Agripedia

अनेक भागात वन्यजीव हा शेतीसाठी (Wildlife Rampage) मोठा अडथळा आहे.

Updated on 06 August, 2022 3:28 PM IST

अनेक भागात वन्यजीव हा शेतीसाठी (Wildlife Rampage) मोठा अडथळा आहे. शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणायला (Financial Loss To Agriculture) काही प्रमाणात वन्यजीवांचा उपद्रव कारणीभूत ठरतो. या वन्यजीवांमध्ये रातोरात उत्पादन फस्त करण्याची क्षमता आहे. त्यांच्या विल्हेवाटीसाठी शेतकरी अनेकदा सरकारी यंत्रणांशी संपर्क साधतात. मात्र अद्यापपर्यंत यावर

कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. खापरवाडी बुद्रुक (ता. अकोटे, जिल्हा अकोला) हा क्षारयुक्त जमिनीचा पट्टा आहे. या परिसरात हरिण, रानडुक्कर, माकड आदींचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचला आहे. या प्राण्यांना मारणे कायद्यानुसार गुन्हा आहे. हे प्राणी पिके खातात आणि खूप नासधूसही (Crop Damage) करतात. दिवसभर काम केल्यानंतर रात्रीही देखभालीसाठी (Crop Protection)

शेतात जावे लागते. असे असूनही पीक पूर्णपणे सुरक्षित नाही. शेतकऱ्यांवर प्राण्यांचे हल्ले होण्याच्या घटनाही घडत आहेत. आर्थिक अडचणींमुळे मोठ्या क्षेत्रावर कुंपण घालण्याचा खर्च उचलणे शक्य होत नाही.जैविक कुंपणाचे उत्तर शोधलेखापरवाडी बुद्रुक येथील जगन प्रल्हाद बागडे यांच्याकडे 20 एकर शेतजमीन आणि कसायला घेतलेली 50 एकर जमीन आहे. आई-वडील आणि

मोठा भाऊ गोपाल असा परिवार आहे. भाऊ अकोटमध्ये चारचाकीचा गाडीचा व्यवसाय करतात. जगन शेतीचे व्यवस्थापन पाहतो. त्यांना वन्यप्राण्यांचाही खूप त्रास झाला. त्यासाठी तारेचे कुंपण घालण्यासाठी एकरी 40 हजारांहून अधिक खर्च येत होता. तसेच क्षेत्रफळ मोठे असल्याने तो लाखाच्या घरात जाणार होता. खूप विचार आणि अभ्यास केल्यावर कल्पना आली की निवडुंगाचे

(cactus) कुंपण उपयोगी असू शकते असा विचार मनात आला. जंगलात वर्षानुवर्षे दिसणारे हे काटेरी झाड असून, कोणताही प्राणी ते खात नाही. तीक्ष्ण काट्यांमुळे वन्यजीव त्याच्या जवळ फिरकतही नाहीत.निवडुंगाची जणू तटबंदी झालीपहिल्या टप्प्यात जगन यांनी मजुरांच्या मदतीने छोट्या फांद्या लावल्या. कोणतेही व्यवस्थापन न करता झाडे मोठ्या प्रमाणात वाढली. शेता भोवती

जणू तटबंदी तयार झाली. आज या निवडुंगाचे 50 एकराला कुंपण तयार झाले असून, झाडे 10 ते 12 फूट उंच वाढली आहेत. प्रत्येक दोन झाडांमधील अंतर एक फूट आहे. झाडांचा बुंधा मजबूत झाला असून कोणीही प्राणी शेतात घुसण्यास धजावत नाही. त्यामुळे पीक संरक्षणाचे काम बंद झाले आहे. सहा-सात वर्षांपूर्वी 30 एकरासाठी केवळ 15

हजारांचा खर्च झाला होता. दोडका, कारले, वाल आदी पिकांचीही कुंपणावर लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या परिसरात सेंद्रिय कुंपण करण्याचे हे एकमेव उदाहरण असावे.शेतकऱ्यांनाही मिळाली प्रेरणाजगनच्या प्रयोगातून प्रेरणा घेऊन 75 ते 80 शेतकऱ्यांनी तीन-चार वर्षांत कमी खर्चात निवडुंगाची लागवड करण्याचा विडा उचलला आहे. जगन यांनी स्वत: त्यांना मोफत फांद्या दिल्या आहेत आणि त्यांना मार्गदर्शनही केले आहेत.

कुंपणाचे काय झाले फायदेवन्य प्राण्यांचा त्रास संपलामोठ्या प्रमाणात मृदासंवर्धन झाले. थंडीच्या लाटेत पिकांचे टळले.पिकावर होणारा कीटकांचा त्रास कमी झाला.पूर्वी शेतकऱ्याने करवंदाचे कुंपण केले होते. मात्र ते लांब पसरत होते. त्या तुलनेत निवडुंग उभे वाढत असल्याने अधिक फायदेशीर ठरले.या कुंपणावर वेलवर्गीय पीक घेऊन आर्थिक फायदाही होत आहे.

खापरवाडी बुद्रुक (जिल्हा अकोला) येथील जगन बागडे यांनी शेतांची सतत होणारी नासधूस आणि वन्य प्राण्यांमुळे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन कमी खर्चात सेंद्रिय कुंपणाचा पर्याय दिला. सुमारे 50 एकरात 10 ते 12 फूट उंच निवडुंग कुंपण लावून विविध पिकांचे कायमस्वरूपी संरक्षण करण्यात त्यांना यश आले आहे

English Summary: The farmer fought the fight; In 50 acres, no animal, not even a wild boar, will come
Published on: 06 August 2022, 03:28 IST