Agripedia

शेतकरी मित्रांनो आज आपण जाणुन घेणार आहोत एक महत्वपूर्ण पिकाविषयीं जी आपणांस मालामाल देखील बनवू शकते.मिल्क थिसल ही एक औषधी वनस्पती आहे.आणि विशेष म्हणजे ह्या वनस्पतीचे उत्पादन हे दुष्काळी भागात देखील घेता येऊ शकते. म्हणुन पाण्याच्या अभाव असणाऱ्या शेतकरी देखील कमी पाण्यात ह्या पिकांचे उत्पादन अगदी सहजरीत्या घेऊ शकता. एवढेच काय आता सरकार देखील ह्या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे. चला तर मग जाणुन घेऊया ह्या बहुमूल्य वनस्पतीच्या लागवडीविषयी.

Updated on 24 August, 2021 4:43 PM IST

शेतकरी मित्रांनो आज आपण जाणुन घेणार आहोत एक महत्वपूर्ण पिकाविषयीं जी आपणांस मालामाल देखील बनवू शकते.मिल्क थिसल ही एक औषधी वनस्पती आहे.आणि विशेष म्हणजे ह्या वनस्पतीचे उत्पादन हे दुष्काळी भागात देखील घेता येऊ शकते. म्हणुन पाण्याच्या अभाव असणाऱ्या शेतकरी देखील कमी पाण्यात ह्या पिकांचे उत्पादन अगदी सहजरीत्या घेऊ शकता. एवढेच काय आता सरकार देखील ह्या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे. चला तर मग जाणुन घेऊया ह्या बहुमूल्य वनस्पतीच्या लागवडीविषयी.

 

शेतकरी मित्रांनो आधी आपण जाणुन घेऊयात मिल्क थिसल विषयी (information about milk thisal in marathi)

मिल्क थिसल एक बहुउपयोगी औषधी वनस्पती (medicinal plant)आहे. ह्या वनस्पतीचे नावात जरी मिल्क शब्द असला तरी ह्याचा दुधाशी तिळमात्रही संबंध नाही. ह्या वनस्पतीची लागवड हळूहळू का होईना भारतात लोकप्रिय बनत आहे. तरीदेखील पाहिजे तशी ह्याची माहिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहचलेली दिसत नाही.

सरकार देखील ह्या पिकाच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात अग्रेसर दिसत आहे. ह्या पिकाची लागवड शेतकरी कोणत्याही प्रकारच्या जमिनीत करू शकता. हे पिक सहजरीत्या कुठल्याही जमिनीत येऊ शकते.ह्या पिकाचे एक महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे ह्या पिकाची लागवड कमी पाण्याच्या ठिकाणी देखील केली जाऊ शकते, तसेच ह्या पिकाच्या लागवडीसाठी खुप कमी खर्च येतो व उत्पन्न खुप जास्त असते.

ही वनस्पती औषधीगुणांनी भरपूर अशी असते. ही वनस्पती सहा महिन्यातच तयार होते म्हणजे कमी कालावधीत येणारे पिक आपण ह्याला मानू शकतो. साधारणतः एप्रिल महिन्यात ह्याच्या बीयांची पेरणी केली जाते. मिल्क थिसल एक काटेरी झाडी वनस्पती आहे. ह्या वनस्पतीची लांबी सुमारे 2.5-3 फुटपर्यंत असते. ह्या वनस्पतीच्या बिया ह्या औषधी उपयोगी असतात. ह्या वनस्पतीच्या फुलांमध्ये बिया असतात. एवढेच नव्हे तर ह्या वनस्पतीचे सर्व भाग औषधी आहेत असे सांगितले जाते व पानाचा देखील औषध म्हणुन वापर केला जातो.

 

 

पेरणी काळजीपूर्वक करावी (Milk Thisal's Sowing should be done carefully)

मिल्क थिसल लागवडीला जास्त पाणी लागत नाही. मिल्क थिसलची लागवड सामान्य शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी गेल्या दशकापासून प्रयत्न सुरू आहेत. माझे हर्बल गाईड मध्ये ही औषधी वनस्पती वाढवण्याची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली आहे. भारतीय शेतकऱ्यांसाठी मिल्क थिसल हे अजूनही एक नवीन पीक आहे. मात्र ही माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

 

मिल्क थिसलच्या फुले आणि बिया यकृत आणि पित्त नलिकांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जातात.  या व्यतिरिक्त, हे अनेक आजारावर  फायदेशीर असल्याचे मानले जाते.

 

मिल्क थिसल च्या बियाण्याची  पेरणी काळजीपूर्वक करावी. मिल्क थिसल लागवडीसाठी चिकण माती असलेली जमीन सर्वात योग्य मानली जाते. देशाची जवळजवळ निम्मी शेती गाळाच्या जमिनीवर केली जाते. या जमिनीत नायट्रोजन आणि पोटॅशचे प्रमाण कमी असते. पण चांगली गोष्ट अशी आहे की मिल्क थिसल या जमिनीत देखील पिकवता येते व त्याचे उत्पादनावर काही फरक पडत नाही.

 

 

 

 

 

मिल्क थिसल लागवडीकडे वाढतोय लोकांचा कल

काळी माती आणि लाल मातीमध्येही मिल्क थिसलची लागवड करता येते. पण हे लक्षात ठेवावे लागेल की शेतात पुरेशी पाण्याच्या निकासाची सुविधा असावी. पेरणीपूर्वी शेताची दुबार नांगरणी करणे आवश्यक आहे. मग फळी चालवून शेत समतल केले जाते. शेतात तण नकोय.

मिल्क थिसलचे बियाणे तयार शेतात सुमारे अर्धा इंच खोलीवर पेरली पाहिजेत. पेरणीपूर्वी अंकुरणासाठी मातीमध्ये योग्य खत टाकावे . मिल्क थिसलचे बियाणे तीन ते चार बियांच्या गटात लावावे. पेरणीनंतर तुषार सिंचनाचा वापर योग्य पर्याय ठरू शकतो.

 

मिल्क थिसलचे पिक उगवण्यासाठी 10 ते 12 दिवस लागतात. आपण ते घरी भांड्यामध्ये देखील वाढवू शकता. मिल्क थिसल लागवड करणारे शेतकरी म्हणतात की त्याची मागणी आणि लोकप्रियता खूप वाढत आहे आणि भारत त्याची निर्यात करत आहे. जर तुमच्याकडे हलकी माती असलेली जमीन असेल तर ह्या पिकाची लागवड करणे आपल्यासाठी उत्तम परिणाम देणारे ठरू शकते. कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारे हे पिक आहे.

 

 

 

 

Source- DD Kisan

English Summary: the process of cultivation of milk thesal
Published on: 24 August 2021, 04:43 IST