ब्रोकोली विदेशी भाजीपाला पीक असून या परदेशी भाजीपाला पिकाचे शास्त्रीय नाव ब्रसिकाओलेरॅसिया व्हराइटालिका असे आहे. ब्रोकोली आपल्या नेहमीच्या खाण्यातील कोबी, फ्लावर यांचे कुळ, जाती आणि प्रजाती एकच आहेत. याचे मूळ स्थान इटली आहे. या लेखात आपण ब्रोकोली या भाजीपाला वरील महत्वाचे रोगांविषयी विषयी माहिती घेऊ.
ब्रोकोली वरील महत्वाचे रोग आणि नियंत्रण
- डपिंग ऑफ( रोपे कोलमडणे)- लक्षणे
रूपे जमिनीच्या लगतच्या भागात कुजून अचानक कोलमडतात. हा रोग पीथीयम,फायटोप्थोरा,या बुरशीमुळे होतो.उष्ण आणि दमट हवेत, तसेच रोपवाटिकेत पाण्याचा निचरा चांगला होत नसल्यास हा रोग लवकर बळावतो नंतरच्या काळात रोपेरोगग्रस्त झाल्यास जमिनीलगतचा भाग भुरकट होऊनसुकतो.
- ब्लॅक रॉट ( घाण्या रोग )- लक्षणे
हा जिवाणूजन्य रोग असून कोबीवर्गीय पिकाची लागवड असलेल्या क्षेत्रात आढळतो. उष्ण आणि दमट हवामानात रोगाची लागण फारच झपाट्याने होते पानाच्या मुख्य आणि उपशिरा मधील भागात पानांच्या कडा मुरुनइंग्रजी अक्षर व्ही आकाराचे पिवळे डाग दिसू लागतात. या रोगाची लागण झालेला भाग कुजुन वाळून जातो. रोगट भागातील पानांच्या शिरा काळा पडतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास झाडाच्या अन्न व पाणी वाहून येणाऱ्या पेशी कुजून खोड, शिरा आतून काळा पडतात. असा भाग मोडून पाहिल्यास त्यातून काळ रंगाचा द्रव्य येतो व त्याला दुर्गंधी येते. अशी रोपे गड्डा न धरताचवाळूनजातात.पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. उशिरा रोग आल्यास गड्डा सडण्याचे प्रमाण जास्त असते.
- ब्लॅक स्पॉट– करपा किंवा काळे डाग – लक्षणे
या बुरशीजन्य रोगाची लागण बियाण्यातुन होते. पाने,देठआणि खोडावर वर्तुळाकार किंवा लांब गोल डाग दिसू लागतात.हे डाग एकमेकात मिसळून लागण झालेला भाग करपल्यासारखा काळा पडतो. जास्त दमट आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास गड्ड्यावर डाग दिसतात.
- पावडरी मिल्ड्यू( भुरी )लक्षणे
या बुरशीजन्य रोगाची वाढ उष्ण आणि दमट हवामानात जास्त होते. जुन्या झालेल्या पानावरील वरच्या भागावर पांढरे ठिपके प्रथम आढळून येतात. हे ठिपके हळूहळू मोठे होऊन हे एकमेकात मिसळतात.
पानांच्या खालील आणि वरील बाजूस पसरतात.पाणी पिवळी पडून करड्या रंगाची होऊन वाळून जातात. यामुळे उत्पादन आणि मालाच्या प्रतीवर प्रतिकूल परिणाम होतो.
- केवडा ( डाऊनी मिल्ड्यू ) लक्षणे
पानांच्या वरील बाजूस अनियमित आकाराचे पाणीयुक्त अनियमित आकाराचे ठिपके आढळून येतात. पानांच्या खालील बाजूस सही रोगाचे चट्टे आढळून येतात. त्यावर पांढरा गुलाबी रंगाचे केवढ्याची वाढ आढळून येते.गड्ड्यांमधून फुलांचे दांडे वर येतात. या रोगामुळे त्यावर काळपट पट्टे दिसतात. रोग वाढल्यास संपूर्ण गड्डा खराब होतो.
Published on: 30 November 2021, 09:40 IST