Agripedia

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित

Updated on 21 October, 2022 7:31 PM IST

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित तीन दिवसांच्या शिवार फेरी कार्यक्रमाची आज सांगता झाली. आजच्या तिसऱ्या दिवशी वाशिम, अमरावती, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी शिवार फेरीच्या नियोजित स्थळी भेटीदरम्यान खूप गर्दी केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे गोंदिया व भंडारा येथील शेतकरी बांधवांनी आदल्या रात्रीच अकोला मुख्यालयी हजेरी लावली. सकाळी ९.१५ वा. शेतकरी सदन येथे

भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन केल्यानंतर Dr. After garlanding the effigy of Punjabrao Deshmukh and lighting the lamp कुलगुरू डॉ. शरदराव गडाख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शेतकऱ्यांच्या वाहनांना शिवार फेरीसाठी रवाना करण्यात आले विद्यापीठाचा स्थापना दिवस साजरा तत्पूर्वी विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कुलगुरू डॉ शरदराव गडाख यांच्या हस्ते प्रशासकीय भवना समोरील प्रांगणात ध्वजारोहण व विद्यापीठ गीताने विद्यापीठ स्थापना दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संचालक संशोधन डॉ.

व्हि. के. खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता कृषि डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांच्यासह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीमध्ये आपल्या कार्याने भरीव

योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मा. कुलगुरूंनी आभार मानले. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या भविष्यातील प्रगती करिता शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून समर्पित वृत्तीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.कापूस व संत्रा वैदर्भीय शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देणारी दोन प्रमुख पिके होत. त्याअनुषंगाने शिवार फेरी दरम्यान या दोन पिकांवर विद्यापीठाद्वारे केलेल्या संशोधन शिफारशी प्रात्यक्षिकांच्या मार्फत शेतकऱ्यां साठी प्रदर्शित करण्यात आल्या. 

कापूस संशोधन विभागांतर्गत देशी सरळ व अमेरिकन कापूस वाणांच्या लागवड तंत्राविषयी शेतकऱ्यांना माहिती पुरवण्यात आली. विद्यापीठ निर्मित पीकेव्ही हाय 2, पीकेव्ही जे. के. ए.एल. 116 बिजी 2, सुवर्ण शुभ्रा, एकेएच् 9916, एकेएच् 8828 या अमेरिकन वाणांची तसेच एएच्एच् 081बीटी, रजत बीटी या सुधारित वाणांचा तर देशी वाणांमध्ये एक के 7, एके 8801 या वाणांचे सुधारित लागवड तंत्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दाखवण्यात आले.

English Summary: The Shivar round of the university ends with the overwhelming response of the farmers
Published on: 21 October 2022, 07:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)