Agripedia

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर, वाशिम,

Updated on 20 October, 2022 8:19 PM IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर, वाशिम, वर्धा व बुलढाणा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीमुळे विद्यापीठाचा परिसर फुलून गेला होता. वरूणराजाच्या कृपेमुळे आज शेतकरी आणि शास्त्रज्ञांच्या उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभाग, सेंद्रिय शेती प्रात्यक्षिक प्रकल्प, भरडधान्ये प्रक्रिया केंद्र, काढणी पश्चात शेतमाल प्रक्रिया केंद्र, कापूस संशोधन केंद्र, अखिल भारतीय समन्वित संत्रा वर्गीय फळे संशोधन केंद्र, ज्वारी संशोधन केंद्र, कडधान्य संशोधन केंद्र, तेलबिया संशोधन केंद्र, कोरडवाहू शेती संशोधन

प्रकल्प, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग, नागार्जुन वनौषधी विभाग या ठिकाणी शेतकऱ्यांची आचाट गर्दी बघावयास मिळाली.Nagarjuna Herbs Department saw a rush of farmers at this place.

शेतकऱ्यांची दिवाळीही पावसातच जाण्याची शक्यता, महाराष्ट्रावर घोंगावतंय चक्रीवादळाचे संकट

ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून मानवरहित फवारणी तंत्र विकसित करण्यात आले आहे. यामुळे पिकांवर अचूकपणे फवारणी करणे शक्य झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशकांमुळे होणाऱ्या संभाव्य विषबाधांना आळा बसणार आहे. विद्यापीठातर्फे काही खाजगी कंपन्यांच्या सहकार्यातून ड्रोन फवारणी तंत्राचे प्रात्यक्षिक मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर आयोजित केले होते. या तंत्राचा वापर करून केवळ आठ ते दहा मिनिटांमध्ये आठ लिटर

पाण्यात एक एकर क्षेत्रावर फवारणी करणे शक्य आहे. त्यामुळे ड्रोन फवारणी तंत्राविषयी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड कुतूहल जागृत झाल्याचे दिसून आले.'अंबा' व 'सुवर्णसोया वाण ठरले विशेष आकर्षणाचे केंद्र विद्यापीठाच्या अंबा व सुवर्णसोया या नवीन सोयाबीन वानांची शेतकऱ्यांमध्ये विशेष रुची दिसून आली. विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्रावर या दोन्ही वानांविषयक पीक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांकरिता उपलब्ध आहे. या वाणांचे बियाणे काही निवडक शेतकऱ्यांना लागवडी करता या अगोदरच उपलब्ध करून दिलेले आहे. अति पावसाच्या परिस्थितीतही अंबा या वानाने एकरी 15 क्विंटल चा उतारा दिल्याचे काही शेतकऱ्यांनी नमूद केले.

विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढवण्याकरता १. पिकाच्या उत्पादनात दुपटीने वाढ करणे, २. शेतीला लागणारा खर्च निम्म्यावर आणणे आणि ३. शेतीला पूरक असा जोडधंदा अवलंबिने या त्रिसूत्रीचा वापर करण्यास सांगितले आहे. यास अनुसरून विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाने गोवंशाच्या विविध देशी प्रजातींचे प्रदर्शन करीत वर्षभर हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी चारा पिकांच्या विविध जातींची लागवड पद्धती तथा स्वच्छ दूध उत्पादन यासह दुग्ध प्रक्रिया निर्मितीसाठीचे तंत्रज्ञान प्रदर्शित करीत शेतीला अत्यंत महत्त्वाच्या

समजल्या जाणाऱ्या पूरक व्यवसायाचा उत्तम नमुना सादर केला आहे..शेतीला पूरक व्यवसाय तसेच ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मितीच्या मूळ उद्देशाने विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागांतर्गत पीकेव्ही कचरा ज्वलित शुष्कक, पीकेव्ही मिनी दाल मिल, पीकेव्ही सफाई व प्रतवारी यंत्र, पीकेव्ही स्क्रू पाँलिशर, पीकेव्ही मिरची बीज निष्कासन यंत्र, पीकेव्ही फळ प्रतवारी यंत्र, चेरी टूटीफ्रूटी सयंत्र, पीकेव्ही हिरवा हरभरा गाठी तोडणी यंत्र, पीकेव्ही हिरव्या शेंगा सोलणी यंत्र, पीकेव्ही कांदा लोडींग

अनलोडिंग यंत्र, हळद कापणी यंत्र, सिताफळ गर व बीज निष्कासन यंत्र, कांदा प्रतवारी यंत्र, लाखोळी डाळ मिल इत्यादी यंत्रांचे कृती प्रात्यक्षिकासह दर्शविण्यात आलेव्यापारी शेतीच्या दृष्टिकोनातून नागार्जुन वनौषधी विभागातर्फे विविध औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवड तंत्र सह तिखाडी तेल, पानपिंपळी गवती चहा तेल, अश्वगंधा चूर्ण, अडुळसा चूर्ण या उत्पादनासह विविध औषधी सुगंधी वनस्पतीं चे बियाने खरेदी करणे करता उपलब्ध करून दिली

गेली.आजच्या दुसऱ्या दिवशी चर्चासत्रा सत्रात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना शास्त्रज्ञांनी सविस्तर उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन केले. यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख, शेतकरी प्रतिनिधी श्री. नारायण बारड रा. मंगरुळपीर, श्री. संतोष घुगे रा. पातूर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक संशोधन डॉ. व्हि. के. खर्चे, अधिष्ठाता कृषि अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या व इतर मान्यवर उपस्थित होते.

English Summary: The second day of Shivar Pheri is a blooming Shivar and overflowing enthusiasm
Published on: 20 October 2022, 01:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)