Agripedia

वीज पडून मृत्यू झाल्याच्या बातम्या वारंवार कानावर येतात.

Updated on 04 February, 2022 7:41 PM IST

वीज पडून मृत्यू झाल्याच्या बातम्या वारंवार कानावर येतात.

दरवर्षी अनेक शेतकरी आणि जनावरं यांना वीज पडल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. झाडं, इमारती यांचंही नुकसान होतं.

त्यामुळे वीज अंगावर पडू नये, यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर काळजी घेणं गरजेचं असतं.

आता आपण वीज अंगावर पडणार, हे आपल्या लक्षात कसं येऊ शकतं, वीज अंगावर पडू नये यासाठी काय करावं आणि काय करू नये, तसंच एखाद्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्यानंतर आपण काय प्रथमोपचार करू शकतो, याची माहिती जाणून घेणार आहोत.

वीज अंगावर पडू नये म्हणून.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो अर्थात एनसीआरबीची आकडेवारी पाहिल्यास भारतात 2017 मध्ये 2885, 2018 मध्ये 2357 आणि 2019मध्ये 2,876 इतक्या जणांचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाला आहे.

वीजेमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षात घेता भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं एक पत्रक जारी केलं आहे.

त्यात वीजेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याची माहिती दिली आहे.

सुरुवातीला तुम्ही घराबाहेर असाल तर काय करायचं आणि काय करायचं नाही हे पाहूया.

1.विजा चमकत असताना जर बाहेर असाल, तर लगेच सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्‍या. बंदिस्त इमारत, गुहा, खड्डा हा सुरक्षित आसरा होऊ शकतो.

2.सुरक्षित आश्रय उपलब्‍ध झाला नाही, तर उंचीच्‍या जागांखाली आश्रय घेणं टाळा. जसं की टेकडी, पर्वत यांच्याखाली आश्रय घेऊ नका.

3.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजा चमकत असतांना मोठ्या झाडाखाली आश्रय घेणं टाळावं. कारण उंच झाडे स्वत:ला वीजेकडे आकर्षित करतात.

4.पण जर तुम्ही शेतात काम करत असाल आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यायला तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन्‍ही पाय गुडघ्‍याजवळ घेउन खाली बसा आणि कानावर हात ठेवा. तुमचा जमिनीशी कमीतकमी संपर्क येईल, याची खात्री करून घ्या.

5.कार्यालयं, दुकानं, यांची दारं-खिडक्या बंद करा. गाडीत असाल तर काचा बंद करा.

विजा चमकत असतांना तुम्हाला विद्युत प्रभार जाणवल्यास, अंगावरील केस उभे राहिल्यास, त्‍वचेला मुंग्‍या किंवा झिणझिण्‍या आल्यास, तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता असते. अशावेळी त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.

धातुंच्‍या वस्‍तू जसे छत्री, चाकू, भांडे यापासून दूर राहा.

धरणं, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासून लांब राहा.

टेलिफोन किंवा वीजेच्या खांबांखाली थांबू नका. ते विजेला आकर्षित करतात.

6.विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर कधीच करू नका.

7लोखंडी रॉड असलेली छत्री वापरू नका.

जर तुम्ही चार ते पाच जण एका ठिकाणी असाल तर एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

8.सायकल, मोटरसायकल, उघडा ट्रॅक्टर किंवा घोडा यांच्यावरील प्रवास थांबवा.

घरात असल्यास घ्यायची खबरदारी

आता तुम्ही घरात असाल तर काय करायचं आणि काय नाही हे पाहूया.

1.हवामान खराब असल्यास शेतातल्या कामांसाठी (जनावरांना चारणे, मासेमारीसाठी) बाहेर पडू नका. घरातचं थांबा आणि प्रवास टाळा.

2.घराच्या खिडक्या, दारं यापासून लांब राहा. धातूच्या वस्तूंचा वापर करू नका.

3.विजा चमकत असताना हेयरड्रायर, विद्युत टुथब्रश, विद्युत रेझरसारखी विद्युत उपकरणे चालू करू नका. कारण जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली तर तुम्हाला वीजेचा धक्का बसू शकतो.

टेलिफोनचा वापर टाळा. वीज टेलिफोनच्या घरांवरील तारांमधून वाहू शकते.

4.मुलं आणि पाळीव प्राणी घरात असतील याची खात्री करून घ्या.

5.वाहत्या पाण्याशी संबंध येईल अशी कोणतीही गोष्ट करू नका. उदाहरणार्थ- आंघोळ, भांडी धुणं वगैरे. कारण वीजेचा प्रभार हा इमारतीच्या प्लंबिंग आणि धातूच्या पाईप्समधून वाहू शकतो.

6.इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर टाळा.

वीज पडल्यानंतर काय करायचं?

एखाद्या व्यक्तीवर वीज पडल्यास तुम्ही त्याच्यावर प्रथमोपचार करू शकता. यामुळे तुम्ही त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता आणि वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श करू शकता. असा स्पर्श करणं सुरक्षित असतं.

यासाठी.

1.बाधित व्यक्तीचा श्वास सुरू आहे ना, हृदयाचे ठोके पडताहेत ना ते अगोदर तपासून पाहा.

2.जर व्यक्तीचा श्वासोच्छवास थांबला असेल, तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्या.

हृदयाचे ठोके थांबले असल्यास कार्डिआक कॉम्प्रेशनचा वापर करा.

3.अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा किंवा इतर काही जखमा आहेत का ते तपासून पाहा.

4.गरज पडल्यास संबंधिताला दवाखान्यात घेऊन जा.

1078 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून 

तुमच्यापर्यंत कसं पोहोचता येईल याची अचूक माहिती द्या. शक्य असल्याल बाधिताला दवाखान्यात घेऊन जा.         

English Summary: These things should be taken care of so that the electricity does not fall on the body
Published on: 04 February 2022, 07:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)