सध्या प्रत्येक पिकामध्ये नवनवीन किडी,हवामान बदल आणि रोगांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. तसेच या किडी कोणत्याही रासायनिक औषधाला न जुमानता पिकांचे नुकसान करत आहेत. या सर्व कारणामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च खूप वाढत आहे आणि त्यामानाने त्याचे उत्पन्न खूपच कमी झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमीत कमी करून पेरणीसाठी निरोगी बियाण्याचा वापर करावा. तसेच रोग प्रतिकारक वाण/जात यांचा वापर लागवडी साठी करावा.त्याचबरोबर एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पन्न प्रयत्न करायला हवा.
सोयाबीनचे तांबेरा प्रतिबंधक वाण फुले संगम (के डी एस 726):- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2016 ला दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू या भागाकरिता शिफारशीत केलेला सोयाबीनचा हा वाण तांबेरा रोगास कमी बळी पडणारा वाण म्हणून शिफारस आहे. या वाणाचा परिपक्वता कालावधी 100 ते 105 दिवस आहे.हा वाण पानावरील ठिपके आणि खोडमाशी सुद्धा तुलनात्मक दृष्ट्या प्रतिकारक असून या वाणाची एकरी उत्पादकता 8 ते 9 क्विंटल प्रति एकर एवढी आहे.
फुले किमया (के डी एस 753):- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा वाण सन 2017 ला दक्षिण महाराष्ट्र, तेलंगाना, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व इतर काही राज्याकरिता शिफारस केला आहे. या वाणाचा परिपक्वता कालावधी 95 ते 100 दिवस असून हा वाण तांबेरा रोगास कमी बळी पडतो अशी शिफारस आहे. या वाणाची एकरी उत्पादकता 8 ते 10 क्विंटल प्रति एकर एवढी आहे.फुले कल्याणी डी. एस. 228:- या वाणाची लागवड संपूर्ण महाराष्ट्रात केली जाऊ शकते आणि तयानुसार याचा परिपक्व कालावधी 95-100 दिवस आहे.तसेच हा वाण तांबेरा रोगास प्रतिकारक आहे.याचे उत्पन्न 9-12 प्रति एकर मिळू शकते.
फुले अग्रणी के. डी. एस.-344:- या वाणाची शिफारस महाराष्ट्र, कर्नाटक,तामिळनाडू या राज्यांसाठी करण्यात आली आहे. या वाणाची हि शिफारस तांबेरा रोगप्रतिकारक म्हणून करण्यात आली आहे.प्रतिष्ठा (M.A.U.S.-61-2):- या वाणाची वैशिष्ठे म्हणजे फुलाचा रंग लालसर असून लव तपकिरी रंगाचे आहे व दाणा टपोरा आहे. पक्कतेनंतर 8-10 दिवस शेंगा न फुटता उभा राहू शकतो. तांबेरा मध्यम प्रतिबंधक, आंतरपिकास योग्य.परिपक्व कालावधी : 100-110 दिवस आहे. तसेच उत्पादन 10-12 क्विंटल प्रती एकर मिळू शकते.
स्रोत-इंटरनेट
IPM SCHOOL
Published on: 16 June 2022, 09:19 IST