Agripedia

सध्या बळी जाणा-या शेतकरी व शेतमजुरांचे राज्यात आपण जगत आहो.

Updated on 28 October, 2022 6:44 PM IST

सध्या बळी जाणा-या शेतकरी व शेतमजुरांचे राज्यात आपण जगत आहो.बळीराजाचे राज्यात शेतकरी सुखी होता.आजही अशा सुखी प्रजेला पाहण्यासाठी बळीराजा पाताळातुन वर येतात.सगळीकडे रोशनाई , फटाके , पुरणपोळ्या नवेनवे कपडे पाहुन पुन्हा स्वतःला पाताळात गाडुन घेतो.

आता या बळीराजाला पाताळात कुणी गाडले हा माझा प्रश्न अजीबात नाही.Now my question that who buried this Baliraja in the abyss is not strange.तर माझा प्रश्न आजच्या शेतक-यांना पाताळात कोण गाडतेय ?

शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या उदई किडीपासून अशाप्रकारे करा पिकांचे संरक्षण

त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची दुरावस्था का ? त्यांनाच कशी आत्महत्या करावी लागते ?१६ व्या शतकात रयतेचा राजा होऊन गेला . हा राजा जीवंत राहावा म्हणुन पराक्रमाची शर्थ करणारे व जीवाचे बलीदान देणारे आम्ही आहोत.

या राजाने " शेतक-यांचे शेतातील भाजीच्या देठालाही मोबदल्याशिवाय हात लावु नका, अन सागवानादी झाडे जर आरमाराला लागलीच तर ती धन्याचे परवानगीने मोबदला देऊन लिहुन घ्यावे." असे आदेश दिले होते.वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी राजाची हत्या झाली.पेशवाई आली.कष्टकरी कामकरी शेतकरी शेतमजुर बाराबलुतेदार व अठरा अलुतेदार (शुद्रातीशुद्र) यांना वाईट दिवस आले.

आज हे दिवस पालटलेले आहे.जातीवरुन कुणाचे हाल होत नाही. शेतकरी व शेतमजुर खुष आहेत. २० वर्षे ज्ञान देणारा शिक्षक ऊपाशी असला तरी मजेत आहे. महिला सुरक्षीत आहे.नोकरी गेली तरी गावात स्वयंरोजगारासाठी ग्रा.पं.अर्ज स्विकारत आहे. मागेल त्याला कामाचे पोस्टर लागले आहेत.फक्त बळींचे राज्य आले आहे. बळीराजाचे राज्य येईल.अशी आशा करतो.

 

Durgasing solanake

jilla upadhyaksh

Rashtrawadi Congress party

Granthalaya vibhag Buldhana

English Summary: The kingdom of victims has come, but the kingdom of Baliraja will come!
Published on: 27 October 2022, 08:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)