Agripedia

जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असले तसेच जमिनीत आम्लाचे प्रमाण जास्त असणेवगैरे कारणांमुळे पिकांच्या वाढीस व अन्नद्रव्य पुरवठा प्रक्रियेत अडचणी निर्माण होतात. महाराष्ट्रात कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमिनी मोठ्या प्रमाणात आढळतात.

Updated on 12 October, 2021 12:44 PM IST

जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असले तसेच जमिनीत आम्लाचे प्रमाण जास्त असणेवगैरे कारणांमुळे पिकांच्या वाढीस व अन्नद्रव्य पुरवठा प्रक्रियेत अडचणी निर्माण होतात. महाराष्ट्रात कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमिनी मोठ्या प्रमाणात आढळतात.

विशेषतः अवर्षण प्रवण क्षेत्र,जास्त उष्णता व कोरडे हवामान, कमी पाऊस तसेच बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या विम्लधर्मीय जमिनीतील मातीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात विखुरलेली दिसते. या लेखात आपण चुनखडीयुक्तजमिनीचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती घेऊ.

 अशा पद्धतीने करावे चुनखडीयुक्त जमिनीची सुधारणा व्यवस्थापन

  • जमिनीची खोलवर नांगरट करावी.
  • जमिनीत सेंद्रिय खते शिफारस केल्याप्रमाणे दरवर्षी टाकावे. शेणखताचा अपुरा पुरवठा असल्यास हिरवळीची पिके जसे की ताग, चवळी पेरूनतीपंचेचाळीस ते पन्नास दिवसात फुलोऱ्यात आल्यावर जमिनीत गाडावे.
  • चुनखडीयुक्त जमिनीत आंतरपीक म्हणून द्विदल पिकांचा समावेश करावा.
  • रासायनिक खते पृष्ठभागावर फेकून न देता ती पेरून द्यावी अथवा मातीआड करावीत.
  • रासायनिक खतांचा वापर करताना माती परीक्षणाद्वारे नत्र हे अमोनियम सल्फेट द्वारे द्यावे. स्फुरद हे डाय अमोनिअम फॉस्फेट द्वारे द्यावे आणि पालाश शक्यतो सल्फेट ऑफ पोटॅश द्वारे पिकांना द्यावीत.
  • जमिनीत मॅग्नेशियम सल्फेट एकरी 10 ते 15 किलो सेंद्रिय खतात मिसळून द्यावे.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर माती परीक्षणानुसार करावा. उदा. लोहासाठी फेरस सल्फेट हेक्‍टरी 25 किलो, जस्ताच्या कमतरता साठी झिंक सल्फेट हेक्‍टरी 20 किलो, बोराणा साठी बोरॅक्‍स पाच किलो प्रति हेक्‍टरी किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड एक हेक्‍टरी 25 किलो या प्रमाणात जमिनीतून सेंद्रिय खतात मिसळून पिकांना द्यावे.
  • चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरद खतांचा वापर करताना हे सेंद्रिय खतांमध्ये मिसळून द्यावी.
  • चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुपरफास्ट देताना ते सरळ जमिनीत न मिसळता कंपोस्ट किंवा शेणखत मिसळून मग ते तीन ते चार इंच खोलीवर चळी करून द्यावे.
  • स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांचा वापर बीजप्रक्रिया द्वारे अथवा शेणखतात मिसळून करावे.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करत असताना ते जमिनीत सरळ न मिसळता शेण स्लरी बरोबर आठवडाभर मुरवून किंवा कंपोस्टमध्ये मिसळून द्यावीत.
  • चुनखडीयुक्त जमिनीत सिंचनाची सोय ठिबकद्वारे करावी तसेच नगदी फळपिकांना ठिबकद्वारे विद्राव्य खतांचा वापर करावा.
  • चुनखडीयुक्त जमिनीत सहनशील  पिकांची लागवड करावी.उदा. कापूस, गहू, ऊस, सोयाबीन,बाजरी, सूर्यफूल,तुर, सिताफळ, अंजीर, आवळा, चिंचा इत्यादी.
  • अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्यासाठी व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी कारखान्यातील मळी कंपोस्ट खत हेक्टरी पाच टन उन्हाळ्यामध्ये जमिनीत समप्रमाणात मिसळावे व नंतर नांगरट करावी.
  • चुनखडीयुक्त जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसून येताच सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेट 2 ची फवारणी आठ दिवसांच्या अंतराने दोन वेळा करावे. किंवा चिलेटेड स्वरूपात लोह, किंवा जस्तबाजारात उपलब्ध असून ते पीक वाढीच्या अवस्थेनुसार 30 ते 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारण्या कराव्यात.
English Summary: the management of limestone land prepare for taking crop
Published on: 12 October 2021, 12:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)