Agripedia

कांदा हे एक प्रमुख नगदी पीक आहे.कांद्याची लागवड महाराष्ट्र मध्ये आता बर्यायच प्रमाणात वाढत आहे.परंतु कांद्यामध्ये प्रमुख समस्या ही साठवणुकीच्या असते.कारण कांदा हे पीकजास्त काळ टिकत नसल्यानेत्याची शास्त्रोक्त पद्धतीने काढणी व साठवणूक करणे फार महत्त्वाचे असते.या लेखात आपण रब्बी कांद्याची काढणी व त्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक कशी करावी, त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Updated on 24 September, 2021 4:43 PM IST

कांदा हे एक प्रमुख नगदी पीक आहे.कांद्याची लागवड महाराष्ट्र मध्ये आता बर्‍याच प्रमाणात वाढत आहे.परंतु कांद्यामध्ये प्रमुख समस्या ही साठवणुकीच्या असते.कारण कांदा हे पीकजास्त काळ टिकत नसल्यानेत्याची शास्त्रोक्त पद्धतीने काढणी व साठवणूक करणे फार महत्त्वाचे असते.या लेखात आपण रब्बी कांद्याची काढणी व त्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक कशी करावी, त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

 कांद्याची काढणी

1-कांदा काढणी च्या दहा ते पंधरा दिवस आधी जमिनीचा प्रकार कोणता आहे त्यानुसार पाणी देणे बंद करावे.

2-कांदा पिकाची काढणी 50 टक्के त्याच्या माना पडल्यानंतर करावी. पाणी जास्त वाढू न देता कांदा उपटून काढावा.अन्यथा माना जास्त वाळल्या तर कांदा उपटताना तुटतो आणि मग कांदा कुदळीने किंवा खुरप्याने खोदून  काढावा लागतो त्यामुळे खर्च वाढतो.

3- कांदा काढल्यानंतर तो तीन दिवस शेतामध्ये पाती सह सुकण्यासपडू द्यावा. प्रत्येक वाक्यातील कांदा अशा रीतीने ठेवावा की दुसरी ओळख पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकेल आणि पात उघडी राहील.

 तीन दिवसानंतर कांद्याचे पूर्ण सुकलेली पात दोन ते अडीच सेंटीमीटर लांब मान ठेवून कापावी. नंतर त्यामध्ये असलेले जोड कांदे,डेंगळेआणि चिंगळी कांदा वेगळे करावेत.उर्वरित चांगले कांदे गोळा करून सावलीत दहा-बारा दिवस राहू द्यावीत.या काळात कांद्याच्या माना  वाळून पीरघळतात  तसेच वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. वाळलेल्या भागातून रोगजंतूंचा कांद्यात सहजासहजी प्रवेश होत नाही. त्यामुळे अशाप्रकारे वाळवलेला कांदा अधिक चांगला टिकतो.

 कांदा साठवणूक करताना घ्यायची काळजी

सगळ्यात अगोदर आपण साठवत असलेल्या कांदा चाळीचे निर्जंतुकीकरण करून घ्यावी. उद्यासाठी स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणजेच ब्ल्यू कोपर/ कोसाईड / m45 + गॅस पॉयझन युक्त कीटकनाशक( नुवान / क्लोरोपायरीफॉस)प्रमाणानुसार एकत्र करून फवारणी करावी नंतर साठवणूक करावी.

थायोसल्फ सल्फर चे कांदा साठवणुकीसाठी महत्व

बहुतांशी शेतकरी कांदा साठवणुकीसाठी चाळीमध्ये सल्फरचा बुरशीनाशक म्हणून वापर मोठ्या प्रमाणात.थायोसल्फ सल्फर 80 टक्के WDG उत्कृष्ट स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणून काम करते.  म्हणून ते चाळीमध्ये येणाऱ्या सर्व बुरशीजन्य रोगांना आटोक्यात ठेवते. परंतु बरेच शेतकरी बंधू सल्फरचा वापर करत असताना ते कोणत्या स्वरूपात आहे याचा विचार न करता कोणत्याही स्वरूपातील सल्फरचा वापर कांदाचाळी मध्ये करतात व अपेक्षित परिणाममिळत नाही. खराब कॉलिटी च्या व स्वस्त दर असलेल्या सल्फरचा वापर केल्यास कांद्याची क्वालिटी खराब होऊ शकते.

 

 मार्केट मध्ये मिळणारे सल्फर चे प्रकार

  • बेन्टोनाईट 90 टक्केसल्फर
  • 90 टक्के WG फॉर्ममधील सफर
  • 80 टक्के WDG फार्म मधील सल्फर
  • 80 टक्के डस्टिंग सल्फर

वरील सर्व सल्फर चे काम करण्याची वापराची पद्धत वेगळी आहे.

( स्त्रोत- होय आम्ही शेतकरी)

English Summary: the techniqe of onion storage and onion harvesting
Published on: 24 September 2021, 04:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)