Agripedia

पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी अनेकदा रासायनिक खतांचा वापर केला जातो. खरेतर सुपीक जमिनीमध्ये पुन्हापुन्हा पीक उत्पादन घेतल्यामुळे हळूहळू जमिनीची सुपीकता कमी होऊ लागते. म्हणून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण केले पाहिजे.

Updated on 09 November, 2021 9:03 PM IST

 पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी अनेकदा रासायनिक खतांचा वापर केला जातो. खरेतर सुपीक जमिनीमध्ये पुन्हापुन्हा पीक उत्पादन घेतल्यामुळे हळूहळू जमिनीची सुपीकता कमी होऊ लागते. म्हणून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण केले पाहिजे.  

आता अधिक उत्पादन देणाऱ्या जातींच्या वापरामुळे आणि आरोग्य माती व्यवस्थापनामुळे मातीची प्रजननक्षमता कमी होण्यास सुरूवात झाली आहे. पिकास कोणत्या प्रकारचे खते आवश्यक आहेत. त्यांचे गुणधर्म काय आहेत आणि त्याची उत्पादनक्षमता कशी वाढवायची या विषयी संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे.पिकांना नत्राचा पुरवठा करण्यासाठी युरिया, स्फूरदचापुरवठा करण्यासाठी डीएपी, एस एस पी किंवा एन पी केआणि पालाशचा पुरवठा करण्यासाठी एम ओ पी किंवा एनपीकेचा वापर केला जातो.तसेच जस्त चा पुरवठा करण्यासाठी झिंक सल्फेटचा वापर केला जातो. आता आपण खतांची गुणवत्ता कशी तपासली जाते हे पाहू.

 अशा पद्धतीने खतांचे गुणवत्ता तपासावी

  • युरिया- हा पांढरा रंगाचा चमकदार असतो. युरिया चे गोल दाणे एक समान आकाराचे असतात.या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतो. पाण्यात विरघळलेल्या द्रावणला स्पर्श केल्यास थंडलागतो. युरियाचे दाणे उन्हात जमिनीवर ठेवले असता ते वितळतात आणि जास्त उन्हात युरियाचे कोणतेही अवशेष राहत नाही.
  • डीएपी-डीएपी चे दाणे कठोर,भुरे,काळे किंवा बदामी रंगाचे असतात. डीएपीची गुणवत्ता ओळखण्यासाठी काय डीएपी चे गुणवत्ता ओळखण्यासाठी काही दाण्यांना हातात घेऊन त्यात थोडा चुना मिसळून तंबाखू सारखेरगडल्यावर तीव्र गंध तयार होतो.ज्याचा वास घेणे खूप कठीण असते. याव्यतिरिक्त डीएपी च्या काही दाण्यांना फरशीवर रगडल्यावर ते तुटत नाही. जर डीएपी च्या दाण्यांना तव्यावर हळुवार गरम केले असता त्याचे दाणे फुगतात
  • एसएसपी- एस एस पी चे दाणे कठोर, दाणेदार, भुरे, काळे आणि बदामी रंगाचे असतात. हे खत पावडर च्या स्वरुपात देखील उपलब्ध असते. एस एस पी या दाणेदार खताचा मुख्यतः डीएपी आणि एनपीके मिश्र खतां सारखा वापर केला जातो.
  • एमओपी-एम ओ पी हे सफेद,पांढऱ्या रंगाच्या मिठासारखे आणि लाल मिरचीच्या मिश्रण सारखे असते. याचे दाने ओलसर केल्यावर एकमेकांना चिटकत नाहीत.  हे खत पाण्यात विरघळल्यावर या खताचा लाल भाग पाण्यावर तरंगतो.
  • झिंक सल्फेट-झिंक सल्फेट या खतात मॅग्नेशिअम सल्फेटची प्रमुख मिश्रण असते.

भौतिक रूप समानते मुळे या खताची नकली असली ची ओळख करणे खूप कठीण असते. या खताच्या गुणवत्ता तपासण्यासाठी याच्या मिश्रणात डीएपी चे मिश्रण मिळवल्यावर दाट द्रावण तयार होते.मॅग्नेशियम सल्फेट सोबत असे होत नाही. शिवाय झिंक सल्फेट च्या मिश्रणात पातळ दाहक सोडा मिसळल्यावर पांढरे,फिक्कट तपकिरी द्रावण तयार होते.यात घट्ट दहक मीसळल्यावर द्रावण पूर्णपणे मिसळून जाते. जर झिंक सल्फेट ऐवजी मॅग्नेशियम सल्फेट घेतले तर द्रावण विरघळत नाही.

English Summary: the tricks of the identy of purity of chemical fertilizer
Published on: 09 November 2021, 09:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)