कांदा उत्पादन व क्षेत्राच्या बाबतीत भारत जगात अग्रेसर असलातरी प्रतिहेक्टरी उत्पादकतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक बराच खाली लागतो. कांदा पिकविणाऱ्या राज्यात क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र,कर्नाटक,गुजरात आणि आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत
.जवळ जवळ देशातील 25 ते 30 टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते.जर आपण कांदा पिकाच्या बियाण्याचा विचार केला तर ते अल्पायुषी असते व त्याची उगवणक्षमता ही एक वर्षापूरतीचटिकून राहते.त्यामुळे कांदा बियाण्याचे उत्पादन दरवर्षी घ्यावे लागते.या लेखात आपण कांदा बीजोत्पादन च्या पद्धती जाणून घेणार आहोत.
कांदा बीजोत्पादनाच्यापद्धती
- रोप कायम जागीलावून-बीज उत्पादनाचा या पद्धतीमध्ये प्रथम रोपवाटिकेत कांद्याची रोपे तयार करून त्यांची मुख्य शेतात लागवड करतात. त्यानंतर कांदा तयार झाल्यानंतर काढणी न करता तसाच शेतात ठेवला जातो. या कांद्यातून फुलोऱ्याची दांडे येतात व त्याला बि लागते. या पद्धतीत खर्च कमी लागतो व वेळ देखील वाचतो. परंतु बीजोत्पादनाचे ही पद्धत आपल्याकडे उपयोगात आणले जात नाही.
- कंदापासून बियाण्याची पद्धत- या पद्धतीमध्ये कंद तयार झाल्यानंतर काढून घेतात व चांगल्यारितीने निवडून पुन्हा शेतात लागवड करतात.यामुळे कंदाची योग्य निवड शक्य होते. शुद्ध बियाणे तयार होऊन उत्पन्न देखील जास्त प्रमाणात येते. या पद्धतीत खर्च वाढतो व वेळ देखील जास्त लागतो. तथापि बीजोत्पादनासाठी हीच पद्धत योग्य आहे.
- एकवर्षीय पद्धत- या पद्धतीमध्ये मे जून महिन्यात पेरणी करून जुलै-ऑगस्टमध्ये रोपांची पुनर्लागवड करतात. साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात कंद तयार होतात.कंद काढून निवडून घेतले जातात. चांगल्या कंदांची दहा ते पंधरा दिवसानंतर पुन्हा दुसऱ्या शेतात लागवड करतात. या पद्धतीमुळे मे महिन्यापर्यंत बियाणे तयार होते. एका वर्षात बियाणे तयार झाल्याने त्यास एक वर्षे पद्धत म्हणतात.
- या पद्धतीमध्ये कांदा साठवून ठेवण्याच्या खर्च व साठवणुकीत होणारे नुकसान टाळता येते. या पद्धतीने खरीप कांद्याच्या प्रजातींचे बीजोत्पादन घेतात.
- द्विवर्षीय पद्धत- या पद्धतीमध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये बियाणे पेरावे व रोपेडिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला शेतात लावावेत.मे महिन्यापर्यंत कांदे तयार होतात. निवडलेले कांदे ऑक्टोबर पर्यंत व्यवस्थित साठवून ठेवावेत. नोव्हेंबर मध्ये पुन्हा मध्यम आकाराचे व बारीक मानेचे कांदे निवडून चांगल्या कंदाची शेतात लागवड करतात. या पद्धतीमुळे बियाणे तयार होण्यासाठी जवळपास दीड ते दोन वर्षे वेळ लागतो. म्हणून यास द्विवर्षीयपद्धत म्हणतात. या पद्धतीत रब्बी कांद्याच्या वाणांचे बीजोत्पादन करतात.
Published on: 29 October 2021, 08:46 IST