Agripedia

देशात कृषी क्षेत्रात गेल्या दोन तीन दशकापासून मोठा अमुलाग्र बदल झाला आहे. शेतकरी बांधव उत्पादनवाढीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या रासायनिक औषधांचा, कीटकनाशकांचा, तणनाशकांचा, बुरशीनाशकांचा सर्रासपणे वापर करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात विक्रमी वाढ देखील होत आहे. मात्र या रासायनिक औषधांमुळे काळे आईची आरोग्य धोक्यात सापडत असल्याचे सांगितले जात आहे.

Updated on 30 January, 2022 6:36 PM IST

देशात कृषी क्षेत्रात गेल्या दोन तीन दशकापासून मोठा अमुलाग्र बदल झाला आहे. शेतकरी बांधव उत्पादनवाढीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या रासायनिक औषधांचा, कीटकनाशकांचा, तणनाशकांचा, बुरशीनाशकांचा सर्रासपणे वापर करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात विक्रमी वाढ देखील होत आहे. मात्र या रासायनिक औषधांमुळे काळे आईची आरोग्य धोक्यात सापडत असल्याचे सांगितले जात आहे.

शेतकरी बांधव पिकांच्या वाढीसाठी वेगवेगळे टॉनिक वापरत असतात. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी देखील कांदा या नगदी पिकाच्या वाढीसाठी वेगवेगळ्या टॉनिकचा सर्रासपणे वापर करत आहेत. कांदा समवेतच वेगवेगळ्या पिकात दिवसेंदिवस वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे, तसेच वातावरण बदलामुळे सर्वच पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट कायमच बनलेले असते त्यामुळे शेतकरी बांधव किडींचा आणि रोगांचा नायनाट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी करत असतात. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव रोखला जातो तसेच रोगांवर देखील प्रभावीपणे नियंत्रण मिळवणे शक्य होते. मात्र कीटकनाशक तसेच बुरशीनाशक फवारल्याने शेत जमिनीचे आरोग्य देखील धोक्यात येते तसेच रासायनिक औषध फवारलेला शेतमाल मानवी आरोग्यासाठी देखील घातक सिद्ध होतो. सध्या राज्यात सर्वत्र रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा वाढीसाठी सज्ज झाला आहे. कांदा समवेतच पिकात मोठ्या प्रमाणात गवतांची देखील वाढ होत असते. त्यामुळे राज्यात सर्वत्र शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा वापर करीत आहेत. तन नाशक फवारल्याने कमी खर्चात पिकात वाढलेले तण समूळ नष्ट करता येते शिवाय यामुळे वेळेची देखील बचत होते. दिवसेंदिवस वाढत चाललेली मजूरटंचाई आणि त्यामुळे वाढत चाललेली रोजंदारी यामुळे बळीराजाच्या उत्पादन खर्चात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पारंपारिक पद्धतीने खुरपणी किंवा निंदणी करून तणनियंत्रण करण्याऐवजी सर्रासपणे तणनाशकाचा वापर करत "घंटो का काम मिनटो में वो भी कम खर्च में" या धोरणाचा अवलंब करताना यावेळी नजरेस पडत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात बागलानच्या खोऱ्यासमवेतच संपूर्ण कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा लावला गेला आहे. सध्या परिसरातील उन्हाळी कांदामध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे, त्या अनुषंगाने परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तणनियंत्रण करण्यासाठी सर्रासपणे तणनाशकाचा वापर सुरू केला आहे. परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, परिसरात मोठ्या प्रमाणात मजुरांची टंचाई भासत आहे त्यामुळे मजुरांची रोजंदारी दिन दोगुनी रात चौगुणी प्रगती करत आहेत. शिवाय वेळेवर मजूर मिळत नसल्याने कांदा पिकाची वेळेवर निंदणी अथवा खुरपणी करणे शक्य होत नाही परिणामी याचा पिकावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कमी खर्चात आणि वेळेवर तन नियंत्रण करण्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी तणनाशकालाच प्राधान्य देत आहेत. मात्र, तणनाशक फवारल्यामुळे जरी कमी खर्चात, योग्य वेळेत, आणि कमी श्रमात तणनियंत्रण करता येणे शक्‍य असले तरी यामुळे शेतजमिनीवर दूरगामी परिणाम घडून येतात. तणनाशकाचा आवाक्याबाहेरचा वापर शेतजमिनीला नापीक देखील बनवू शकतो. तसेच यामुळे उत्पादित केलेला शेतमाल मानवी आरोग्यासाठी कदापि योग्य नाही यामुळे मानवी आरोग्याला मोठा धोका असतो.

तननाशक तसेच कीटकनाशकांचा अंदाधुंद वापर केल्याने जमिनीतील क्षारांचे प्रमाण लक्षणीय वाढते. त्यामुळे आगामी काळात जमीन नापीक होण्याचा धोका कायम असतो आणि यामुळे येणाऱ्या भविष्यात पिकाच्या उत्पादनात मोठी घट घडून येऊ शकते. कृषी तज्ञांच्या मते, सर्रासपणे तणनाशकाचा वापर शेतकरी बांधवांनी टाळावा. जेव्हा निंदणी अथवा खुरपणी करण्यासाठी मजुरांची टंचाई भासत असेल आणि योग्य वेळेत पिकातून तण काढता येणे शक्य नसेल तर आणि तरच तणनाशकाचा वापर करावा अन्यथा तणनाशकाचा वापर करू नये. शेतकरी मित्रांनो जर आपणास तणनियंत्रणासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नसेल तर आपण कांदा लागवड केल्यापासून 20 दिवसांनंतर तणनाशकाचा वापर करावा. तननाशक वापर करताना औषधांची योग्य मात्रा द्यावी यासाठी आपण कृषी तज्ञांचा अथवा अनुभवी शेतकऱ्यांचा सल्ला घेऊ शकतात. कृषी तज्ञांच्या मते, तननाशक फवारताना जमिनीत पुरेशी ओल असणे गरजेचे असते. जमिनीत पुरेशी ओल नसताना तणनाशक फवारले गेले तर यामुळे जमिनीवर विपरीत परिणाम घडण्याची शक्यता असते.

English Summary: The use of herbicides in onion crop has less advantages and more disadvantages, so ..
Published on: 30 January 2022, 06:36 IST