सन-२०२२/२३ चा ऊस गळीत हंगाम सुरू होतोय,यानिमित्ताने शेतकऱ्यांनी आता नीट डोळे उघडून आपल्या ऊसशेती आणि कारखानदारी आणि उसशेतीच अर्थकारण याचा जरा अभ्यासूपणे,व्यापारी दृष्टीने गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील ५/६ वर्षात ऊसाचा दर २८०० ते ३००० या पटीतच अडकवला गेलाय.मात्र मागील ५/६ वर्षात या तुलनेत ऊस उत्पादनाचा भांडवली खर्च किती पटीत वाढलाय ? याचाही डोळसपणे विचार आणि अभ्यास करणे आवश्यक आहे. येत्या हंगामात सुद्धा सरासरी
२८०० ते ३००० याच घरात ऊसदर (तथाकथित एफ आर पी)घुटमळणार आहे.
तिची श्रमाची आराधना, तिची शेतीची साधना
कारखानदारांनी आणि सरकारनेही तथाकथित एफ आर पी चा कायदा (रास्त आणि1 किफायतशीर भाव) करून शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून पद्धतशीर फसवणूक केली आहे.कारण हा किफायतशीर भाव आहे.मात्र तो शेतकऱ्यांना न्हवे,तर कारखानदारांना आहे;हे उघड वास्तव आहे. एफ आर पी च्या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांना लुटण्याचे उद्योग सुरू आहेत.
गेल्या पाच सहा वर्षात खते, शेतीचीऔषधे, मजुरी,पेट्रोल/डिझेल, मशागत,शेती पंपाची वीजबिले या सर्व भांडवली खर्चात सरासरी दीडपट ते दुप्पट वाढ झाली आहे रासायनिक खतांची ९०० रु. ची बॅग आज १५००/१६००/१७०० रु.वर जाऊन पोहचली आहे.ठिबक सिंचनासाठी लागणारी विद्राव्य खतांची किंमत दुप्पट/अडीचपट झाली आहे.मजुरीत दुप्पट/तिप्पट वाढ झाली आहे.डिझेल दर वाढल्याने मशागतीचा खर्च दीडपट वाढला आहे.शेती औषधांची तीच तऱ्हा आहे.असे असताना उसाला मिळणारा दर मात्र गेली पाच/
सहा वर्षे एखाद्या डबक्यात रुतलेल्या रेड्यासारखा एका जागेवरच अडकून पडला आहेकराड तालुक्याचेच उदाहरण घेऊया,२०१६/१७ च्या हंगामात कृष्णा आणि सह्याद्री या कारखान्यांनी साधारण ३२००रु दर दिला होता.तर याच दोन कारखान्यांनी पाच वर्षानंतर म्हणजे २०२१/२२ ला २८००/२९०० अंतीम दर दिला आहेपाच वर्षांपूर्वी दिलेल्या दरापेक्षा ३००/४०० रु कमी दर शेतकऱ्यांना देण्यात आला आहे, हे कुठल्या अर्थशास्त्रात बसते ?.याचा सुज्ञ अन सुशिक्षित शेतकऱ्यांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे.कारण
वर उल्लेख केल्याप्रमाणे पाच वर्षात भांडवली खर्च तब्बल दिडपटीने/दुपटीने वाढला असताना उसाला अंतीम दर कीती मिळाला पाहीजे,याचा शेतकऱ्यांनी अभ्यासू पणे विचार केला पाहीजे..वर उल्लेख केल्याप्रमाणे ऊसाचा दर गेल्या पाच/सहा वर्षात २७००/२८०० ते ३००० या पटीतच कसा पद्धतशीर पणे अडकवला गेलाय याचा वानगीदाखल उदाहरण म्हणून सह्याद्री कारखान्याच्या मागील पाच वर्षांच्या आकडेवारी वरून शेतकऱ्यांनी अभ्यास करावा.(सह्याद्री चे उदाहरण वानगीदाखल आहे एकंदरीत बहुतांश कारखाने यातच अंतर्भूत होतात).
शिवाजीराव पाटील (रा.कराड,जि-सातारा)
Published on: 09 October 2022, 03:16 IST