Agripedia

प्रत्येक वनस्पतीला आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. हे अन्नद्रव्य वनस्पतीला वाढीस आणि वनस्पतींच्या विकासाच्या प्रत्येक अवस्थेत खूप महत्वपुर्ण भूमिका असते. वनस्पतीला जीवनक्रम पुर्ण करण्यासाठी १७ प्रमुख अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.

Updated on 26 July, 2020 3:51 PM IST

प्रत्येक वनस्पतीला आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.  हे अन्नद्रव्य वनस्पतीला वाढीस आणि वनस्पतींच्या विकासाच्या प्रत्येक अवस्थेत खूप महत्वपुर्ण भूमिका असते.  वनस्पतीला जीवनक्रम  पुर्ण करण्यासाठी १७ प्रमुख अन्नद्रव्यांची आवश्यकता असते

त्यापैकी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, सल्फर, मॅग्नेशियम, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन अन्नद्रव्ये वनस्पतीला मोठ्या प्रमाणात लागतात. त्यामुळे त्यांना मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतात तर लोह, बोरान, क्लोरीन, मॅगनिज, जास्त, तांबे, मॉलिब्डेनम, निकेल हे वनस्पतीला खूप कमी प्रमाणात लागतात त्यामुळे त्यांना मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतात. बऱ्याच शेतकऱ्यांना  अन्नद्रव्य बद्दल माहिती नसते. या लेखाच्या माध्यमातून आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आपल्या पिकात असल्यास कोणती लक्षणे जाणवतात व त्यावर आपण कोणत्या उपाययोजना कराव्या याबद्दल माहिती घेणार आहोत.

नत्र

नत्र हे वनस्पतीच्या वाढ व विकासाकरता सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे.  नत्र हे प्रकाश संश्‍लेषणमध्ये सामील असलेल्या सर्व प्रथिने,  एंजाइम चयापचय प्रक्रियेचा भाग आहे.  पिकाच्या जलद वाढीमध्ये  नत्राची खूप आवश्यकता असते.

नत्राची कमतरता पिकांमध्ये असल्यास पुढील पैकी लक्षणे आढळून येतात

१)पिकाचे जमिनीलगतचे म्हणजे परिपक्व पाने पिवळी होतात.

२) मुळाची वाढ खुंटते त्याबरोबर झाडाची वाढ खुंटते.

उपाय :

नत्रयुक्त खताचा वापर करावा

स्फुरद

 नत्राप्रमाणेच स्फुरद प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. स्फुरद सौरऊर्जेचे रासायनिक उर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करते.

 स्फुरदाची कमतरता असल्यास वनस्पती पुढील लक्षणे जाणवतात

१) पिकांची पाने गर्द हिरवी जांभळी आढळून येतात.

२) मुळाची वाढ मंदावते.

उपाय :

आवश्यकतेनुसार स्फुरदयुक्त खते उदाहरणार्थ एस. एस. पी द्यावे.

पालाश

पालाश पिकांना प्रकाश संश्लेषण, प्रथिने संश्लेषण,   फळाची योग्य वाढ, रोगप्रतिकारक शक्ती वाढवने इत्यादी प्रक्रियांमध्ये उपयोगी आहे. पालाश पिकास पाण्याचा ताण सहन करण्यास मदत करते.

 पालाशची कमतरता असल्यास पुढील लक्षणे आढळतात

१)पानाच्या कडा तांबडसर आढळून येणे.

२)पानांवर तांबडे व पिवळे ठिपके आढळणे.

 उपाय:

 योग्य मात्रेमध्ये पालाशयुक्त खते उदाहरणार्थ म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.

गंधक

गळीत धान्य पिकांसाठी गंधक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. गंधक वनस्पतीमध्ये वाढीसाठी आवश्यक असणारी एंझाईम तयार करण्यास मदत करतो.

गंधकाची कमतरता असल्यास पिकांमध्ये पुढील लक्षणे आढळतात

१) संपूर्ण वनस्पतीमध्ये पिवळे फिकट गुलाबी, हिरव्या रंगाचे पाने दिसून येतात.

 २) नवीन येणारी पाने व कोवळी पालवी पिवळसर दिसू लागते.

 उपाय :

३० ते ४० किलो प्रति हेक्‍टरी द्यावे जिप्सम  टाकावे.

लोह

 पिकांमध्ये प्रकाशसंश्‍लेषण क्रियेत आवश्यक असते.

कमतरतेची लक्षणे

१)  नवीन येणाऱ्या पानांच्या शिरा पिवळ्या दिसू लागतात.

२) झाडांची वाढ खुंटलेली दिसते.

 उपाय: ०.५  टक्के फेरस अमोनिअम सल्फेटची फवारणी करावी.

 

बोरॉन

बोरॉन वनस्पती मध्ये खूप महत्त्वपूर्ण कार्य करतात जसे की परागकण उगवण, पेशीविभाजन, प्रथिने, कर्बोदके, कॅल्शिअम व पाण्याच्या चयापचय क्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

कमतरतेची लक्षणे

१)  नवीन पालवीचा रंग देठाच्या बाजूला फिक्कट पिवळसर दिसू लागतो.

२)  नवीन पालवी देठाच्या बाजूला जळू लागते.

३)  नवीन पाने जळतात.

उपाय:

प्रति हेक्‍टरी दोन ते तीन किलो बोरॅक्‍स जमिनीतून द्यावा.

तांबे

तांबे वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्‍लेषण यासाठी महत्त्वपूर्ण घटक आहे.

 कमतरतेची लक्षणे:

पिकाच्या शेंड्याची खोडाची वाढ खुंटून लगेच पाने  गळून पडतात.

 उपाय:

०.४ टक्के  मोरचूद द्रावण फवारावे.

मॅगनीज

 वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण मध्ये फार महत्वाचा घटक आहे.

कमतरतेची लक्षणे:

१) पिकांमधील पानांच्या शिरा हिरव्या राहतात व क्रमाक्रमाने शिरांमधील भाग पिवळा व नंतर पांढरा करडा दिसून येतो.

२) पानांची वाढ कमी दिसते.

मॉलिब्डेनम

 

वनस्पतीमध्ये आवश्‍यक अमायनो ऍसिड तयार करण्यास मदत करते.

 कमतरतेची लक्षणे:

 १)पाने फिकट पिवळी , फिकट हिरवी दिसून येतात. २)पानांच्या खालच्या भागातून रेझीनयुक्त पदार्थ स्त्रवतो.

जस्त

 वनस्पतीमध्ये उपयुक्त एन्झाईम तयार करण्यासाठी जास्त उपयोगी आहे.

 कमतरतेची लक्षणे:

 पानांच्या आकारमान कमी आढळून येते शिरांमधील भागांमध्ये  तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात व शेवटी पिवळी पडतात.

 उपाय:

०.५ टक्के फेरस अमोनिअम सल्फेटची फवारणी करावी.

सिलिकॉन

वनस्पतींमध्ये पेशी भिंती  मजबूत करण्यासाठी, वनस्पतीचे आरोग्य, उत्पादकता वाढवणे, दुष्काळामध्ये ताण सहन करणे इत्यादी कार्य करत असते.

 

लेखक  -

महेश देवानंद गडाख

Msc ( Agri)

maheshgadakh96@gmail.com

सागर समाधान खोंडे

Msc ( Agri)

अमोल ज्ञानेश्वर सुराशे

Msc ( Agri)

8380030989

English Summary: These are the symptoms of nutrient deficiency in crops, find out the reasons
Published on: 26 July 2020, 03:48 IST