शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते त्यामधला एक महत्त्वाचं संकट म्हणजे वातावरणातील बदल. याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे वातावरणातील काही बदल होतात त्यामुळे पिकांमध्ये ही बदल होतो व त्यांचे अन्न ग्रहण करण्याची क्रिया ही बदलत असते त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.कोणत्या वातावरणात वनस्पती सर्वाधिक जास्त अन्नद्रव्य उचलते?सर्वसाधारणपणे असे दिसून आले आहे की 23 डिग्री सेल्सियस ते 36 डिग्री सेल्सिअस तापमानात वनस्पती सर्वाधिक जास्त अन्नद्रव्ये स्वतःकडे घेते जसे जसे तापमान 15 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी व्हायला लागते तसे तसे वनस्पतीची अन्नद्रव्य उचलण्याची क्षमता कमी कमी होऊ लागते याउलट तापमान 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यास पुन्हा एकदा वनस्पतींच अन्न उचलण्याची क्षमता कमी होऊ लागते.तापमान कमी झाल्यास वनस्पतीवर कोणता परिणाम होतो?- सर्वसाधारणपणे सहा डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान झाल्यास वनस्पतीचा अन्न उचलण्याचा रेशो खूप कमी झालेला असतो अशा वेळेस वनस्पती तानाखाली येते ,फळधारणा फुलं धारणा कमी होते फळाची फुगवण होत नाही दिलेले खत वाया जाण्याची शक्यता असते ,कमी तापमानात वेलीच्या नवीन फुटी थांबतात शेंडे फुटत नाही शेंडा वाढत नाही.
कमी तापमानात म्हणजेच थंडीच्या दिवसात वनस्पतीला अन्नघटक कसे द्यावे?कमी तापमानात म्हणजेच जास्त थंडीत शक्यतो वनस्पतिंना अन्न मुळांवाटे न देता पानांकडून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते कारण पानांची अन्नग्रहण करण्याची क्षमता त्यावेळेस मुळांपेक्षा निश्चितच चांगले असते अशा वेळेस दर चार दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्य सोबत मुख्य अन्नद्रव्य असे मिश्रण करून फवारल्यास वनस्पती तानाखाली येत नाही.जमीनचा पीएच (सामू) कमी जास्त झाल्याने काय फरक पडतो?जमिनीचा पीएच सामू हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे . अन्नद्रव्य संबंधित सर्व समस्यांचे निराकरण सामुशी निगडित असते.आठ-साडेआठ पेक्षा जास्त सामू वाढल्यास वनस्पतीकडून अन्न उचलण्यामध्ये अडथळे निर्माण होतात किंवा अन्न कमी उचलले जाते ,तसेच सामू कमी झाला (5-5.5)तरीही अडथळे येतात.6.5 ते सातच्या दरम्यान सामू सर्वात उत्कृष्ट असतो यात सर्वाधिक जास्त अन्न उचलले जातात.कमी झालेल्या पीएच वाढवण्यासाठी काय करावे?पीएच कमी होणे म्हणजेच जमीन ऍसिडिक होते.ज्याला आपण जमिनीची आम्लता वाढली असे म्हणतो अशा वेळेस राख टाकून पीएच वाढवता येतो किंवा क्लोराईडयुक्त खतांचा वापर जरी केला तरीही आम्लता कमी होत पण कोकण भाग सोडला तर आपल्याकडे आमलधर्मी जमिनी जवळपास नाहीयेत.
वाढलेला पीएच कमी करण्यासाठी काय करावे?जमिनीचा पीएच वाढतो म्हणजेच जमिनीमध्ये अल्कलाईड वाढले असतात, ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी झालेला असतो सर्वसाधारणपणे अशा जमिनीमध्ये पीएच वाढतो.अशावेळी सेंद्रिय खतांचा, निविष्ठांचा वापर वाढवावा जसे की शेणखत कंपोस्ट, खत ,गांडूळ खत, हिरवळीचे खत यांचा वापर वाढवावा सूक्ष्मजीवांचा काउंट वाढवण्याचा प्रयत्न करावा, सूक्ष्मजीव वाढीला लागण्यासाठी पोषक वातावरण जमिनीमध्ये तयार करणे.जमिनींचा Ph वाढल्यास कोणकोणते अन्नद्रव्य उचलण्याचे प्रमाण कमी होते?-जमिनीचा पीएच वाढल्यास मुख्यतः स्फुरद नत्र कोपर मँगेनीज सिलिकॉन यांचे प्रमाण कमी होते.- चुनखडी जमिनीच्या कोणत्या कोणत्या समस्या असतात?चुनखडी जमिनीत अन्नद्रव्य फिक्स होण्याचे प्रमाण वाढते .वनस्पतींना अन्नद्रव्याचा पुरवठा होण्यासाठी अडथळा तयार होतो.अशा जमिनीमध्ये पाने पिवळी पडणे शेंडा थांबणे कमी होणे फळ फुलधारणा कमी होण अशा समस्या तयार होतात.चुनखडी जमिनीत काय काय उपाययोजना कराव्यात?
- चुनखडी जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवावं,जसे शेणखत ,कंपोस्ट खत ,हिरवळीच्या खतांचा वापर वाढवावा .मल्चिंग कायम करावी जमिनीची सतत मशागत करावी आणि अन्नद्रव्य देताना क्लोराईड युक्त खतांचा वापर कमी करावा स्लरीचा वापर वाढवावा.चुनखडी जमिनीत कोणते कोणते अन्नद्रव्य जास्त द्यावे कोणते कमी द्यावे?- चुनखडी जमिनीत लोह, स्फुरद ,नत्र, पालाश तांबे ,जस्त ,जास्त द्यावे लागतात.चुनखडी जमिनीत कॅल्शियम कमी द्यावा लागतो. चुनखडी जमिनीत स्फुरद उचलण्यासाठी मॅगेनीज सल्फेट चा वापर वाढवावा लागतो.फेरस सल्फेट दिल्यास त्याचा फायदा चुनखडी जमिनीत जास्त होतो. सल्फरचा वापर वाढवणे हे अधिक फायद्याचे ठरते.(गंधक) चे काय फायदे आहेत ?गंधक हा दुय्यम अन्नघटकात मोडला जातो. याचे अनेक फायदे आहेत जसे की तो अन्नद्रव्य असून ,अंडी नाशक पण आहे.जमिनीचा सामू नियंत्रित करण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा आहे इतर अन्नद्रव्यांना उचलण्यासाठी सल्फरची मदत होते.म्हणून सुद्धा काम करतो सल्फर हा उष्ण असल्याकारणाने थंडीच्या दिवसात जमिनीवर वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी आणि अन्नद्रव्याचे वनस्पतीला वहन करण्यासाठी फायद्याचा ठरतो.
लेख संकलित आहे.
Published on: 08 June 2022, 08:23 IST