Agripedia

शेती व्यवसायामध्ये पहिल्या पासूनच माहिती विस्ताराची अगदी मोठे जाळे आहे.

Updated on 10 October, 2022 8:52 PM IST

शेती व्यवसायामध्ये पहिल्या पासूनच माहिती विस्ताराची अगदी मोठे जाळे आहे. आणि त्याचा फायदा घेऊन तथाकथित कृषी अभ्यासक आणि सल्लागार यांचे पीक जोमात आले आहे याऊलट काही प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कृषी अभ्यासक आणि सल्लागार यांच्या मुळेच चांगली शेती होत आहे त्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे. 

अर्धवट शिकलेले आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना काहीच्या काही सल्ला झाडणारे,Half-educated and giving some advice to farmers only for their own benefit, शेतकरी मित्रांचा खर्च भरमसाठ वाढविणारे

तुमच्या शेतातील कांदा पात पिवळी पडणे, कांदा सडणे असे होत आहे? तर मग करा हे उपाय

 यांना आता शेती क्षेत्रामधील आधुनिक भोंदू बाबाचं म्हणण योग्य ठरणार आहे.यांच्या प्रतापामुळे अनेक आधुनिक अंधश्रद्धा निर्माण झाल्या आहेत आणि त्या एवढ्या घट्ट झाल्या आहेत

की ही हे चुकीचे आहे असे सांगणाऱ्या वेड्यात काढले जाते. अशा या महाभाही लोकांविषयी आणि आधुनिक अंधश्रद्धा यावर आता खुलेपणाने बोलले गेले पाहिजे. माय बाप शेतकऱ्यांना याविषयी खरे मार्गदर्शन झाले पाहिजे. यात मी एक सुरुवात करतोय. काही आधुनिक अंधश्रद्धा यांचा उल्लेख करणार आहे आणि त्याचे खरे रूप मांडणार आहे.

भोंदू बाबांच्या मते काही शेती मधील आधुनिक अंधश्रद्धा अशा आहेत.१. Phospheric एसिड वापरून Phosphorus या अन्नद्रव्याची पूर्तता करून पीक भरघोस येते.२.झिरो बजेट नैसर्गिक शेती.३. जेवढे जास्त महाग औषध, खत तेवढे त्याचे फायदे जास्त..४. फक्त विद्राव्य खते वापरून आपण जमनीचे आणि पिकाचे पूर्ण पोषण करू शकतो आणि त्यातून भरपूर उत्पन्न मिळते.अशा खूप गोष्टी आहेत त्या शेती मध्ये खूप घोळ करत

आहेत त्यामुळे उत्पन्न खर्च वाढत आहे आणि शेती तोट्यात जात आहे.आपल्याला कोणती गोष्ट चुकीची वाटत आहे ती आपण ही मांडावी, तरच इतर शेतकऱ्यांना समजेल.जो पर्यंत आपण आपल्या शेतावरील सर्व कामांची, औषधे, खते यांच्या वेळोवेळी नोंदी ठेवत नाही आणि त्याचा अभ्यास करत नाही तो पर्यंत हे भोंदू बाबा आपल्या फसवत राहणार आणि आपल्या अंधश्रद्धा वाढत राहणार.

 

- श्री. गणेश नाझीरकर 

फ्रुटवाला बागायतदार

English Summary: These are the modern farming superstitions, be careful These are the modern farming superstitions, be careful
Published on: 10 October 2022, 07:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)