Agripedia

उन्हाळ्यामध्ये बाजरी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. संरक्षित पाण्याची सोय असल्यास बाजरीपासून चांगले उत्पादन मिळवणे शक्यो होते. त्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करावे.खरीप हंगामातील बाजरी पिकापासून येणाऱ्या उत्पादनापेक्षा उन्हाळी बाजरी लागवडीच्या माध्यमातून चांगले उत्पादन मिळते. या लेखात आपण उन्हाळी बाजरी लागवड विषयी माहिती घेऊ.

Updated on 05 December, 2021 3:08 PM IST

उन्हाळ्यामध्ये बाजरी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. संरक्षित पाण्याची सोय असल्यास बाजरीपासून चांगले उत्पादन मिळवणे शक्‍य होते. त्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करावे.खरीप हंगामातील बाजरी पिकापासून येणाऱ्या उत्पादनापेक्षा उन्हाळी बाजरी  लागवडीच्या माध्यमातून चांगले उत्पादन मिळते. या लेखात आपण उन्हाळी बाजरी लागवड विषयी माहिती घेऊ.

 उन्हाळी बाजरी लागवड तंत्रज्ञान

 जमिनीची निवड

1-उन्हाळी बाजरी साठी शक्यतो सपाट, मध्यम आणि भारी व 6.2 ते आठ सामू असणारी जमीन निवडावी.

2-  बाजरीची लागवड करण्यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. दुसरी पाळी देण्या अगोदर चांगले कुजलेले चार ते पाच टन हेक्‍टरी शेणखत वापरावे.जमीन भारी असल्यास ओलावा जास्त काळ टिकून राहतो.

बाजरीचे संकरित वाण

 उन्हाळी बाजरी फुलोरा येण्याच्या कालावधीमध्ये वाऱ्याचा वेग व तापमान जास्त असल्याने काही वानांमध्ये परागीकरणला अडचण येते. कणसात दाणे कमी भरतात. श्रद्धा, सबुरी असे अधिक उत्पादन देणारे तसेच केसाळ प्रकारातील अतिशय घट्ट कणिसअसणारे वाण निवडल्यास पक्षांचा त्रासही कमी होतो.

 सुधारित वाण- आयसीटीपी 8203, डब्ल्यू सी सी 75 इत्यादी वाण  लागवडीसाठी उपयुक्त आहेत.

 लागवड पद्धत

  • संकरित बाजरीचे प्रमाणित बियाणे हेक्‍टरी चार ते पाच किलो वापरावे. बाजरीची पेरणी करण्यापूर्वी प्रति दहा ते पंधरा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोस्पिरीलम या जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी.
  • शेतचांगले ओलूनघ्यावे व वाफसा आल्यावर पेरणी करावी.
  • पेरणी करताना तीन ते चार सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल करू नये.
  • उन्हाळी बाजरीची पेरणी जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ते फेब्रुवारी या दुसऱ्या पंधरवड्यात केल्यास फायदेशीर ठरते.
  • पेरणीस उशीर झाल्यास पीक जात किंवा वाना प्रमाणे 50 ते 55 दिवसांनी फुलोऱ्यात येते. आशा वेळी तापमान 42 अंश सेंटिग्रेड पेक्षा अधिक असल्यास परागकण मरतात व उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.

 लागवडीचे अंतर

 उन्हाळी बाजरी करताना दोन ओळींतील अंतर 30 ते 40 सेंटीमीटर व दोन रोपांतील अंतर 10 ते 15 सेंटी मीटर ठेवावे.  नंतर गरजेप्रमाणे विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावे.

 उन्हाळी बाजरीचे खत व्यवस्थापन

 माती परीक्षण करून प्रति हेक्‍टरी 60 किलो नत्रव 30 किलो स्फुरद द्यावे.या मधील अर्धे नत्र पेरणीच्या वेळीव संपूर्ण स्फुरद, उर्वरित नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे. तसेच पेरणीनंतर बाजरीचे शेत पहिले 30 ते 35 दिवसतणविरहित ठेवावे.

 पाणी व्यवस्थापन

  • जमिनीचा पोत नुसार 10 ते 15 दिवसांनी पाणी द्यावे.
  • पहिले पाणी 20 ते 25 दिवसांनंतर फुटवे येण्याच्या वेळी द्यावे.
  • दुसरे पाणी 30 ते 45 दिवसांनी पीक पोटरीत असताना द्यावे.
  • दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी कणसात जेव्हा दाणे भरतात तेव्हा द्यावे.
  • पाण्याची दुसरी पाळी अगोदर पिकास हलकीशी भर दिल्यास जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते व पीक जास्त वाऱ्यावर लोळत नाही.

 उन्हाळी बाजरीचे उत्पादन

 उन्हाळी बाजरीची हेक्‍टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवल्यास व योग्य वाणांची निवड केल्यास संकरित बाजरी उत्पादन हेक्‍टरी 35 ते 40 क्विंटलपर्यंत मिळते आणि बाजरी चा चारा देखील जनावरांना चांगला मानवतो.

English Summary: the cultivation process of millet crop in summer condition and management
Published on: 05 December 2021, 03:08 IST