Agripedia

महाराष्ट्र मध्ये उन्हाळी हंगामात प्रामुख्याने कलिंगड,खरबूज, काकडी,दोडका, घोसाळी, कारली,भेंडी, गवार, वांगी, मिरची, चवळी इत्यादी भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. उन्हाळ्यामध्ये या भाजीपाल्याची योग्य व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते.

Updated on 18 February, 2022 6:26 PM IST

महाराष्ट्र मध्ये उन्हाळी हंगामात प्रामुख्याने कलिंगड,खरबूज, काकडी,दोडका, घोसाळी, कारली,भेंडी, गवार, वांगी, मिरची, चवळी इत्यादी भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. उन्हाळ्यामध्ये या भाजीपाल्याची योग्य व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते.

या लेखामध्ये आपण उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकाच्या लागवडीचे नियोजन व काळजी यांची सविस्तर माहिती घेऊ.

उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवड करताना घ्यायची काळजी

 उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवडीसाठी प्रमुख्याने अधिक सेंद्रिय कर्ब व पाणी साठवून ठेवणारी परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या सुपीक जमिनीची निवड करावी.

 जमिनीवर आच्छादनाचा वापर

 कोरडे व उष्ण वाऱ्यांपासून संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजूने शेवरी सारखे पिकाची अथवा वाफ्याभोवती मक्याचे दाट लागवड करावी. त्यासोबतच रोगप्रतिकारक जातींची निवड,सिंचनाच्या सुयोग्य व्यवस्थापन व रासायनिक व सेंद्रिय खतांची योग्य संतुलन याकडे व्यवस्थित लक्ष द्यावे. फळांची काढणी शक्यतो संध्याकाळी करावी. स्वच्छ ठिकाणी प्रतवारी व पॅकिंग,साठवण व योग्यवेळी मालवाहतूक या बाबींचा नियोजनपूर्वक एकत्रित वापर करावा. या सगळ्या गोष्टींचे नियोजन केले तर उत्तम प्रतीचा भाजीपाला हा ग्राहकांपर्यंत पोहोचत शकतो.

 उन्हाळ्यात खालील  भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन अशा प्रकारे करावे…..

  • भेंडी आणि गवार- उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या भेंडी व गवार या भाज्यांना मागणी सुद्धा भरपूर असते.भेंडी लागवड करताना हळद्या या रोगास प्रतिकारक्षम आशा परभणी क्रांती, अर्क अनामिका,पुसा सवानी,पंजाब पद्मनी या वाणांची निवड करावी.गवार लागवड करायची असेल तर पुसा सदाबहार,पुसा नवबहार यासारख्या भरपूर उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी.उन्हाळ्यात या पिकांना पाणी वेळेवर द्यावे व पिकांची तोडून संध्याकाळच्या वेळेस करावी.
  • वेलवर्गीय भाजीपाला पिके- यामध्ये प्रामुख्याने काकडी, कारले, दुधी भोपळा, दोडका इत्यादी प्रमुख भाजीपाला पिकांचा समावेश होतो.या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे ही कामे महत्त्वाचे आहेत.दर्जेदार, जास्तीच्या उत्पादनासाठी वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीच्या आधार द्यावा. कारली, दुधी भोपळा, दोडका इत्यादी कमकुवत वेल वर्गात मोडणारी पिके असून वेलींना चांगला आधार मिळाला त्यांची वाढ चांगली होते.

 मिरची, वांगी आणि टोमॅटो- या तिने पिकांची रोपे गादीवाफ्यावर तयार करावीत. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात गादी वाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागवड केली जाते. या पिकांमध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांचा प्रसार करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी दक्ष राहावे. मिरची लागवड करताना तिचे उत्पादन मार्च ते मे महिन्यात बाजारात येईल असे करावे.

  • लागवडीसाठी वान हा उंचशाकीय वाढणारा, फांद्या जास्त असणारा असणारा तसेच पोपटी ते गर्द हिरव्या रंगाच्या लांब मिरच्यांचा असावा. मिरची मध्ये फुले ज्योती या जातीमध्ये मिरच्या झुपक्यात येतात व झाडावर दाट पाने असतात. वांगी या पिकासाठी उंच व डेरेदार वाड असणारा काटेरी डेट,जांभळ्या, पांढऱ्या व हिरव्या रंगाची छटा एकत्र असणाऱ्या चमक असणारा, गोल किंवा उभट गोल फळे येणाऱ्या वाणाची निवड करावी. वांग्यामध्ये रंग व आकार यानुसार भाग निहाय विविधता आढळून येते. वांगी पिकास शेणखत व रासायनिक खते यांचा संतुलित वापर करावा. उन्हाळी हंगामात योग्य वेळी पाणी द्यावे. फळांची तोडणी पाच ते सहा दिवसांनी करावी. एकसारखे फळे बाजारात पाठवावी. टोमॅटो पिकासाठी वाहन निवडतांना प्रामुख्याने तो वाण अधिक पाने असणारा, उष्ण तापमानात फळधारणा होणारा तसेच लिफकर्ल व्हायरस या रोगास सहनशील व फळांना तडे न जाणारा निवडावा. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी.कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी होते. कांदा पात महाशिवरात्रीस कांद्याची रोपे टाकून त्याची लागवड गुढीपाडवा पर्यंत करावी. उन्हाळ्यात व आषाढी एकादशी पर्यंत कांद्याच्या पातीचे पैसे होतात.
  • कोथिंबीर- कोथिंबीर पिकास कोरडे हवामान चांगले मानवते. उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबिरीचे पीक कमी कालावधीत चांगले पैसे देऊन जाते. कोथिंबीर पिकाची लागवड करताना वाफे तयार करावेत. दर आठ दिवसांच्या अंतराने कोथिंबीरीची लागवड करावी.
  • राजगिरा, पोकळा, माठ व मेथी- उन्हाळी भाजीपाला मध्ये पालेभाज्या महत्त्वाचे आहेत. पालेभाज्या आपल्या आहारातील खनिजे,क्षारआणि जीवनसत्त्वे यांचा पुरवठा करणारे अगदी स्वस्त आणि सहज सुलभ नैसर्गिक स्रोत आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने पालेभाज्या या अल्प भांडवल,कमी क्षेत्रात तसेच कमी वेळात उत्पादन देतात. पालेभाज्या लागवडीसाठी पाण्याचा हमखास, सलग पुरवठा तसेच बाजारपेठ जवळ असणे व वाहतुकीची व्यवस्थित सोय असणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. उन्हाळ्यामध्ये कमी वेळेत चांगला पैसा मिळवायचा असेल तर राजगिरा, पोकळा, माठ व मेथी या पालेभाज्या घेतल्या जातात.
English Summary: the management of summer session vegetable crop imprtant for more production
Published on: 18 February 2022, 06:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)