कांदा एक नगदी पीक म्हणून ओळखले जाते, या पिकाची लागवड संपूर्ण भारतवर्षात केली जाते. महाराष्ट्र राज्यात देखील पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण इत्यादी विभागात याची लागवड नजरेस पडते. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा विशेषता कळवण सटाणा मालेगाव देवळा अर्थात कसमादे पट्टा किंवा मौसम खोरे कांदा लागवडीसाठी विशेष ओळखला जाते.
जिल्ह्याला जरी द्राक्षे पंढरी म्हणून जगात ओळख प्राप्त झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात घेतले जाणारे प्रचंड कांद्याच उत्पादन बघता याला कांद्याचे आगार म्हणुन देखील ओळखले जाते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जात असल्याने जिल्ह्यातील लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ उभारण्यात आली आहे. कांदा हे नगदी पिक अल्पकालावधीत उत्पादणासाठी तयार होत असल्यान या पिकाची पूर्वमशागतिपासून ते काढणी करण्यापर्यंत विशेष काळजी घेणे अपरिहार्य ठरणार आहे. योग्य पद्धतीने पूर्वमशागत करून, शेतात कांद्याच्या जोमात वाढीसाठी चांगल्या दर्जाचे कुजलेले शेणखत टाकण्याचा सल्ला दिला जातो. कृषी वैज्ञानिकांच्या मते, कांद्याचे सुधारित वानांचे बियाणे रोपनिर्मितीसाठी वापर केला गेला पाहिजे. रोपवाटिकेत रोपांची पूर्ण वाढ झाली असता लागलीच कांद्याची पुनर्लागवड करणे महत्त्वाचे ठरते. साधारणत दीड महिन्यात कांद्याची रोपे लागवडीसाठी तयार होत असतात. यापेक्षा जास्त कालावधीची वाढलेली रोपे लागवडीसाठी वापरू नयेत.
पुनर्लागवड करताना अत्याधुनिक यंत्रांचा वापर केल्यास कांद्याच्या उत्पादनात मोठी वाढ होते तसेच उत्पादन खर्चात मोठी कपात होत असल्याचे सांगितले जाते. कांदा लागवड झाल्यानंतर कांद्याच्या पिकासाठी पाणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. तसेच कांद्याच्या पिकात किडींचा प्रादुर्भाव झाल्यास एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा उपयोग करून किड व रोग यावर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे ठरेल. आज आपण कांद्याच्या सुधारित जाती विषयी जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कांद्याच्या काही सुधारित जाती ज्यांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते.
खरीप हंगामात लागवड केल्या जाऊ शकणाऱ्या कांद्याच्या जाती- आर्को ललिमा, बसंत, ऍग्रीफाउंड डार्क, अरका पितांबर इत्यादी जातींची खरीप हंगामात लागवड केली जाऊ शकते. यापैकी कुठल्याही जातीचे खरीप हंगामात लागवड करून शेतकरी बांधव चांगले उत्पादन अर्जित करू शकतात.
रब्बी हंगामात लागवड केल्या जाऊ शकणाऱ्या कांद्याच्या जाती - ॲग्री फाउंड लाईट रेड, ऍग्री फाउंड डार्क रेड,अर्का कल्याण, अर्का निकेतन, उसा साध्वी, बसंत, पूना रेड, भीमा सुपर, नासिक रेड,पुसा रेड इत्यादी जातींची रब्बी हंगामात लागवड करून शेतकरी बांधव चांगले उत्पादन अर्जित करू शकतात. याव्यतिरिक्त देखील अनेक कांद्याच्या जाती बाजारात उपलब्ध आहेत, आपण कृषी तज्ञांच्या सल्ल्याने त्यापैकी देखील एका जातीची लागवड करून चांगली कमाई करू शकता.
Published on: 02 February 2022, 08:33 IST