उदाहरणार्थ, इक्रीसॅट या संस्थेने कमी पाण्यात सहा ते सात महिन्यांत तयार होणाऱ्या ज्वारीच्या वाणाचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. शेतीविषयक संशोधनातून कमी पाण्यात वाढणारी पिके शोधण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, इक्रीसॅट या संस्थेने कमी पाण्यात सहा ते सात महिन्यांत तयार होणाऱ्या ज्वारीच्या वाणाचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. पंजाब आणि हरियाणा या राज्यांत तो निवडला तर ज्वारीचे हेक्टरी १० टन उत्पादन मिळेल.
शिवाय पाण्याच्या वापरात प्रचंड बचत होईल. खरीप हंगामानंतर गव्हाचा पेरा करण्यासाठी भाताचा पेंढा जाळून शेते मोकळी केली जातात, त्यामुळे तिथे जे प्रदुषण होते, ते थांबेल. तसेच ज्वारीचा कडबा दुभत्या जनावरांसाठी चांगला चारा असल्यामुळे दुधाच्या उत्पादन व्यवसायाला चालना मिळेल. ज्वारीची काढणी झाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतात कमी पाण्यावर येणारी कडधान्ये किंवा तेलबिया यांचे एक पीक घेऊ शकतील. ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल. मात्र हे लाभ प्रत्यक्षात आणायचे असतील, तर आपल्या जेवणात व पर्यायाने शेतात घ्यावयाच्या पिकात ज्वारीला प्राधान्यक्रम दिला पाहिजे._
_एक किलो साखरेचे उत्पादन करण्यासाठी किती पाणी लागते, याचा शास्त्रशुद्ध हिशेब मांडला तर उत्तर येते की, महाराष्ट्रात यासाठी जेवढे पाणी खर्च होते तेवढय़ा पाण्यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये ३.२५ किलो साखरेचे उत्पादन होते. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये स्थलांतर करणे देशाच्या विकासाच्या प्रक्रियेसाठी लाभदायक ठरणारे आहे, असे विज्ञान तंत्रज्ञान सांगते. महाराष्ट्रात उसासाठी ठिबक सिंचन संच वापरले तरी एक हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक घेण्यासाठी ३३ हजार घनमीटर पाणी लागते. परंतु उसाऐवजी ज्वारीचे पीक घ्यायचे ठरवले, तर पाण्याची गरज चार हजार घनमीटर एवढी कमी होते.
त्यामुळे महाराष्ट्रातील उसाची शेती बंद झाली तर राज्यातील धरणे व बंधारे यातील सुमारे साठ हजार दशलक्ष घनमीटर पाणी इतर पिकांसाठी उपलब्ध होईल. तसे झाले की ज्वारी, बाजरी, कडधान्ये व तेलबिया या अशा पिकांच्या उत्पादकतेत दुपटीने वाढ होईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल व शेतकरी कर्जबाजारी होणार नाही.थोडक्यात आपल्या देशात पाण्याची टंचाई आहे, हे लक्षात घेऊन कमी पाण्यात घेता येणाऱ्या पिकांची निवड करणे आवश्यक आहे. पाण्याची बचत करण्यासाठी योग्य पिकांची निवड हाच शास्त्रीयदृष्टय़ा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
office@mavipamumbai.org
प्रसारक : दिपक तरवडे
संकलक : प्रविण सरवदे, कराड
Published on: 05 May 2022, 06:34 IST