कधीतरी एखाद्याच्या आयुष्यात निर्माण होणारा भास. मात्र, सतत कडव्या आव्हानांना सामोरे जात जीवन जगणारा शेतकरी पुन्हा जेव्हा पीक-बाजार नुकसानीत आपल्या समोर येतो, तेव्हा या रंगमंचाचा पटच बदलतो. नजिकच्या काळात हे सतत घडत आहे.यंदाही एकीकडे वरुणराजाने पाण्याचं दान भरभरून दिले, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणून सोडले ! अगदी सुगीच्या दिवसापर्यंत बळीराजाची पाठ अति पावसाने सोडलीच नाही, तर सोलूनही काढली. जसे पेरणीनंतर बियाण्याला कोंब
फुटतात, तेव्हा प्रचंड आशावाद शेतकऱ्याला पीक जगविण्यासाठी धडपडायला लावतो,Then the great optimist makes the farmer struggle to save the crop, परंतु, काढणीच्या वेळेस जर पिकास मोड फुटत असेल,
कृषि निविष्ठांची गाडी रुळावर यावी.... कारण
तर त्याच्या, त्याच्या कुटुंबीयांच्या अवस्थेचे वर्णन कोणत्या शब्दात कसे करावे? यंदा असेच आक्रीत घडले आहे, थोडे नाही ७० ते ९० टक्के क्षेत्राचे ५० ते १०० टक्क्यांपर्यंत पीक नुकसान झाले आहे.जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत २४ पाऊस अधिक पडला आहे. हवामान विभागानुसार मॉन्सूनच्या जून ते सप्टेंबर या मुख्य
हंगामात कोकणात ९ टक्के, मध्य महाराष्ट्रात २६ टक्के, मराठवाड्यात २४, तर विदर्भात चक्क ३१ टक्के अधिक पाऊस पडला ! ऑक्टोबरपर्यंत जवळपास २३ दिवस लांबलेल्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांची अवस्था अत्यंत दयनीय केलीय, याचे चित्र शेतकऱ्यांच्या पाणावलेल्या डोळ्यातून अजून सुकायचे आहे. पावसाच्या वाढलेल्या प्रमाणानेच शेतकऱ्यांच्या या अतिपावसाने होत्याचे नव्हते करून ठेवले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. एकत्रित विचार केला, तर केवळ खरीप हंगामाचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे
अब्जावधी रुपयांचे नुकसान आहे, आणि दुसरीकडे लाखो-कोटींचे कर्ज अंगावर पडले आहे.यंदा सलग पावसाने राज्यातील अनेक भागात पीक धड उगवलेच नाही! ...हे पीक मोडून दुसरे घ्यावे, तर शेतजमिनीला वाफसा अवस्थाही पावसाने येऊ दिली नाही. या काळात तण इतके माजले, की काही ठिकाणी पीक शोधायचीच नाही तर पीक सोडून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली. वातावरण पोषक मिळाल्याने रोग-किडींनी पिकांवर ताबा मिळविला. फवारण्या वाढल्या, कीटकनाशकेही काम करेना, उत्पादन खर्च वाढला. अशातही ज्यांचे पीक या
अवस्थेतूनही काही प्रमाणात साधले, त्यांच्या तर ऐन सुगीच्या वेळेस ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या पावसाने तोंडचा घास हिरावून नेला. सोयाबीनला मोड आले, कापूस भिजून बोंड सडली, मुळकूज वाढली, माणसेच काय पिकेही रडविली झाली. फळबागांवर रोगराईचे आक्रमण वाढले. बहार व्यवस्थापन लांबले आहे.. नुकसान अजून वाढणार आहे.शेतकऱ्यांनी पीक येण्यासाठी गुंतवलेले भांडवलही परत आले नाही. मग, या भांडवलावर उत्पन्न घेऊन
तो घरगाडा कसा चालवणार? ऐन दिवाळीत दिवाळं निघाल्या सारखी अवस्था आहे. पीककर्ज कसे फेडायचे? उसनवारी कशी मिटवायची? मुलांच्या शाळांच्या थकलेल्या फी कशा भरायच्या. मुलांच्या ‘एसटी पास’ला पैसे दर महिन्याला कुठून आणायचे. आधीच थकबाकी असलेल्या किराणा दुकानदाराचे पैसे कुठून द्यायचे? या आणि अशा अनेक चिंता त्याला सतावत आहे.अशातच अबोल असणारा शेतकरी अंतस्थ कोलमडून पडत आहेत, तीन महिन्यांत शेतकरी आत्महत्यांचे
प्रमाण वाढले आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. त्याला पुन्हा उभे करावे लागणार आहे. नुकसान सर्वांच्या समोर, सर्वांच्या देखत आहे, त्याला डोळ्याआड करण्याचे प्रकार घडू नये. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे किमान बँक कर्ज वसुली लांबेल... शासकीय मदत वाढेल, रब्बी हंगाम उभा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे येतील.. त्याचा आशावाद जिवंत राहिल...!
- आनंद गाडे, पुणे.
Published on: 29 October 2022, 12:00 IST