म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून शेतीवरच आधारीत व्यवसाय करा. कच्चा माल पण आपलाच व्यवसाय पण आपलाच.मग पहा कशी प्रगती होईल. त्यासाठी शिकावं लागेल, शेती करण्यासाठी सगळ्यात जास्त शिक्षणाची गरज आहे. शेतात आंब्याची बाग आपली आंब्याच्या रस म्हणून विकला व माजा वाला श्रीमंत झाला.
आपल्याला ते जमलंच नाही. सोयाबीन आपण पिकविली तेल विकून भलतेच लोक श्रीमंत झाले. ऊस आपण पिकवला साखर विकून भलतेच लोक श्रीमंत झाले. संत्र्याच्या बागा आपल्या संत्री आपण पिकवली दारू बनवून भलतेच लोक श्रीमंत झाले. भाजीपाला आपण पिकवला पण व्यापारी कधी बनू शकलो नाही.
कांदा 80 रु किलो, टमाटर 80 रू किलो झाला तेव्हा किती शेतकऱ्यांना फायदा झाला. अजिबात नाही, कारण काय तर आपण वडिलोपार्जित शेती करीत आहोत पिकवलेली उत्पादने कशी विकायची त्यावर आधारित व्यवसाय कसा करायचा हे शिकलोच नाही शेतीवर आधारित फूड प्रोसेसिंग Business कड़े
कधी आपण लक्ष दिले नाही आता पूर्वजांनी ज्या चूका केल्या त्या करायच्या नाही शिक्षण घ्यायचं व शेती करायची त्यावर आधारित व्यवसाय करायचा व स्वयंपूर्ण व्हायचं. शेती हा सुद्धा एक बिझनेस आहे व तो आम्हाला करता येतो सरकारला भीक मागायची वेळ येऊ द्यायची नाही. करून दाखवू प्रत्येक शेतकऱ्यांनी ही शपथ घ्यायला पाहिजे.
Published on: 14 May 2022, 11:59 IST