Agripedia

मोठ्या कष्टाने पिकवलेल्या धान्य व्यवस्थित साठवणूक करणे फार महत्त्वाचे असते.नाहीतर लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते.पाण्याचा वापर आपण खाण्यासाठी, बियाण्यासाठी व इतर गरजा भागवण्यासाठी तसेच बाजारामध्ये चांगली किंमत यावी म्हणून देखील साठवतो

Updated on 13 October, 2021 4:03 PM IST

 मोठ्या कष्टाने पिकवलेल्या धान्य व्यवस्थित साठवणूक करणे फार महत्त्वाचे असते.नाहीतर लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते.पाण्याचा वापर आपण खाण्यासाठी, बियाण्यासाठी व इतर गरजा भागवण्यासाठी तसेच बाजारामध्ये चांगली किंमत यावी म्हणून देखील साठवतो

साठवणुकीतील धान्यामध्ये कीड, उंदीर, वातावरणातील आद्र्रता यामुळे 10 टक्के नुकसान होते.त्यामुळे धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला उपाययोजना करणे गरजेचे आहे. धान्य साठवणुकीत नुकसान होऊ नये त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात या बद्दल माहिती घेऊ.

  • धान्य साठवणुकीतील होणारे नुकसान टाळण्यासाठी करायचे अरासायनिक किंवा प्रतिबंधात्मक उपाय
    • नवीन धान्य जुन्या कीड लागलेल्या धान्य जवळ ठेवू नये.
  • धान्याची वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी साधने उदाहरणार्थ बैलगाडी, ट्रॅक्टर, इत्यादींच्या फटीमध्ये किडींचे वास्तव्य असण्याची शक्यता असते.म्हणून धान्य वाहतूक करणाऱ्या साधनांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करूनघेणे महत्त्वाचे असते.
  • धान्य साठवणुकीसाठी वापरले जाणारे पोते, कणगी इत्यादींच्या कानाकोपर्यात किडीवास्तव्य करतात म्हणून असं साहित्य स्वच्छ किंवा निर्जंतुकीकरण करून घ्यावी.
  • मळणी केल्यानंतर धान्य उन्हात वाळून साफ करा व वाळलेले धन्य दातात फोडून बघा व साठवणूक करण्यापूर्वी या धान्यातील ओलाव्याचे प्रमाण आठ टक्क्यांच्या आत राहील याची काळजी घ्या. सर्वसाधारणपणे धान्य साठवण करण्यापूर्वी दाताखाली असे धान्य चावल्यास कट असा आवाज आला तर धान्य साठवणुकीसाठी योग्य समजावे. साठवणूक करण्यापूर्वी धान्यातील ओलाव्याचे प्रमाण आठ टक्क्यांच्या आत राहील याची काळजी घ्यावी. धान्यातील ओलावा आठ टक्क्याच्या वर असल्यास पुन्हा एकदा धान्य उन्हात चांगले वाळवून घ्यावे.  धान्य उन्हात वाळल्यामुळे ते टणक होते व त्याची गुणवत्ता टिकून राहते.
  • धान्य साठवण करण्यापूर्वी धान्याची चाळणी करून घ्यावी व चाळणी झाल्यानंतर बाहेर पडलेल्या कीडीताबडतोब नष्ट करावे.
  • मोहरी तेल, तीळ तेल, जवस तेल, एरंडेल तेल इत्यादी पैकी कोणत्याही एका खाण्यायोग्य वनस्पती तेलाचा वापर धाण्याचे किडीपासून संरक्षण करण्याकरता केला जाऊ शकतो. त्यासाठी धान्य चांगले वाळल्यानंतर तेलाच्या उपलब्धतेनुसार एक क्विंटल कडधान्याला किंवा डाळीला 500 मिली तेल मिसळून सोडावे व असे धान्य पोत्यात मडक्यात किंवा कनगीत साठवावे.
English Summary: the easy tricks to storage of grains
Published on: 13 October 2021, 04:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)