Agripedia

लैंगिक असमानता म्हणजे लिंगाच्या आधारावर महिलांविरुद्ध होणारा भेदभाव. परंपरेने समाजात महिलांकडे दुर्बल घटक म्हणून पाहिले जाते. जगात सर्वत्र महिलांविरुद्ध भेदभाव केला जातो.

Updated on 06 December, 2021 8:35 PM IST

ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स-2020 मध्ये भारत 153 देशांपैकी 112 व्या क्रमांकावर आहे. भारतीय समाजातील स्त्री-पुरुष असमानतेचे मूळ त्याच्या पितृसत्ताक व्यवस्थेत आहे. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ सिल्व्हिया वाल्बे यांच्या मते, "पितृसत्ता ही अशी सामाजिक रचना आणि प्रक्रिया आहे ज्यामध्ये पुरुष स्त्रियांवर वर्चस्व गाजवतो, अत्याचार करतो आणि शोषण करतो." स्त्रियांचे शोषण ही भारतीय समाजाची शतकानुशतके जुनी सांस्कृतिक घटना आहे. पितृसत्ताक व्यवस्थेने आपली वैधता आणि मान्यता आपल्या धार्मिक श्रद्धांमधून मिळविली आहे, मग ती हिंदू, मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्माची असो.

उदाहरणार्थ, प्राचीन भारतीय हिंदू धोरणांचे तथाकथित प्रवर्तक आणि भाष्यकार असलेल्या मनूच्या मते, “स्त्रीने बालपणी तिच्या वडिलांच्या, लग्नानंतर तिच्या पतीच्या आणि वृद्धापकाळानंतर तिच्या मुलाच्या अधीन असावे असे मनूस्मृती मध्ये लिहून ठेवने आहे .कोणत्याही परिस्थितीत तिला स्वतंत्र राहण्याची परवानगी नाही.” त्यामुळे ती वयाच्या संपूर्ण कालावधीत दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागतो . मुस्लिमांचीही अशीच परिस्थिती आहे आणि तेथेही धार्मिक ग्रंथ आणि इस्लामिक परंपरेद्वारे भेदभाव व अधीनतेसाठी मंजुरी दिली जाते.

त्याचप्रमाणे इतर धार्मिक श्रद्धांमध्येही महिलांशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे भेदभाव केला जात आहे. अत्यंत गरिबी आणि शिक्षणाचा अभाव ही देखील महिलांना समाजात निम्न स्तरावर ठेवण्याची काही कारणे आहेत. गरिबी आणि शिक्षणाच्या अभावामुळे अनेक महिलांना सामाजिक गुलामगिरी किंवा जबरदस्ती मजुरीची कामे करावी लागतात. वडिलोपार्जित संपत्तीतही त्यांचा वाटा त्यांना मिळत नाही पाहिजे त्या प्रमाणात . ANGOC (Asian NGO Coalition for Agririan Reform and Rural Development) एशियन एनजीओ कोएलीशन फॉर एग्रेरियन रिफॉर्म एंड रूरल डेवलपमेंट चे कार्यकारी संचालक नॅथॅनियल डॉन मार्केझ, म्हणतात, आशियामध्ये जमिनीवरून संघर्ष झपाट्याने वाढत असून या संघर्षात स्त्रिया व लहान मुले होळपळत आहेत.

स्त्रियाना मिळणारे दुय्यम स्थान हे वर्षानुवर्षे चालत आलेल्या सामाजिक बहिष्कार, भेदभाव आणि पुरुषी अभिमानी मक्तेदारीमुळेही होत आहे. उदारीकरणाच्या उद्योग पतीच्या हव्यासापोटी व त्यांच्या जमिनीवर उद्योग उभारण्याच्या दबावामुळे आदिवासींना हक्काची जमीन मिळणे कठीण झाले आहे. कौटुंबिक मालमत्तेच्या वितरणात महिलांना त्यांचा वाटा देण्यात जमीन सुधारणा देखील अयशस्वी ठरल्या. ANGOC ने अलीकडेच फिलिपाइन्स, भारत आणि बांगलादेशसह आशियातील आठ देशांमध्ये सर्वेक्षण केले. आदिवासी आणि महिलांच्या हक्कांना मान्यता देणाऱ्या जमीन सुधारणा कायद्याची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही, असे सर्वेक्षणाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. जमिनीचे पुनर्वितरण योग्य पद्धतीने झाले नाही. मार्केझ म्हणतात की आदिवासी लोक जेव्हा जेव्हा जमिनीवर दावा करतात तेव्हा त्यांना अनेकदा हिंसाचाराचा सामना करावा लागतो. ब्रिटनस्थित ग्लोबल विटनेसने गेल्या वर्षी फिलीपिन्सला जमीन सुधारणा कार्यकर्त्यांसाठी सर्वात धोकादायक देश म्हणून स्थान दिले.

 भारतात जमिनीची मालकी बहुतांश पुरुषांच्या नावावर आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये महिलांचा वाटा एक तृतीयांश आहे, परंतु केवळ 13 टक्के जमीन त्यांच्या नावावर आहे. देशातील 80 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदू आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकार कायद्यात सुधारणा करण्यात आली. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार दिले. मात्र सर्व कायदे करूनही सामाजिक रूढी परंपरांमुळे भारतात अजूनही महिलांना हक्क मिळत नाहीत. जमिनी पुरुषांच्याच नावावर असाव्यात, अशी मानसिकता आहे. नोकऱ्यांसाठी पुरुषांचे शहरांकडे स्थलांतर वाढल्याने संपूर्ण आशिया खंडात कृषी क्षेत्रात महिलांची संख्या वाढली आहे. मात्र तरीही महिलांच्या नावावर जमिनीची मालकी नगण्य झाली आहे.

महिलांना लग्नाच्या वेळी वडिलोपार्जित संपत्तीही सोडावी लागते. 2005 मध्ये, वडिलांच्या मालमत्तेत महिलांना समान अधिकार मिळावेत यासाठी हिंदू उत्तराधिकार कायद्यात सुधारणा करण्यात आली. मात्र महिलांनी हक्काची मागणी केल्यावर हे प्रकरण कोर्टात पोहोचले. आणि न्यायालयात जाऊनही महिलांच्या बाजूने निर्णय घेतले जात नाहीत. उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत या विषयावर निर्णय देण्यात आले आणि या निर्णयांमध्ये बराच विरोधाभास होता. सध्या महिला समाजाला जमिनी,मालमत्तेच्या हक्कापासून वंचित ठेवणे म्हणजे आई, बहीण आणि पत्नी किंवा महिला शेतकरी यांचा अवमान आहे .भारतातील जमीन आणि मालमत्तेवरील स्त्रियांचे हक्क हे केवळ वैधानिक अवमानाचे गुंतागुंतीचे प्रश्न नाहीत तर त्यांचे मूळ सामाजिक जडत्वात आहे ज्याला आजच्या आधुनिक भारतात नैतिकतेच्या आधारावर आव्हान दिले पाहिजे. भारत हा जगातील अशा काही देशांपैकी एक आहे जिथे घटनात्मक बांधिलकी आणि वैधानिक तरतुदी असूनही, महिला लोकसंख्येपैकी निम्मी लोक अजूनही जमिनीवर आपली मुळे शोधत आहेत.

 न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती एमआर शाह यांनी या मुद्द्यावर हा निकाल देऊन वडिलांच्या मालमत्तेत किंवा दायित्वांमध्ये महिलांना काय वाटा हा प्रश्न सोडवला आहे. मुलाला जेवढा वाटा संपत्ती मध्ये मिळतो तेवढाच वाटा मुलींना महिलांना असेल , असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. म्हणजेच वडिलांच्या संपत्तीत मुलगा आणि मुलगी यांना समान वारसाहक्का मिळेल, 11 ऑगस्ट 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, 2005 चा पुनर्व्याख्या करताना पुन्हा एकदा समाजातील जनमानसात चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे, जे सामाजिक समजुतींच्या कचाट्यात वावरत आहेत. 

बीना अग्रवाल मँचेस्टर युनिव्हर्सिटी, यूके येथे विकास अर्थशास्त्र आणि पर्यावरण या विषयाच्या प्राध्यापिका आहेत आणि त्यांच्या 1994 च्या "ए फील्ड ऑफ वनज ओन: जेंडर अँड लँड राइट्स इन साउथ एशिया" या पुस्तकासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला आहे. 2005 मध्ये त्यांनी लिंग समानतेसाठी हिंदू उत्तराधिकार कायद्यातील बदलांसाठी प्रचार केला. महिला हक्काच्या क्षेत्रात त्यांनी प्रातिनिधिक कार्य केले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की “जंगम मालमत्ता, विशेषत: जमीन ही अजूनही भारतातील लोकांची सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. ग्रामीण भागात, ही मालमत्ता नवीन संपत्तीचा निर्माता आणि उपजीविकेचे साधन असून शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे उत्पादन साधन आहे. पण जमीन मालकीच्या कुटुंबातही महिलांकडे जमीन किंवा घर नसेल तर त्यांना आर्थिक आणि सामाजिक धोकाही असतो. जमिनीचा एक छोटा तुकडा असल्‍याने महिलांसाठी गरिबीचा धोका कमी होतो, विशेषत: विधवा किंवा घटस्फोटित प्रकरणांमध्ये. जेव्हा स्त्रियांच्या मालकीची जमीन होती तेव्हा मुलांची स्थिती, आरोग्य आणि शिक्षण देखील चांगले असल्याचे दिसून आले. पुस्तक लिहिल्यानंतर केलेल्या संशोधनात मला असे आढळून आले की जर एखाद्या महिलेकडे जमिन संपत्ती असेल तर घरगुती हिंसाचाराचा धोकाही लक्षणीयरीत्या कमी होतो.

 

 महिलांना जमिनीचा हक्क मिळाल्याने संभाव्य उत्पादकते मध्ये वाढ होतो . ग्रामीण भारतातील सुमारे 30 टक्के शेत मजुर महिला आहेत, व 70 टक्क्यांहून अधिक महिला अजूनही त्यांच्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत आणि 14% स्त्रिया देखील शेती व्यवस्थापक आहेत, जरी यापैकी बर्याच स्त्रिया अशा आहेत ज्यांचे पती नोकरी करतात, ते शेतीचे काम सांभाळतात. ज्या स्त्रिया शेतीचे व्यवस्थापन करतात त्यांना कर्ज, सबसिडी आणि बाजारपेठेपर्यंत सहज प्रवेश मिळतो. यामुळे त्यांच्या पिकात बरीच सुधारणा होते, ज्यामुळे देशाचा कृषी विकासही होतो. जमिनीची मालकी महिलांना अनेक प्रकारे सक्षम करते.

 

 महीलांना जमीन मालमत्तेत वाटा दिला तर एका चांगल्या सशक्तीकरण विकासाची सुरवात आहे जमिनीच्या अधिकारांमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारेल, तसेच सामाजिक आणि राजकीय लिंगभेदाला आव्हान देण्याची त्यांची क्षमता बळकट होईल. गया येथील दोन भूमिहीन महिलांनी 1970 च्या उत्तरार्धात पहिल्यांदा त्यांच्या नावावर जमीन घेतली तेव्हा त्या म्हणाल्या, “आम्हाला जीभ होती, पण बोलता येत नव्हते, पाय होते, पण चालता येत नव्हते.

 आता आमच्याकडे जमीन आहे, आम्हाला बोलण्याची आणि चालण्याची शक्ती मिळाली आहे.

 

 हेच सशक्तीकरण! येथे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की औपचारिक क्षेत्रात नोकऱ्या असलेल्या महिलांचा एक छोटासा वर्ग देखील आहे, जो आपल्या पतीपेक्षा जास्त कमावतो,

परंतु त्यांना बेरोजगार महिलांपेक्षा अधिक हिंसाचाराच्या घटनांना सामोरे जावे लागते. परंतु स्त्रीकडे मालमत्ता असली आणि तिचा नवरा मालमत्तेशिवाय असला, तरी तिला हिंसाचार कमी होतो. दुस-या शब्दात सांगायचे तर, रोजगार असल्‍याने स्‍त्रीच्‍या सुरक्षेवर विपरित परिणाम होतो, परंतु जंगम मालमत्तेचा अधिकार असल्‍याने तिला संरक्षण मिळते.भारतातील दलित आणि आदिवासींना जमिनीच्‍या मालकीपासून दूर ठेवले जाते. याचे कारण सामाजिक पूर्वग्रहांची मुळे खोलवर रुजलेली आहेत. भारतात जातीच्या आधारावर भेदभाव 1955 मध्ये कायदेशीररित्या बेकायदेशीर ठरला होता, तरीही तो सुरूच आहे. भारतातील जवळपास अर्धा दलित समाज भूमिहीन आहे. भूमिहीनांना जमीन देण्यासाठी असे कायदे अस्तित्वात असतानाही त्यांच्याकडे फार कमी जमीन आहे. ही मोठी विडंबना आहे.

 भारतात महिलांसाठी अनेक घटनात्मक सुरक्षेचे उपाय योजले गेले आहेत. जमिनीवरील वास्तव यापेक्षा खूप वेगळे आहे. या सर्व तरतुदी असूनही देशात आजही महिलांना दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून वागणूक दिली जाते, पुरुष त्यांना त्यांच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्याचे साधन मानतात, महिलांवरील अत्याचार धोकादायक पातळीवर पोहोचले आहेत, आज हुंडापद्धतीही प्रचलित आहे, स्त्रीभ्रूणहत्याही सुरू आहे. परिस्थिती बदलत असली तरी अजून जागरुकतेची गरज आहे.

 स्त्रियांनाही आजच्या काळानुसार आणि गरजेनुसार आपली जुनी सनातनी विचारसरणी बदलायची आहे आणि त्याही या शोषणात्मक पितृसत्ताक व्यवस्थेचा एक भाग बनल्या आहेत आणि पुरुषांना स्वतःवर वर्चस्व गाजवायला मदत करत आहेत हे जाणून घ्या. या परिस्थितीत खरा बदल तेव्हाच शक्य आहे जेव्हा पुरुषांच्या विचारसरणीत बदल घडवून आणला जाईल. पुरुषांनी स्त्रियांना समानतेने वागवायला सुरुवात केली पाहिजे आणि त्यांना आपल्या अधीनस्थ समजू नये.

 

 विकास परसराम मेश्राम 

vikasmeshram04@gmail.com

English Summary: The status of women and masculinity in India.
Published on: 06 December 2021, 08:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)