देशभरात भरीताच्या वांग्याचे अधिक उत्पादन घेतले जाते. कीड नियंत्रणासाठी रासायनिक फवारण्यांची संख्या वाढली आहे. उत्पादन खर्चातील ४० टक्के खर्च हा पीक संरक्षणावरच होतो. परंतु जर बीटी वांग्याची चाचणी यशस्वी झाल्यानंतर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील जैवसुरक्षित चाचण्यांना केंद्र सरकारच्या जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायजल कमिटीने काही शर्तीवर हिरवा कंदील दाखवला आहे.
२००९ पासून महाराष्ट्र व काही राज्यात चाचण्यांचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण केल्यानंतर बियाणे उद्योगातील कंपनीने अलीकडे ८ राज्यात चाचण्यांसाठी संमती मागितील होती. चाचण्यांमधील दोन संकरित वाणात बीटी क्राय वन एफए वन या जनुकाचा समावेश केला आहे. जीईएसीच्या या निर्णयामुळे देशात जीएम तंत्रज्ञानाला वेगाने चालना मिळणार आहे. शेतकरी , बियाणे, उद्योग व कृषी विद्यापीठातील संशोधनाच्या अनुषंगाने सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. यंदाच्या वर्षी १९ मे रोजी जेनेटिक इंजिनिरअरिंग अप्रायजल कमिटीची १३९ वी बैठक पार पडली. जनक व बीएसएस -७९३ या आपल्या दोन संकरित बीटी बांग्याच्या वाणांच्या जैवसुरक्षिता संशोधन चाचणा घेण्यासाठी संमती मिळावी असा अर्ज बेजोशीतल या बियाणे उद्योगातील कंपनीने जीईएसी कडे केला होता. त्यावर बैठकती चर्चा झाली .
या वाणांमध्ये बीटी क्राय वन एफए वन या जनकाचा समावेश केला आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार, छत्तीसगड, झारखंड , तमिळनाडू, ओरिसा व बंगगाल या राज्यात संबंधित कंपनीला या चाचण्या घ्यायच्या आहेत. यापुर्वी २००९ व २०१० या हंगामात कंपनीने जालना, गुंटूर व वाराणसी येथे जैवसुरक्षिता चाचण्या यशस्वी पूर्ण केल्या. त्यानंतर २०१६-१७ मध्ये महाराष्ट्रासह गुजरात, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश., नवी दिल्ली व आंध्र प्रदेशातही चाचण्यांचा दुसरा टप्पाही कंपनीने पूर्ण केला.
बीटी वांग्याचे देशातील प्रवास
महाराष्ट्रातील खाजगी कंपनीने बीटी वांगे विकसित केल्यानंतर २००२ ते २००६ या कालावधीपर्यंत त्याच्या प्रक्षेत्र चाचण्या पुर्ण. जीईएसी कडून ऑक्टोबर २००९ मध्ये त्यास संमती. पण जीएम जीएम तंत्रज्ञानाचे विरोधक व पर्यावरणवाद्यांकडून देशभरात आंदोलने उभारुन त्याला विरोध त्यानंतर तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांच्याकडून देशभरातून जन सुनावणी. त्यानंतर २०१० मध्ये बीटी वांग्याच्या मंजुरीला स्थगिती.
बीटी वांगे तंत्रज्ञान
या पिकात फळ व शेंडा पोखणारी अळी फळाच्या आत राहून नुकसान करते. त्यामुळे रासायनिक फवारणीद्वारे नियंत्रण अवघड पिकांचे वार्षिक नुकसान ५१ ते ७३ टक्क्यांपर्यंत त्यामुळे बीटी तंत्रज्ञानाचा वापर करुन वांगे विकसित करणे. बीटी कपाशीतील बॅसिलस थुरींनजेंसीस जिवाणूतील क्राय वन एसी हा जनुक वांग्यात प्रत्यारोपीत खाजगी कंपन्यांकडून संकरित वाणांमध्ये हा प्रयोग करण्यात आला. धारवाड कृषी विद्यापीठ तामिळनाडू कृषी विद्यापीठाकडूनही बीटी वांगे विकसित झाले.
दरम्यान जीईएसीकडून संमतीसाठी काही शर्ती ठेवल्या आहेत. संबंधित राज्याच्या कृषी विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल. जीईएससीच्या मार्गदर्शक सुचनांनुसार चाचण्यांचे ठिकाण, क्षेत्र, विलगीकरण, अंतर याबाबत सविस्तर माहिती देणे बंधनकारक असेल. प्रत्येक चाचणीशी संबंघधित प्रमुख शास्त्रज्ञाची माहिती , चाचण्यांच्या निष्कर्षांची स्थानिक पंचायत जैवविविधता व्यवस्थापन समितीसोबत देवाणघेवाण करावी लागणार.
Published on: 20 September 2020, 04:12 IST