Agripedia

शेतकर्यांची फसगत होण्यापैकी आणखी एक नविन विषय म्हणजे जैविक प्रॉडक्ट.

Updated on 17 November, 2022 11:52 AM IST

शेतकर्यांची फसगत होण्यापैकी आणखी एक नविन विषय म्हणजे जैविक प्रॉडक्ट. जैविक च्या नावाने लूटमार करणार्या हजारो कंपन्या भारतात सक्रिय आहेत. सदर कंपन्यांपैकी ९० ते ९५ % कंपन्यांचे रिजल्ट बोगस आहेत. असे असून सुद्धा या बाबत यांचेवर शासकीय कोणतेही निर्बंध कींवा निकष बाध्य नाही. यांचेसाठी अजून कोणताही

कानून बनला नाही. व कोणतीही अपील नाही. त्यामुळे शेतकर्यांची लुबाडणूक करत सुसाट वेगाने ह्या कंपन्या धनाढ्य होत आहे.These companies are getting rich fast by robbing the farmers. शेतकरी राजा

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग

आशावादी प्रव्रुत्तीमूळे भरडला जात आहे.जबरदस्त रिजल्ट` `जास्त उत्पन्न` इत्यादी या कंपन्यांचे ब्रीदवाक्य. शेतकर्यांनी या पासून सावध असने गरजेचे. आशेपोटी फसवणूक करून घेउ नये. 

कुणाला जैविक प्रॉडक्ट वापरायचे झाल्यास त्याची शहानिशा करून घेण्यात यावी. त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नये. स्वतःचे शेतावर थोडक्यात वापरून शहानिशा करावी.यात शेतकर्यांची फार दुविधा होते. शेतात वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वापरतात सोबतच रासायनिक वापरतात. ह्यामुळे रिजल्ट कशाचा

मिळाला हेच कळत नाही. संभ्रम तयार होते. मग आलेला रिजल्ट ह्याच दवाइने आला असा अनेकांचा दावा असतो.एवढे लक्ष देणे गरजेचे की, जो पर्यंत आपल्या शेतात आपण कर्ब वाढवत नाही व जिवाणू संवर्धन होत नाही तोपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात रासायनिक किंवा जैविक औषधे काम करणार नाही. 

 

लेखक:- राजू रा. ढगे  

रा. :- अल्लिपुर , ता. -हिंगणघाट

जि. :- वर्धा. 

मो. :- 95 45 95 07 07

English Summary: The warning should be carefully considered by the farmers
Published on: 16 November 2022, 02:59 IST