त्या प्रमाणे वाणाची निवड करा.शेवगा शेती ही रोप लागवडीपासून केवळ सहा महिन्यात उत्पादन देते. ते १० वर्षे शेंगा देते.वाणातील पी. के. एम २ या वाणाची बंगल्यात, परसात,बांधावर १० झाडे लावून दरसाल ५००० ते ६०० रुपये मिळवणारी मंडळी आहेत.

वाण व त्यांची वैशिष्टय़े-

१) जाफना-

हा शेवगा वाण स्थानिक व लोकल आहे.

देशी शेवगा म्हणून ओळखतात.या वाणाच्या शेंगा चवदार असतात. या वाणाचे वैशिष्टय़ एका देठावर एकच शेंग येते. ती २० ते ३०सें.मी. लांब असते. या वाणाला वर्षांतून एक वेळम्हणजे फेब्रुवारीत फुले लागतात. मार्च, एप्रिल, मेमध्ये शेंगा मिळतात. एक किलोत २० ते २२शेंगा बसतात. दर झाडी एक हंगामात १५० ते २००शेंगा मिळतात. चवीला चांगली. बी मोठे होतात.

२) कोकण रुचिरा - हा वाण कोकण कृषी विद्यापीठानेविकसित केला आहे. कोकणासाठी शिफारस केला आहे.झाडाची उंची ५ ते १६ मीटर. या एका झाडाला १५ ते १७फांद्या उपफांद्या येतात. शेंगा गर्दहिरव्या रंगाचे असतात. या वाणाचे उत्पादनओलीताखाली सर्वोत्तम येते. शेंगा या एका देठावरएकच लागते. या वाणाला एकाच हंगामात शेंगा येतात.साइज मध्यम त्यामुळे वजन कमी भरते. दरझाडी पी.के.एम. २ या वाणाचे तुलनेत ४० टक्केउत्पन्न मिळते.

३) पी. के. एम. १- हा वाण तामीळनाडूकृषी विद्यापीठाचे पेरीया कुलम फळबाग संशोधनकेंद्राने विकसित केला आहे. हा वाण चवदार आहे.या वाणात खालील अनेक वैशिष्टय़े आहेत. १) रोपलावणी नंतर ६ महिन्यात शेंगा सुरू होतात. २) शेंगा ४० ते ४५ सें. मी. लांब असतात. ३)या वाणाला महाराष्ट्र वातावरणात वर्षांतून दोनवेळा शेंगा येतात. ४) शेंगा वजनदार व चविष्ट, मात्रबी मोठे होत नाही. ५) या वाणाची झाडे ४.५ ते ५ मीटरउंच होतात. ६) दोन्ही हंगामात मिळून ६५० ते ८५०शेंगा ओलीताखाली मिळतात.४) पी. के. एम. २ - हा वाण देखील तामिळनाडूकृषी विद्यापीठाने विकसीत केला आहे. हा वाण आजमहाराष्ट्रातील स्वतंत्र शेवगा शेतीत तसेच अंतरपीक शेवगा शेतीत आहे. १)शेवगा शेतीतली खरी क्रांती या वाणानेच केली आहे.२) भारतात आज ज्ञात असलेल्या सर्व शेवगा वाणात वाण विक्रमी उत्पादन देतो. दोन हंगामातओलीता खाली व छाटणी आणि खत व्यवस्थापन उत्तमठेवल्यास ८०० ते ११०० शेंगा दर झाडी मिळतात. ३)या वाणाचे शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. ४) सर्ववाणात लांब शेंगा असणारा हा वाण आहे. शेंगा ७० ते८० सें. मि. लांब येतात. ५) लांब शेंगा वजनदारशेंगा यामुळे बाजारभाव सर्वोत्तम व सर्वातजादा मिळतो. ६) एका झाडाला एकाच हंगामात २१९०शंगा मिळवण्याचा विक्रम या वाणाने केला.

 ८) बेनऑइलसाठी व पाणी शुद्ध करण्यासाठी याचवाणाला प्राधान्य दिले जाते.९) सध्या याच वाणाची परदेशी निर्यात केली जाते.थोडक्यात, पी.के.एम.२ हा वाण लावणे, वाढवणे,जोपासणे योग्य आहे. महत्त्वाचे आहे.या वरील वाणाखेरीज शेवगा पिकाचे महाराष्ट्रातखालील वाण आढळतात. मात्र ८० ते ८२ टक्के लागवडही पी.के.एम. २ ची आहे.१) दत्त शेवगा कोल्हापूर, २) शबनम शेवगा, ३)जी.के.व्ही.के. १ व जी.के.व्ही ३, ४) चेन मुरिंगा, ५)चावा काचेरी. मात्र जादा उत्पादन २ वेळ हंगाम व चवआणि लांबी या दृष्टीने पी.के.एम. २ सर्वश्रेष्ठआहे.

English Summary: These varieties of Shevaga crop should be planted.
Published on: 06 January 2022, 04:03 IST