प्रत्येक पिकाच्या जाती आपल्याला माहित आहेत. परंतु काही पिकांमध्ये बऱ्याच प्रमाणात दुर्मिळ अशा देखील जाती आहेत. जे प्रत्येकाला माहीत आहेतच असे नाही. बऱ्याच प्रमाणात दुर्मिळ असलेल्या या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
परंतु अशा जातींची लागवड आजही आर्थिक दृष्ट्या फायद्याचे ठरते. आपण काळा गहू, काळी हळद इत्यादी पिकाबद्दल ऐकली असेलच. परंतु काळा मका देखील असतो. तर आपण या लेखामध्ये काळा मक्या बद्दल व त्याच्या लागवड हंगामा बद्दल माहिती घेणार आहोत.
बारमाही करता येते काळा मक्याची लागवड
महाराष्ट्र मध्ये मका मोठ्या प्रमाणात लावला जातो. जास्त करून महाराष्ट्राचा विचार केला तर रब्बी हंगामामध्ये मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु रब्बी हंगामातमक्याचे पीक घेत असताना खूप काटेकोरपणे नियोजन करावे लागते नाहीतर मक्याचे कणीस उन्हाळ्यात पूर्णपणे न भरता अर्धवट अवस्थेत भरते. पण काळा मक्याचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यात देखील याचे कनिस पूर्णपणे भरते. त्यामुळे काळा मक्याचे उत्पादन घेणे फायद्याचे ठरते. मक्याचे तांबडे आणि पांढरा दोन प्रकार देखील असून त्यांच्या उत्पादनाला बऱ्यापैकी मर्यादा आहेत. परंतु या तुलनेमध्ये काळा मका बारा महिने देखील चांगले उत्पादन देते. काळा मक्याचे उत्पादन तांबडे आणि पांढऱ्या मक्या पेक्षा चार ते पाच क्विंटल जास्त निघते. याचे वैशिष्ट्य म्हणजे याला पाण्याची गरज इतर प्रकारच्या मक्याच्या तुलनेत कमी लागते.
जनावरांना चारा म्हणून खूपच फायदेशीर
काळा मका आहे जनावरांसाठी अगदी पौष्टिक असे खाद्य आहे. जनावरांना काळा मका खाऊ घातल्यास त्यांच्या दुधामध्ये एक ते दोन लिटरने वाढ होते. त्यामुळे पशुपालन करत असलेल्या शेतकऱ्यांनी एखाद्या पिकात आंतरपीक म्हणून देखील या पिकाची लागवड केली तर फायद्याचे ठरू शकते. जनावरांसाठी याचा चारा खूप पौष्टिक असतो. भारतात प्रामुख्याने ओरिसामध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. परंतु महाराष्ट्रामध्ये काळा मका हे खूप दुर्मिळ असे पीक असून त्याची लागवड होणे गरजेचे आहे. त्याचे बियाणे खूपच दुर्मिळ होत चालले असून लवकरच नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. जर हे बियाणे जिवंत ठेवायचे असेल तर याची लागवड वाढवणे गरजेचे आहे. अगोदर मक्याचा वापर आहारात भाकर च्या स्वरूपात केला जायचा. परंतु कालांतराने मक्याची भाकर आहारातून गायब झाली. परंतु मका हा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असून मका मध्ये कॅल्शियम, मिनरल्स, आयरन आणि प्रोटिन खूप जास्त प्रमाणात उपलब्ध असते. काळा मक्याची लागवड उन्हाळी हंगामात केली तरीही चालते. चांगल्या प्रतीचे दोन कनसे या मक्याला येतात.
साडे चार महिन्यात काढणीला येत असून एकरी 50 ते 60 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. पांढऱ्या आणि तांबड्या मक्याच्या याचे उत्पादन जास्त मिळते. त्यामुळे मक्याची लागवड बारमाही हंगामात केव्हाही करता येते.(स्त्रोत-किसानराज)
महत्वाच्या बातम्या
Published on: 30 April 2022, 08:26 IST