Agripedia

गादीवाफ्याची रुंदी एक मीटर, उंची 50 सेंमी. आणि लांबी गरजेनुसार ठेवतो.

Updated on 24 September, 2022 9:10 PM IST

गादीवाफ्याची रुंदी एक मीटर, उंची 50 सेंमी. आणि लांबी गरजेनुसार ठेवतो. साधारणपणे रोपवाटिकेतील एक गुंठा क्षेत्राला एक किलो निंबोळी पावडर आणि 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा मिसळून देतो.पेरणीपूर्वी एका किलोस एक ग्रॅम कार्बेन्डाझिमची

बीजप्रक्रिया करतो. एका चौरस मीटरला सहा ते दहा ग्रॅम बियाणे पडेल,Six to ten grams of seed will fall per square meter याप्रमाणे बियाण्याची पेरणी करतो.

हे ही वाचा - झिंक ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे मका पिकामध्ये महत्व व वापरण्याची पद्धत

गादीवाफ्यावर दोन ओळींत 2.5 सें.मी. अंतर ठेवून बियाणे एक सें.मी. खोलीवर पेरतो.

तुषार सिंचनाने एक दिवसाआड पाणी दोन तास रोप उगवून येईपर्यंत पाणी देतो. त्यानुसार गरजेनुसार पाणी दिले जाते. साधारणपणे 50 ते 60 दिवसांनी रोप पुनर्लागवडीत तयार होते.गादीवाफा पद्धतीने रोपवाटिका करण्याचा फायदा

म्हणजे बियांची उगवण चांगली होते.निंदणी करणे सोपे जाते.रोप चांगले तयार होते, अवकाळी पाऊस झाला तरी जादा पाणी सरीतून निघून जाते. त्यामुळे रोपांची मर होत नाही. रोपांची मर होत असेल, तर बुरशीनाशकाची आळवणी सोपी जाते.

 

विनोद धोंगडे नैनपुर ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

English Summary: The nursery is profitable in the Gadiwafa method
Published on: 24 September 2022, 07:22 IST