Agripedia

माझे आजोबा शेती करायचे.माझे वडीलही अन आता मी पण शेती करतोय शेतीत खूप बदल झालाय

Updated on 02 May, 2022 9:57 PM IST
माझे आजोबा शेती करायचे.माझे वडीलही अन आता मी पण शेती करतोय शेतीत खूप बदल झालाय हे जरी काही अंशी खर असलं तरी शेतकऱ्याच्या मानसिकतेत काहीही बदल झालेला नाही हे वास्तव आहे.
 ऐकवेळ आम्ही जातीच्या.पक्षाच्या नेत्याच्या..नेत्याच्या मुलाच्या नावानं एकत्र येऊ पण शेतीच्या नाहीच आणि हीच मानसिकता शेतकऱ्यांच्या विकासाला मारक व लुटिला पोषक आहे.
पूर्वजांनी निमुटपणानं लूअन्याय सहन केला कारण ते अशिक्षित होते पन आजचा तरुण शेतकरी शिक्षित आहे उच्चशिक्षित आहे तरीही त्याची 

भूमिका फक्त बघ्याची आणि लाचारीनं सहन करण्याची असेल तर ही लाजवाणी गोष्ट आहे.आपलं हित दुसरा कुणी करेल..आपल्यासाठी दुसरा कुणी लढेल. संघर्ष करेल नं मी मात्र सोयिस्कर या संघर्षपासून दूर असेल हे निव्वळ षंडपणाचे लक्षण आहे. व्यवस्था परिवर्तनाची ताकद फक्त शेतकरी आणि कामगार यांच्यात आहे.इतिहास साक्षी आहे ज्या ज्या वेळेस जगात कुठल्याही देशात क्रांती झाली असेल तर त्याची मशाल या दोन घटकांच्याच हातात होती.मदमस्त भांडवलदार आणि स्वार्थी राजकारणी कधीही व्यवस्था परिवर्तन घडवू इच्छित नसतात कारण ते त्यांच्या नफेखोर प्रवृत्तिला मारक असते.

जो-जो शेतीच्या प्रश्नाविषयी आवाज उठवेल ..संघर्ष करेल..त्याला तन- मन- धनानं साथ देण ही शेतकरी म्हणून आपली प्रार्थमिकता असली पाहिजे..जिथे जिथे लुटीची व्यवस्था लक्षात येईल तिथे तिथे त्या व्यवस्थेविरुद्ध स्वता संघर्ष करायला हवा अन जर दुसरा कुणी संघर्ष करत असेल तर आपली काम थोड़ी बाजूला ठेवून त्याला प्रत्यक्ष साथ दिली पाहिजे.

      आपली परावलंबी व् निमुटपनानं सहन करण्याची..संघर्ष नं करता फक्त बघ्याची भूमिका आपल नुकसान तर करतेच आहे

परन्तु पुढच्या पिढीला ही आपन फक्त बघे आणि षंड बनवत आहोत.शेतीत कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूल परिस्थित संघर्ष करण्याची ज़िद्द असलेला शेतकरी या लुटीच्या व्यवस्थेबरोबर ही तितक्याच जिद्दी नं अन ताकदीने संघर्ष करू शकतो.

हे दाखवून दयायला हव अन त्यासाठी गावोगावी तरुण शेतकऱ्यांनी पक्ष.जाती विरहित एकत्र यायला हव तरच काही परिवर्तन घडू शकते अन्यथा नाहीच.

English Summary: The traditional look of the farmers is killing the farmers.
Published on: 02 May 2022, 09:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)