Agripedia

रब्बी हंगामातील पिकांची काढणी केल्यानंतर जर सिंचनाखाली मूग आणि उडीद या पिकाची लागवड केली तर शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. अतिशय अल्प उपलब्ध पाण्यामध्ये या पिकाचे उत्पादन घेता येते व हे पिके 70 ते 80 दिवसांमध्ये काढणीला येतात.

Updated on 02 February, 2022 2:52 PM IST

रब्बी हंगामातील पिकांची काढणी केल्यानंतर जर सिंचनाखाली मूग आणि उडीद या पिकाची लागवड केली तर शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. अतिशय अल्प उपलब्ध पाण्यामध्ये या पिकाचे उत्पादन घेता येते व हे पिके 70 ते 80 दिवसांमध्ये काढणीला येतात.

त्यामुळे कमी खर्चात आणि उपलब्ध पाण्यामध्ये चांगले उत्पादन आत येऊ शकते.या लेखामध्ये उन्हाळी मूग आणि उडीद लागवड पद्धत समजावून घेणार आहोत.

 उन्हाळी मूग आणि उडीद लागवड

  • जमीन- या पिकासाठी मध्यम तसेच भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्‍यक आहे.
  • लागवडीआधी पूर्वमशागत- रब्बी हंगामातील पिकांची काढणी केल्यानंतर वखराच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी व कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. त्यानंतर हेक्‍टरी पाच टन  कुजलेले चांगली शेणखत टाकावे.
  • पेरणीची योग्य वेळ- उन्हाळी मुगाची पेरणी फेब्रुवारी अखेर ते मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करता येते. पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर तीस सेंटिमीटर व दोन रोपांमधील अंतर दहा सेंटिमीटर असावे. तसेच पेरणी केल्यानंतर पिकाला पाणी देता यावी यासाठी चार ते पाच मीटर रुंदीचे सारे ओढून घ्यावी.
  • पेरणी साठी लागणारे बियाण्याचे प्रमाण-हेक्‍टरी 15 ते 20 किलो बियाणे लागते.
  • पेरणी करणे अगोदर बीजप्रक्रिया- उडीद आणि मूग  पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी पेरणी करणे अगोदर प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मभुकटीलावावी. त्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धकगुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून बियाण्यावर लावावेत. सावलीमध्ये बियाणे वाळल्यानंतर त्याची पेरणी करावी. रायझोबियम मुळे मुळांवरील गाठींची प्रमाण वाढून नत्राची उपलब्धता वाढण्यास मदत होते.
  • पेरणी- पेरणीपूर्वी पाणी देऊन रान वाफशावर आल्यानंतर पेरणी करावी.
  • द्यायची खतमात्रा- या पिकांना 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी द्यावे. जर पेरणी करताना रासायनिक खते ही चांगल्या कुजलेल्या शेणखताचा सोबत मिसळून बियाणे जवळ पेरणी केली तर पिकांच्या वाढीसाठी याचा खूप फायदा होतो.
  • आंतरमशागत- पिकाच्या पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांत पहिली कोळपणी करावी. पहिल्या कोळपणी नंतर दहा ते पंधरा दिवसांनी दुसरी कोळपणी करावी.  कोळपणी नंतर  खुरपणी करून तण विरहित ठेवावे. पिके सुरूवातीची 40 ते 45 दिवस तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढीसाठी मदत होते.
  • पाणी व्यवस्थापन- पेरणीनंतर आठ ते दहा दिवसांनी पहिली पाण्याची पाळी द्यावी. पिकाच्या संपूर्ण कालावधीत एकूण पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या पुरेशा होतात. जवाब पीक फुलोरा मध्ये असते किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेत असते तेव्हा पाण्याचा ताण पडू देऊ नये.
  • काढणी- मुगाच्या शेंगा 75% वाळल्यानंतर पहिली तोडणी करावी. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात.उडीद पिकाची कापणी करून खळ्यावर आणून त्याचे मळणी करावी. उडदाच्या शेंगा तोडण्याची गरज भासत नाही.उडीद आणि मूग ची साठवण करण्यापूर्वी चार ते पाच दिवस चांगले उन्हात वाळवून घ्यावे. नंतर ते पोत्यात कोठीत टाकतांना त्यामध्ये कडुनिंबाचा पाला आवश्य मिसळावा कारण साठवणुकीतील किडींपासून त्याचा बचाव होतो.
  • उत्पादन- मूग आणि उडीदाचे जातीनुसार उत्पादनाचा विचार केला तर प्रति हेक्‍टरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन मिळू शकते.
English Summary: the cultivation technology in green gram and udaad cultivation in summer
Published on: 02 February 2022, 02:52 IST