शेतकरी हे पिकांची लागवड करतात, तेव्हापासून तर ते पीक काढण्याची पर्यंत विविध प्रकारच्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पिकांवर होणारा किडीचा प्रादुर्भाव ही सगळ्यात मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर असते. आता खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन,मका आणि भात या पिकांची लागवड केली आहे.
परंतु या पिकावर पडणारा पाऊस, नेहमीचे ढगाळ हवामान यामुळे किडींचा प्रादुर्भाव होण्याचा धोका देखील जास्त असतो. त्यामुळे शेतकरी विविध प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर किडींच्या नियंत्रणासाठी करतात.
या बाबतीत जर आपण भात पिकाच्या विचार केला तर यामध्ये खोडकीड म्हणजेच स्टेम बोरर ही कीड खूपच घातक असून त्यामुळे तांदळाची गुणवत्ता आणि उत्पादनात लक्षणीय घट होते.
भात पिकाच्या कुठल्याही टप्प्यात या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या आणि इतर हानिकारक किडीपासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी सुमील केमिकल्स लिमिटेडने जगातील पहिले ड्राय कॅप तंत्रज्ञान पेटंट केलेले उत्पादन ब्लॅक बेल्ट लॉंच केले आहे.
ब्लॅकबेल्ट बद्दल माहिती
हे CIB च्या 9(3) नोंदणी अंतर्गत विकसित ड्राय कॅप तंत्रज्ञान उत्पादन आहे. त्यांना हानिकारक असणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी अनेक पटींनी प्रभावी असल्याचे देखील आढळून आले आहे. या उत्पादनाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पिकांचे नुसते कीटकांपासून रक्षण करते असे नव्हे तर कीटकांच्या प्रभावी प्रतिबंधासाठी देखील हे वापरले जाऊ शकते. हे उत्पादन प्रति एकर 270 ते 300 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
ब्लॅक बेल्ट हे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह तयार करण्यात आले असून किडींच्या नियंत्रणासाठी प्रभावी आहे. हे उत्पादन जलदपणे क्रिया करते व दीर्घकाळ नियंत्रण करण्यास सक्षम आहे. तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील ते सुरक्षित असून ते त्याचे कोणतेही अवशेष सोडत नाही आणि मानवाला देखिल अनुकूल आहे.
Published on: 12 August 2022, 05:44 IST