Agripedia

नाशपाती हे मूलतः चीनमधील फळ आहे, परंतु आज जगभरात त्याची लागवड केली जाते. आज नाशपातीच्या 3 हजार पेक्षा जास्त जाती आहेत ज्या चव आणि रंगात भिन्न भिन्न आहेत. नाशपातीची बाग ही रेताड चिकणमाती असलेल्या आणि चांगली खोली असलेल्या जमिनीत लावणे चांगले मानले जाते. खरं तर, हे एक पर्णपाती झाड आहे, जे मैदानाच्या गरम दमट उप-उष्णकटिबंधीय प्रदेशात सहज वाढू शकते. आणि नाशपातीची झाडे ही उंचीच्या कोरड्या समशीतोष्ण भागात लावली जाऊ शकतात.

Updated on 26 September, 2021 11:56 AM IST

नाशपाती हे मूलतः चीनमधील फळ आहे, परंतु आज जगभरात त्याची लागवड केली जाते.  आज नाशपातीच्या 3 हजार पेक्षा जास्त जाती आहेत ज्या चव आणि रंगात भिन्न भिन्न आहेत.  नाशपातीची बाग ही रेताड चिकणमाती असलेल्या आणि चांगली खोली असलेल्या जमिनीत लावणे चांगले मानले जाते. खरं तर, हे एक पर्णपाती झाड आहे, जे मैदानाच्या गरम दमट उप-उष्णकटिबंधीय प्रदेशात सहज वाढू शकते. आणि नाशपातीची झाडे ही उंचीच्या कोरड्या समशीतोष्ण भागात लावली जाऊ शकतात.

नाशपातीच्या फळांमध्ये फायबर आणि लोह अधिक प्रमाणात उपलब्ध असते. यामुळे, हिमोग्लोबिनची कमतरता ह्या फळाच्या सेवनाने भरून काढता येते. अशा परिस्थितीत नाशपातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. परंतु यासाठी, त्याच्या सुधारित जाती निवडणे फार महत्वाचे आहे. जरी नाशपातीच्या शेकडो जाती आहेत, परंतु बटाटे आणि समशीतोष्ण फळ संशोधन केंद्राने नाशपातीच्या अनेक जातींपैकी काही वाणांची निवड केली आहे जी नाशपातीची उत्कृष्ट वाण मानली जाते, ह्यामुळे नाशपाती लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला तसेच खाणाऱ्यांना ह्याचा विशेष लाभ मिळतो. चला तर मग जाणून घ्या नाशपातीच्या या सुधारित जातींबद्दल-

 पत्थर नख

या जातीचे फळ हिरवे, गोल आणि दिसायला सामान्य आकाराचे असते. ज्यावर छोटे ठिपके बनलेले असतात. नाशपतीच्या या जातीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते दीर्घकाळ साठवले जाऊ शकते. त्याच वेळी, त्याचे गर (फळाचा आतील भाग) रसाळ आणि कुरकुरीत असतो. ह्या जातीच्या प्रत्येक झाडापासून सुमारे 150 किलो उत्पादन सहज घेता येते. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात त्याची फळे पिकतात.  दुर्गम भाग किंवा शहरांपर्यंत पोहचवणे हे सोपे असते.

पंजाब नख

खरं पाहता या जातीचा शोध हा पत्थर नख ह्या जातीपासून लावला गेला असला तरी ह्या जातीच्या नाशपाती जास्त उत्पादन देते. ह्या जातीच्या प्रत्येक झाडापासून 190 किलो पर्यंत उत्पादन घेता येते. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पिकणाऱ्या या जातीची फळे हलक्या पिवळ्या रंगाची आणि अंडाकृती दिसतात. पत्थर नख ह्या जातीप्रमाणे, ह्या जातींचे गर देखील रसाळ आणि कुरकुरीत असतात.

 

 पंजाब ब्युटी

या जातीची झाडे मध्यम आकाराची असतात जी वर्षभर फळे देतात. ह्या जातीच्या प्रत्येक झाडापासून 80 किलो पर्यंत उत्पादन घेतले जाऊ शकते. ह्या जातींचे फळ आकाराने मोठे, मऊ आणि चवीला गोड असते. ह्याची फळे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात परिपक्व होतात.

English Summary: the veriety of pear crop and management
Published on: 26 September 2021, 11:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)