पण वास्तव ह्या विचाराला अनुसरून नाही. आज सर्वात जास्त बुद्धी आणि हुशारी शेती क्षेत्रामध्ये खर्च करावी लागते. कारण शेती करणे म्हणजे अर्थशास्त्र, भौतिक शास्त्र, जीवशास्त्र,मृदाशास्त्र,वनस्पती शास्त्र,हवामान शास्त्र,किटकशास्त्र आणि इतर अनेक शास्त्रांमध्ये निपुण असणे होय.बऱ्याचदा शेतकऱ्यांला ही आपल्या सामर्थ्याची कल्पना नसते.आम्ही सतत शेतकऱ्यांचा संपर्कात असतो. शेतकरी आणि त्यांचे प्रयोग ऐकून बऱ्याचदा आम्ही थक्क होतो. त्यांचा प्रयोगाकडे पाहून आमचा शेतकरी कोणाशीही स्पर्धा करू शकतो असे आम्हास वाटते. आज अश्याच ऐका प्रयोगातून शेतकऱ्यांचा बुद्धीची प्रचिती आली.
शेती मध्ये सुष्मजीवाणूंचा वापरला अनन्यसाधारण महत्व आहे. ह्या जिवाणूंचा वापर त्यांची संख्या वाढवून किंवा किनवन प्रक्रिये पश्चात झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना अफलातून परिणाम दिसतात. ह्या जिवाणूंचा वापरासाठी दोनशे किंवा पाचशे लिटरचा टाक्यांची आवश्यकता असते. ह्या टाक्या प्लास्टिकचा किंवा सिमेंटचा असू शकतात. सिमेंटचा टाक्या वजनदार असल्यामुळे त्यांची चोरी होऊ शकत नाही. तसेच प्लास्टिकचा टाक्या हलक्या असल्यामुळे त्याची चोरी होण्याची दाट शक्यता आहे. सिमेंट आणि प्लास्टिकचा टाक्यांची किंमतही जास्त असते. अशावेळी एक सोपा आणि स्वस्त पर्याय उपलब्ध होणे गरजेचे आहे.
त्यासाठी काही शेतकऱ्यांनी एक अनोखा प्रयोग केला. त्यांनी जमिनीत एक खड्डा खणला. त्यामध्ये ताडपत्री किंवा शेततळ्याचे कागदाचे आच्छादन केले आणि त्या खड्यात पाण्यासोबत जिवाणूंची किनवन प्रक्रिया पूर्ण केली. त्यांनी पाच फूट रुंद व पाच फूट लांब आणि एक फूट खोल खड्डा खणला. त्यामध्ये शेततळ्याचे अस्तर वापरले.५फूट×५फूट×१फूट ह्या मापाचा खड्यात जवळपास ७००लिटर पाणी भरते. बाजारात ९×१२फुटाचे शेततळ्याचे अस्तर ₹६००/- ते ₹७००/- उपलब्ध आहे. ७०० लिटर क्षमतेची प्लास्टिकची किंवा सिमेंटची टाकी घेण्यास दोन ते तीन हजार रुपयांचा खर्च जातो. कमी खर्चात ऐका खड्याचा मदतीने आपण आर्थिक बचत करू शकतो.
पण काही शेतकरी एक पाऊल पुढे जाऊन त्यामध्येही काही आगळे वेगळे प्रयोग करतात. रवींद्र पाटील,रावेर हे आशेच एक शेतकरी. त्यांचा १७ एकरावरील केळी पिकासाठी त्यांना जिवाणूंचा वापर किनवन प्रक्रिये द्वारे करायचा होता. त्यासाठी त्यांनी एक भला मोठा खोल खड्डा खणून त्यात शेततळ्याचा अस्तराचा वापर केला.
पाच ते सहा हजार लिटर क्षमतेचा खड्यात मोठ्या प्रमाणात जिवाणूंची निर्मिती ते करत असतात. पाच ते सहा हजार लिटर साठी ते ४०किलो गुळ आणि ७.५ किलो बेसनाचा वापर करण्यात येतो. सध्या ऍझोटोबॅकटर ह्या नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंची निर्मिती सुरू आहे. ह्या जिवाणूंचा किनवन प्रक्रियेस जीवाणूंना वेळोवेळी ढवळणे महत्वाचे असते. पाण्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा वाढावी ह्यासाठी त्याला ढवळणे गरजेचे आहे. त्यामुळे जिवाणूंचा पेशीविभाजना दरम्यान तयार होणारे कारबन डायॉक्साईड हवेत उत्सर्जित होते व जीवाणूंना आवश्यक प्राणवायूची उपलब्धता वाढते आणि जिवाणूंची वाढ होऊ झपाट्याने लागते. ह्या मोठ्या खड्यात जिवाणूंचे द्रावण ढवळणे म्हणजे खूप वेळखाऊ व कष्टप्रद कार्य असते. ह्या कृतीसाठी शेतकऱ्यांने आपल्या कल्पक बुद्धीचा जोरावर रंग कामासाठी वापरण्यात येणारे पेंट मिक्सरचा वापर केला. त्यामुळे कमी वेळेत कमी श्रमात ह्या जिवाणूंची किनवन प्रक्रिया पूर्ण होते. काही शेतकरी ही ढवळण्याचा क्रियेला पर्याय म्हणून मत्स्यटाकीमधील एअर पंपचाही वापर करत असतात. त्यामुळे ढवळण्यासाठी लागणारे श्रम कमी होतात.
एखाद्या अन्नद्रव्यांला जिवाणूंचा मार्फत पूर्ण करणे असो किंवा प्लास्टिक, सिमेंटचा महागड्या टाक्यांचा ऐवजी जमिनीत खड्डा करणे असो किंवा पेंट मिक्सरचा साह्याने द्रावणाला ढवळने असो ह्या सर्वांमधून शेतकऱ्यांचा कल्पकतेची प्रचिती मिळते. समाज समजतो तसा शेतकरी नाही. एखादा गाव सांभाळण्यासाठी लागणारे सामर्थ्य आणि एक शेत सांभाळण्यासाठी लागणारे सामर्थ्य समान आहे.
विवेक पाटील,सांगली
०९३२५८९३३१९
Published on: 23 November 2021, 08:11 IST