Agripedia

शेतकरी मित्रानो तुमच्या पिकाचे शेड्युल जगातला कोणताही शास्त्रज्ञ तयार करून देऊ शकत नाही.

Updated on 10 June, 2022 7:17 PM IST

शेतकरी मित्रानो तुमच्या पिकाचे शेड्युल जगातला कोणताही शास्त्रज्ञ तयार करून देऊ शकत नाही. तुमच्या कोणत्याही पिकाला शेड्युल हा प्रकार असूच शकत नाही. शेड्युल हा प्रकार कंपन्यांनी त्यांचे उत्पादन विक्रीसाठी किंवा शेतकऱ्यांना सवय लागावी म्हणून हा प्रकार तयार केलेला आहे आणि तो कालांतराने सर्व पिकांमध्ये बऱ्यापैकी ट्रेन होताना दिसतो. यामध्ये बऱ्याचश्या कंपनी आपल्या शेतकऱ्यांसाठी आपली उत्पादन त्यामध्ये लिहून एक जनरल शेड्युल ठराविक पिकाकरिता तयार करतात आणि शेतकऱ्यांमध्ये डीस्ट्रीबुट करतात. यामधून त्यांचा उद्देश असतो की त्यांचे जे उत्पादन आहेत त्या पिकाच्याअवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनी वापरावीत आणि त्या कंपनीचा सेल वाढेल.मार्केट आहेत त्यातला हा झाला सेलचा भाग जो त्याच्या दृष्टीने योग्य आहे कंपनी म्हणून परंतु आता बऱ्याच ठिकाणी अस निदर्शनास आले की आपले शेतकरी गट असतील, विविध शेतकऱ्यांच्या संस्था असतील, शेतकऱ्यांचे ग्रुप आहेत तेसुद्धा शेड्युल तयार करून शेतकऱ्यांना देत आहेत.

द्राक्षाला नाशिकमध्ये काय लागणार आहे आणि ते सांगलीमध्ये काय लागणार आहे किंवा सोयाबीनला विदर्भात काय लागणार आहे आणि बीडला काय लागणार आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असणार आहे. कोणत्याही पिकाला शेड्युल महत्वाचं नाही तर त्या पिकावर कोणते रोग कोणत्या किडी येतात, संबंधित रोग आणि किडी कोणत्या व कशा प्रॅक्टिसमुळे आपण कमी करू शकतो किंवा घालऊ शकतो याचा अभ्यास करणे गरजेचं आहे त्या पिकासंदर्भात त्यासोबतच त्या पिकाला लागणारे अन्नद्रव्ये व्यवस्थापन समजून घेऊन त्याची पूर्तता आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्या इथल्या वातावरणनुसार आपण कश्या पदधतीने करू शकतो याचा आपण अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच नियोजन आपण करायला पाहिजे.आपले जे पिक आहे त्यासाठी असणारे स्त्रोत काय आहे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. रिसोर्सेसमध्ये तुमची जमीन कशी आहे? पाणी कसे आहे? 

आणि त्या नुसार आपल्या पिकाला लागणारे अन्न द्रव्य व्यवस्थापन त्याचे नियोजन आपण करायला पाहजे. तर या गोष्टीचा अवलंब करून आपण आपल्या पिकासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन यासाठीच शेड्युल आपण तयार करू शकतो.जर आपण द्राक्ष पिकासारख बहुवार्षिक पिक घेतोय किंवा कोणताही बागायती पिक अनेक वर्ष करतोय तर त्या संदर्भात त्या पिकामध्ये आपण करत असलेली कामे, करत असलेली प्रॅक्टिस, आलेले रोग, किडी त्यासाठी लागणारे अन्न द्रव्य व्यवस्थापन या सर्व गोष्टींची आपण वेळोवेळी नोंद करून ठेवली पाहिजे त्याची निरीक्षणे नोंदवली पाहिजे आणि त्यानंतरच आपण आपल्या पिकासाठी एक दोन ते तीन वर्षानंतर चांगली निरीक्षण नोंदवल्यानंतर आपण आपल्या पिकासाठी शेड्युल तयार करू शकतो ते की आपल्या पिकासाठी आपल्या स्थानिक वातावरणानुसार आपल्या जमिनीनुसार आपल्या पाण्यानुसार आणि आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या मजूर आणि आपल्या कामाच्या पद्धतीनुसार तयार झालेलं सर्वोत्तम शेड्युल असेल.

दुसऱ्याच्या शेड्युलमुळे होणारे तोटे.१.अनावश्यक खर्च वाढतो.२.पिकाला आवश्यक असलेले ग्रोथ स्टीम्युलंट यांच्या फवारण्या केल्या जातात. त्यामुळे वेगळेच प्रश्न निर्माण होतात.३.बहुतेक शेड्युलमध्ये द्राक्षासारख्या पिकात रोज फवारणी करावी असे सांगितले असते त्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो.४. शेड्युलमध्ये कोणताही शास्रीय आधार न घेता फवारण्या सांगितल्या जातात उदा. जसे जे द्राक्ष बागेत पोंग्यात आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरा असे काहीजण सांगतात.५.जमिनीचा प्रकार, सामू, इ-सी याचा विचार न करता खताच्या शिफारसी.वरील सर्व गोष्टीमुळे शेतकरी मित्रानो दुसऱ्या कोणाकडून शेड्युल घेण्यापेक्षा आपण स्वतः आपल्या पिकासाठी आपली निरीक्षणे नोंदवून आपण आपल स्वतःच शेड्युल तयार केलं पाहिजे तरच आपली शेती फायद्याची राहील. नाही तर आपण वापरत असलेल्या दुसऱ्या कोणाच्या शेड्युलमुळे आपले कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कुठल्या कुठे गेले आहे. हे आपल्याला कळणार देखील नाही.

English Summary: The farmer was ruined by the noise of the schedule
Published on: 10 June 2022, 07:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)