पहिले तालुक्यात २ च जेसीबी होते ,आता प्रत्येक गावात गल्लीत कितीतरी जेसीबी व पोकलेन आहेत. परिणामी ग्राहक कमी झाले,किंमती वाढल्या डिझेलचा दर एवढा वाढला कि नफा कमी झाला..परिणाम धंदा बंद पडला पेट्रोल पंप पंचवीस किलोमीटरवर होता.आता पाच किलोमीटर वर
आहे.भविष्यात एक किलोमीटर राहील.रसाचे दुकान प्रत्येक लिंबाच्या झाडाखाली आहे,A juice shop is under every lemon treeकापड दुकान,मोबाईल दुकान,हार्डवेअर कुठलही सेल्सचं दुकान त्याच भविष्य हे अंधारात आहे.कारण ऑनलाईन शॉपिंग कंपनी आज होलसेल व
ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत सेवा देत आहे.. त्यामुळे येत्या दहा वर्षानंतर हे सर्व व्यवसाय बंद किंवा मंद अवस्थेत आपल्याला दिसतील.शेती हा व्यवसाय कधी बंद होत नाही, नैसर्गिक आपत्ती आली तरी त्यातुन सावरण्याची ताकद त्या शेतकऱ्यात आहे शेती हा उत्तम व टिकाऊ व्यवसाय
आहे... त्याला जगातील कोणतीच कंपनी टक्कर देऊ शकत नाही... कि त्याला कॉम्पिटिशन नाहीगरज आहे ती शेतीकडे व्यवसाय दृष्टीने बघण्याची,जगाच्या पाठीवरील सर्वात जास्त व्याप्ती असलेली इंडस्ट्री म्हणुन बघण्याची, दृष्टी बदला दृष्टिकोन बदलेल.
Published on: 03 September 2022, 02:32 IST