Agripedia

प्रयोगशाळेमध्ये उपयुक्त कार्यक्षम जिवाणूंची वाढ करून योग्य वाहकता मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला जिवाणूखत किंवा जीवाणू संवर्धन असे म्हणतात.नत्र,स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांसोबत तसेच इतर सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जिवाणूंचा वापर करता येतो. या लेखात आपण शेतीमध्ये जिवाणू खतांचा वापर कशा पद्धतीने करावा, याविषयी माहिती घेणार आहोत.

Updated on 26 November, 2021 7:40 PM IST

प्रयोगशाळेमध्ये उपयुक्त कार्यक्षम जिवाणूंची वाढ करून योग्य वाहकता मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला जिवाणूखत किंवा जीवाणू संवर्धन असे म्हणतात.नत्र,स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांसोबत तसेच इतर सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जिवाणूंचा वापर करता येतो. या लेखात आपण शेतीमध्ये जिवाणू खतांचा वापर कशा पद्धतीने  करावा, याविषयी माहिती घेणार आहोत.

जिवाणू खते वापरण्याच्या पद्धती

  • बीजप्रक्रिया- 250 ग्रॅम जिवाणू खते दहा किलो बियाण्यास पुरेसे होतात. बियाण्याच्या प्रमाणानुसार बीजप्रक्रियेसाठी पुरेसे पाणी घेऊन त्यात वरील प्रमाणामध्ये जिवाणू खते मिसळावी.एकरी किंवा हेक्‍टरी लागणारे बियाणे फरशी, ताडपत्री किंवा एखाद्या गोणपाटावर पसरावे. त्यावर वरील द्रावण शिंपडून हलक्या हाताने एकसारखे मिसळावे.प्रक्रिया केलेले बियाणे सावलीमध्ये सुकवावे. बियाणे सुकल्यानंतर लगेच पेरणी करावी. कोणत्याही रासायनिक खतांबरोबर जिवाणू खते किंवा बियाणे मिसळू नये.
  • रोपांच्या मुळावर अंतरक्षिकरण-अझोटोबेक्टर किंवा ऍझोस्पिरीलम किंवा स्फुरद विरघळणारे जिवाणू आणि ट्रायकोडर्मा बुरशी संवर्धनाकरिता, जिवाणू संवर्धने प्रत्येकी 500 ग्रॅम प्रत्येकी पाच लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.या द्रावणात रोपांची मुळे पाच मिनिटे बुडवूनठेवावी.त्यानंतरत्वरितरोपांची लागवड करावी. पिकांना पाणी द्यावे.
  • जीवाणू खते शेणखतात मिसळून जमिनीत पेरणे- एक ते अडीच किलो जिवाणू खते पंचवीस ते तीस किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून द्यावे.शक्यतो हे मिश्रण झाडांच्या व पिकांच्या मुळाशी टाकावे. व पिकास हलके पाणी द्यावे.
  • उसाच्या बेण्यावर प्रक्रिया( बेणेप्रक्रिया )- ऍसिटोबॅक्‍टर जिवाणू खत प्रत्येकी दोन किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात उसाच्या कांड्या 10 ते 15 मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर उसाची लागवड करावी व पाणी द्यावे.
  • भात पिकासाठी निळे हिरवे शेवाळे वापरण्याची पद्धत- भात पिकाच्या रोपांची लागवड पूर्ण करून घ्यावी. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी पाणी स्वच्छ झाल्यानंतर निळे-हिरवे शेवाळ हेक्‍टरी 20 किलो या प्रमाणात वापरावे.माती मिश्रित निळे-हिरवे शेवाळ शेतात विस्कटून द्यावे.त्यानंतर बांधातील पाणी ढवळू नये.
  • अझोलाचा वापर- भात बांधातील पाण्यामध्ये ऍझोला 700 ग्रॅम प्रति चौरस मीटर क्षेत्र या प्रमाणात शिंपडून द्यावा. या वनस्पतीची वाढ होऊन साधारण पंचवीस ते तीस दिवसात संपूर्ण पृष्ठभाग आच्छादून जातो. ही वनस्पती त्याच बांधातील पाण्यात चिखलण अन करून गाढून टाकावे.
English Summary: the ways of use bacteria fertilizer in agriculture and benifit
Published on: 26 November 2021, 07:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)