Agripedia

गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढत असल्याने खरिपासोबतच उन्हाळी मूग ही फायद्याचा ठरू शकतो. सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास रब्बी हंगामातील पिकानंतर ( उदा. गहू हरभरा करडई ई.)उन्हाळी मूग घेता येतो त्यासाठी उन्हाळी हंगामासाठी शिफारशीत जातींची लागवड करावी.

Updated on 24 February, 2022 10:30 AM IST

गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढत असल्याने खरिपासोबतच उन्हाळी मूग ही फायद्याचा ठरू शकतो. सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास रब्बी हंगामातील पिकानंतर ( उदा. गहू हरभरा करडई ई.)उन्हाळी मूग घेता येतो त्यासाठी उन्हाळी हंगामासाठी शिफारशीत जातींची लागवड करावी.

मुग पीक 60 ते 65 दिवसात पक्व होते.या काळात पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या देणे आवश्‍यक आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश व उष्ण हवामानामुळे पीक चांगलेपोसून चांगले उत्पादन मिळते.

  • जमीन :-

 मध्यम ते भारी, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी.क्षारयुक्त पाणथळ तसेच उतारावरील हलक्‍या ते निकस जमिनीत लागवड करू नये.अशा जमिनीत मुळावर  रायझोबियम जिवाणूंच्या गाठींची वाढ होत नाही. परिणामी रोपे पिवळी पडतात.

  • योग्य वाणाची निवड :-

 उन्हाळी मुगाकरिता पुसावैशाखी,वैभव या जातीची शिफारस आहे. प्रकाशाला असंवेदनशील  ( उदा. एकेए8802,पीकेव्ही ग्रीनगोल्ड) या जातींची निवड उन्हाळी हंगामात लागवडीसाठी करता येईल.

  • पूर्वमशागत :-

 मशागतीची फारशी आवश्यकता नसते. रब्बी हंगामातील पीक निघाल्यानंतर हलकी नांगरट करून, वखराच्या उभ्या आडव्या पाळ्या द्याव्यात. जमीन भुसभुशीत करावी.

  • पेरणीची वेळ :-

 उन्हाळी मुगाची पेरणी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्च चा पहिला पंधरवडा या काळात करावी. त्यापेक्षा लवकर पेरणी केल्यास थंडीचा पिकाच्या उगवणीवर परिणाम होतो. उशिरा पेरणी केल्यास पीक मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते.

  • पेरणीची पद्धत व आंतर :-

 उन्हाळी मुगाची पेरणी साधारणत:तिफनीनेकिंवा पाभरीने करावी. पेरताना दोन ओळीतील अंतर तीस सें.मी.व दोन रोपातील दहा सें.मी. ठेवावे.

  • बियाण्यांचे प्रमाण :-

 हेक्टरी रोपांची संख्या प्रमाणात राहण्यासाठी शिफारशीप्रमाणे एकरी पाच ते सहा किलो बियाणे वापरावे. घरचे बियाणे असल्यास दर तीन वर्षांनी बदलावे. घरचे बी वापरण्यापूर्वी उगवणशक्ती तपासून घ्यावी.

  • बीज प्रक्रिया :-
  • पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.तसेच उगवण चांगली होण्यासाठी आणिरोपावस्थेतील बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी.
  • बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया झाल्यावर तीन तासांनी मुगाच्या मुळांवरील गाठी चे प्रमाण वाढण्यासाठी रायझोबियम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक 250 ग्रॅम प्रत्येकी प्रति दहा किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी.
  • खत व्यवस्थापन:-

 लागवडीपूर्वी पूर्ण कुजलेले शेणखत एकरी 8 ते 10टन मिसळावे. पेरणीपूर्वी एकरी 50 किलो डीएपी द्यावे.

  • पाणी नियोजन:-
  • मुगास पेरणीपूर्वी एक पाणी द्यावे. व वापशावर आल्यानंतर पेरणी करावी.
  • पेरणीनंतर पहिल्यांदा तीन-चार दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे. पहिल्या हलक्या पाण्यानंतर  जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. एकूण पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या पिकाच्या संपूर्ण कालावधीत द्यावे. विशेषत: पीक फुलोऱ्यात असताना व शेंगा तयार होताना या नाजूक अवस्थांमध्ये मुगास पाण्याचा ताण पडू देऊ नये.
  • आंतर मशागत :-

 पेरणीनंतर 15 ते  20 दिवसांनी हलकीशी डवरणी करावी. त्यानंतर गरज भासल्यास 10 ते 12 दिवसांनी परत नंदन करावी. शक्यतो पेरणीपासून 30 ते 35 दिवसांपर्यंत शेत तणविरहित ठेवावे.

  • विद्राव्य खतांची फवारणी :-
  • फुलोरा अवस्थेत असताना 2 % युरिया ( 20 ग्रॅम प्रति लिटर पाणी ) फवारावा.
  • मुगाच्या शेंगा भरत असताना 2% डीएपी ( 20 ग्रॅम प्रति लिटर पाणी ) फवारावे. त्यासाठी एकरी 100 लिटर पाणी फवारण्यासाठी दोन किलो डीएपी दहा लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालून,सकाळी ते द्रावण ढवळून गाळून घ्यावी. हे द्रावण 90 लिटर पाण्यात मिसळल्यास 2 टक्क्याचे डीएपीचे द्रावण तयार होते.
  • उन्हाळी लागवडीकरता मुगाच्या शिफारशीत जाती :-

पुसा वैशाखी, एकेम 8802, पीकेव्ही ग्रीनगोल्ड एकेम 9911, कोपरगाव,एस.8, फुले एम.2, बी. एम 4ई.

English Summary: the improvised moong crop veriety is benificial for cultivation
Published on: 24 February 2022, 10:30 IST