Agripedia

देशामध्ये साखर उद्योग हा एक मोठा उद्योग असून त्यावर लाखो शेतकरी, कामगार, कष्टकरी

Updated on 18 March, 2022 11:19 AM IST

देशामध्ये साखर उद्योग हा एक मोठा उद्योग असून त्यावर लाखो शेतकरी, कामगार, कष्टकरी व परिसरातील व्यावसायिक यांचे जीवनमान अवलंबून असते.  

हा साखर उद्योग अधिकाधिक लोकाभिमुख होऊन शेतकरी व तद्नुषंगीक सर्व घटकांचे जीवनमान उंचविण्याचे दृष्टीने सध्या असलेल्या ध्येय धोरणामध्ये काही बदल आवश्यक आहेत का, असल्यास काय असावेत? व त्या करीता राज्य अथवा केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणे करीता अंतिम प्रस्ताव सादर करता येईल का?

त्या दृष्टीने चर्चा करणे साठी साखर उद्योगातील संबंधित तज्ञ मार्गदर्शकांची, उस उत्पादक शेतकरी ह्यांची एक प्राथमिक बैठक आपण आयोजित केली आहे. तरी कृपया इच्छुकांनी या बैठकीस अवश्य उपस्थित रहावे ही विनंती आहे.

सभेमध्ये सर्व साधारण पणे खालील विषयांवर चर्चामंथन होईल.

(१)साखरेची विक्री किंमत

      (MSP)

(२) साखरेला द्विस्तरीय भाव

(३) उसाची किंमती (FRP) बाबत धोरण 

(४) दोन साखर कारखान्यामधील हवाई अंतर

(५) इथेनॉल निर्मिती व त्याचा एफआरपी वर परिणाम (६) अतिरिक्त उस प्रश्न

(७) सहकारी साखर कारखाने Vs

 खाजगी साखर कारखाने- कामकाज व्यवस्थापन 

 (८) गुजरात अथवा अन्य राज्यातील साखर कारखान्यांना अभ्यास भेटी

 (९) या व्यतिरिक्त अन्य महत्त्वाचे मुद्दे 

तरी कृपया बैठकीस येतांना वरील विषया संबंधात सप्रमाण टिपणी तयार करून आणावी की जेणेकरून चर्चा करतांना संयुक्तिक होईल. 

संबंधित सर्व घटकांचा सहभाग अपेक्षित आहे. 

 

तपशीलः

स्थळ- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चे कृषी व सहकार व्यासपीठ, 2183, सदाशिव पेठ, विशाल सह्याद्रि सदन, टिळक रोड, अभिनव कला महाविद्यालयाच्या मागे, गिरीजा हाॕटेल जवळ, पुणे- 411030

दिनांकः 23/03/22, बुधवार

वेळः दुपारी 4 वाजता

टीपः आपण येणार असल्यास आम्हाला SMS करणे म्हणजे नियोजन करता येईल.

हा साखर उद्योग अधिकाधिक लोकाभिमुख होऊन शेतकरी व तद्नुषंगीक सर्व घटकांचे जीवनमान उंचविण्याचे दृष्टीने सध्या असलेल्या ध्येय धोरणामध्ये काही बदल आवश्यक आहेत का, असल्यास काय असावेत? व त्या करीता राज्य अथवा केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणे करीता अंतिम प्रस्ताव सादर करता येईल का?

त्या दृष्टीने चर्चा करणे साठी साखर उद्योगातील संबंधित तज्ञ मार्गदर्शकांची, उस उत्पादक शेतकरी ह्यांची एक प्राथमिक बैठक आपण आयोजित केली आहे. 

 

सतीश देशमुख, B.E. (Mech) पुणे (9881495518) अध्यक्ष, "फोरम ऑफ़ इंटलेकच्युअल्स".

 

साहेबराव खामकर 

संस्थापक-अध्यक्ष, नवदीप सोशल फाउंडेशन, हडपसर, पुणे 

(मा. प्र.कार्यकारी संचालक 

प्रतापगड सह.साखर साखर कारखाना लि; जि.सातारा/यशवंत सह.साखर कारखाना लि; थेऊर जि.पुणे)

English Summary: The current challenges facing the sugar industry will be discussed
Published on: 18 March 2022, 11:19 IST