1. कृषीपीडिया

फुलकोबी लागवडीच्या माध्यमातून येईल आर्थिक संपन्नता, अशा पद्धतीने लागवड करणे ठरेल फायदेशीर

जर आपण कोबी या पिकाचा विचार केला तर कोबीवर्गीय भाज्यांमध्ये कोबी, फुलकोबी,नवलकोल,ब्रुसेल्स स्प्राऊटआणि ब्रोकोली या पिकांचा प्रामुख्याने समावेश होतो.ही पिके थंड हवामानात होणारे असून सुधारित तसेच संकरित जातीच्या उपलब्धतेमुळे त्यांची लागवड समशीतोष्ण आणि उष्ण हवामानात यशस्वीपणे करता येते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cauliflower crop

cauliflower crop

जर आपण कोबी या पिकाचा विचार केला तर  कोबीवर्गीय भाज्यांमध्ये कोबी, फुलकोबी,नवलकोल,ब्रुसेल्स स्प्राऊटआणि ब्रोकोली या पिकांचा प्रामुख्याने समावेश होतो.ही पिके थंड हवामानात होणारे असून सुधारित तसेच संकरित जातीच्या उपलब्धतेमुळे त्यांची लागवड समशीतोष्ण आणि उष्ण हवामानात यशस्वीपणे करता येते.

या  लेखात आपण कोबीवर्गीयभाजीपाला पैकी फूलकोबी या पिकाची लागवड पद्धती विषयी माहिती घेऊ.

 फुलकोबी( फ्लावर)ची सुधारित लागवड पद्धत

  • जमीन- फुलकोबीच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू साडेपाच ते 6.6 असावा.
  • हवामान- फुलकोबी हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे.मात्र तापमानाच्या बाबतीतहे पीक अत्यंत संवेदनशील आहे.ठराविक तापमानाला येणाऱ्या फुलकोबीच्या जातींची त्या ठराविक हंगामात लागवड केलीतरच या जातीपासून अपेक्षित उत्पादन मिळू शकते. हळव्या किंवा लवकर येणारा जातीना उष्ण हवामान(गड्डा धरतांना 25 ते 27 अंश सेल्सिअस) आणि दीर्घ काळ सूर्यप्रकाश पोषक ठरतो.पिकाच्या वाढीच्या काळात तापमान खाली गेल्यास गड्डा अतिशय लहान तयार होतो.गरव्या किंवा उशिरा तयार होणाऱ्या स्नोबॉल सारख्या जातींसाठी सुरुवातीपासूनच थंड हवामान( 10 ते 16 अंश सेल्सिअस ) आणि छोटे दिवस मानवतात.

फुलकोबीच्या लवकर येणाऱ्या जाती

 पंजाब कवारी,अर्ली कुवारी, फर्स्ट क्रॉप,पुसा दिपाली, पुसा केतकी इत्यादी

 फुलकोबीच्या उशिरा येणाऱ्या जाती

 पुसा स्नोबॉल,  स्नोबॉल इत्यादी

 फुलकोबी लागवड पद्धत

 एक हेक्‍टर लागवडीसाठी हळव्या, निमगरव्या या जातींचे सहाशे ते सातशे पन्नास ग्रॅम बी लागते. तर गरम या आणि स्नोबॉल गटातील जातीचे हेक्‍टरी 375 ते 400 ग्रॅम बी पुरेसे होते.संकरित वाणांचे बी 250 ते 300 ग्रॅम लागते. सर्वसाधारणपणे तीन ते पाच आठवड्यांत रोपे तयार झाल्यानंतर मुख्य शेतात खरीप हंगामात सरी-वरंब्यावर तर रब्बी व उन्हाळी हंगामात सपाट वाफा पद्धतीने 45 बाय 45 सेंटिमीटर अंतरावर रोपांची लागवड करावी.रोपांची पुनर्लागवड संध्याकाळच्या वेळी करावीव लगेच पाणी द्यावे.

 फुलकोबी साठी अन्नद्रव्य व्यवस्थापन

 हेक्‍टरी 20 टन शेणखत तसेच दीडशे किलो नत्र, 75 किलो स्फुरदआणि 75 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. यापैकी 50 टक्के नत्र,संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी तर उरलेले 50 टक्के नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे.

 फुलकोबी साठी आंतर मशागत आणि पाणी व्यवस्थापन

 15 ते 20 दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करावी. तसेच आठ ते दहा दिवसांच्या अंतराने व गरजेनुसार पिकाला पाणी द्यावे. फुलकोबीची मुळे उथळ असल्यामुळे खोलवर खुरपणी किंवा खांदणी करू नये. गड्डा धरू लागल्यानंतर रोपांना भर द्यावी.

त्यामुळे गड्ड्याच्या वजनाने रोपे कोलमडणार नाहीत.गडड्यांचा रंग पांढरा राहण्यासाठी गड्डे धरण्यास सुरुवात झाल्यानंतर त्या भोवतालच्या पानांनी गड्डेझाकून घ्यावेत. त्यामुळे प्रत्यक्ष सूर्यप्रकाश गड्यावर पडून ते पिवळे न पडता दुधाळ, पांढऱ्या रंगाचे, आकर्षक राहतात.

 फुल कोबीची काढणी आणि उत्पादन

 हळव्या जाती लागवडीपासून 60 ते 90 दिवसांत काढणीस तयार होतात.  तर निमगरव्या जाती 90 ते 120 दिवसांत तयार होतात.लवकर येणाऱ्या जातींचे 150 ते 200 क्विंटलतर उशिरा येणाऱ्या जातींचे 200 ते 250 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादन मिळते.

English Summary: the proper method of cultivation of cauliflower for more production Published on: 15 February 2022, 04:50 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters