Agripedia

शेती म्हटले म्हणजे वन्यजीवांशी सामना हा शेतकर्यांचा येतो. विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचदा रात्रीचा वीजपुरवठा होतो. तेव्हा पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागते.

Updated on 23 May, 2022 12:37 PM IST

शेती म्हटले म्हणजे वन्यजीवांशी सामना हा शेतकर्‍यांचा येतो. विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचदा रात्रीचा वीजपुरवठा होतो. तेव्हा पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागते.

त्यामुळे वन्य प्राणी असतील किंवा साप त्याचा कायम धोका शेतकऱ्यांना असतो. बऱ्याचदा आपण ऐकतो किंवा वाचतो की रात्री-बेरात्री सर्पदंशामुळे अनेक शेतकरी राजांचा मृत्यू देखील ओढवण्याच्या घटना घडल्या आहेत. आता पावसाळा तोंडावर आल्यामुळे या काळात आपल्या भारतात काही विषारी साप जास्त प्रमाणात आढळतात.  अशा विषारी सापांना पासून शेतकरी कशापद्धतीने स्वतःचा बचाव करू शकतो त्याबद्दलची महत्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.

 पावसाळ्यात भारतात आढळणारे विषारी साप

1- रसेल वाइपर- हा सापाचा प्रकार अजगर सारखा दिसतो. त्याच्या अंगावर खाकी रंगाची गडद तपकिरी पट्टे असतात. हा साप प्रामुख्याने झाडाची किंवा पिकांची कोरडी पाने, झुडपे, शेतजमीन आणि साचलेले पाण्याच्या ठिकाणी  जास्त प्रमाणात आढळतो.

त्यामुळे सावध करण्याची गरज असून कोरडा झालेला तलाव असेल तर अशा ठिकाणी हमखास बघायला मिळतो. महत्वाचे म्हणजे या सापाचे एक वैशिष्ट्य असे आहे की, जर याला कोणाचा धक्का लागला किंवा पाय पडला तरच तो बचावासाठी चावा घेतो. हा साप चावल्यामुळे बहुतांशी लोक मरतात. हा साप वर्षभर आढळतो. हिवाळ्यात ऋतू मध्ये उन्हासाठी बिळ्याच्या बाहेर पडतो.

हा साप चावल्याने प्रामुख्याने शरीरावर सूज येते, उलट्या होतात तसेच रक्तस्राव देखील व्हायला लागतो किडनी निकामी पाण्याची समस्या उद्भवते व त्यामुळे  व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

2- कोब्रा - आपल्याला माहीत आहे की हा साप सगळ्यात विषारी असून कोब्रा या जातीमध्ये शारीरिक स्थिती वरून तीन प्रकार आढळतात. यात पहिला म्हणजे ठिपकेदार, दुसरा म्हणजे काळ्या रंगाचा आणि तिसरा म्हणजे तपकिरी होय.

सापाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा लोकांपासून दूर राहतो. उंदीर हे याचे प्रमुख अन्न असल्यामुळे या मंत्राच्या शिकारीसाठी तो घरातील स्वयंपाक घरात पर्यंत देखील पोहोचतो व कित्येकदा बाथरूम मध्ये देखील जाऊन बसतो. शेतात उंदरांचा वावर असल्याने शेतात जास्त प्रमाणात हा साप आढळतो. व्यक्ती चा धक्का लागल्यानंतरच हा साप चावा घेतो.

3- कॉमन क्रेट- हा साप पावसाळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. अगदी पावसाळा सुरू झाल्याच कॉमन क्रेट बिळातून बाहेर पडतो. हा एक विषारी सापांपैकी एक असून याचे वैशिष्ट्य म्हणजे हा रात्रीच चावतो.

जेव्हा बिळातून बाहेरपडल्यानंतर उबदारपणासाठी  जमिनीवर येतो. त्यामुळे आपले लोकांना याच्या सर्पदंश याचा अधिक धोका असतो. झोपेत हालचाल झाली की चावा घेत असतो . या सापाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा साप चावल्यानंतर अजिबात कळत नाही.

असे वाटते की मुगी किंवा डास चावला आहे. एखाद्याला झोपेत हा साप चावल्यानंतर त्यामुळे रुग्णांमध्ये न्युरो प्यारालीसीस आणि गुदमरल्यासारखे होते.  60 टक्के लोकांचा मृत्यू या सापाच्या चाव्यामुळे होतो.

 सर्पदंशाची लक्षणे

1- दोन चट्टे

2-जखमे सभोवती सूज आणि लालसर पणा येतो.

3- रुग्णाला श्वास घेण्याचा समस्या निर्माण होते,उलट्या होतात.

4- डोळ्यासमोर अंधारी येतात.

5- जखम झालेल्या ठिकाणी जळजळ होते व चेहरा आणि पाय मध्ये कळकपणा येतो.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:महाराष्ट्र आणि केरळने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केले या राज्यांमध्ये तेल स्वस्त होणार वाचा सविस्तर

नक्की वाचा:कधी संपेल शेतकऱ्यांमागची साडेसाती!! द्राक्ष खरेदी करण्यासाठी व्यापारीच मिळेना; बागायतदार हवालदिल

नक्की वाचा:भन्नाट ऑफर! मारुती अल्टो पेक्षा कमी किमतीत खरेदी करा एर्टिगा कार; जाणून घ्या 'या' खास ऑफर विषयी

English Summary: the dangerous spacies of snake in mansoon season so take precaution
Published on: 23 May 2022, 12:37 IST