जसे चार महिन्याच्या पावसाळ्यात उत्तर भारतात २५ डिग्री पूर्व-पश्चिम अक्षवृत्ताच्या दरम्यान कमी दाब क्षेत्र पॉकेट्स ला भेदून जाणारी रेषा म्हणजे मान्सूनचा आस(Monsoon trough) तसा हिवाळ्यात १५ ऑक्टोबर नंतर ते पार फेब्रुवारीपर्यंत
त्याच ठिकाणी उच्चं दाब क्षेत्र पॉकेट्स तयार होतात. ह्याला आपण प्रत्यावर्ती चक्रीय क्षेत्रे म्हणतो https://marathi.krishijagran.com/agripedia/hello-farmers-children-come-to-your-senses(Anticyclone ).
हॅलो! शेतकऱ्यांच्या मुलांनो, भानावर या
सध्या अशी अनेक Anticyclones असुन त्यांना पूर्व -पश्चिम भेदून जाणारी रेषा म्हणजे त्याला आस च्या विरुद्ध म्हणजे ' रीज ' (Ridge) म्हणतात.
प्रत्यावर्ती चक्रीय क्षेत्रमधील ( Anticyclone ). वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे फिरत असल्यामळे राजस्थान पंजाब मधील एका Anticyclone मधील वर्तुळकार वारा म. प्र. विदर्भातून रहाटगाडग्याप्रमाणे अरबी समुद्रात घुसून प्रचंड आर्द्रता गाडग्यात भरून पुढील गरक्यात उत्तर
भारतात व तसेच महाराष्ट्रतही ओतून गाडगे खाली(रिते )करतो व पुन्हा आर्द्रता भरण्यास अरबी समुद्रात घुसतो. म्हणून सध्या महाराष्ट्रात गाडग्याने ओतलेल्या आर्द्रता मुळे आर्द्रता प्रमाण वाढीमुळे व असलेल्या थंडीमुळे ढगाळ वातावरण आहे. पण पाऊस होणार नाही.वरील सर्व फोडून सांगण्याचा प्रयत्न केवळ हवामान साक्षरते साठीच केला असे समजावे.
माणिकराव खुळे, Meteorologist (Retd.), IMD Pune. ह. मु. वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक.
Published on: 09 November 2022, 08:25 IST