भारतात तीन हंगामात शेती केली जाते. पावसाळी म्हणजे खरीप हंगाम, उशिरा खरीप हंगाम म्हणजे रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगाम. या तीनही हंगामात आपल्याकडे शेती व्यवसाय केला जातो. मात्र असे असले तरी भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित असल्याने अनेक ठिकाणी उन्हाळी हंगामात शेती नजरेस पडत नाही.
मित्रांनो आपल्या देशात रब्बी हंगामात वेगवेगळ्या पिकांची लागवड केली जाते मात्र गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. संपूर्ण जगात भारत हा गव्हाचा दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे आणि निश्चितच ही आपल्या देशासाठी एक अभिमानास्पद बाब आहे.
देशातील लोकसंख्या ते दिवसेंदिवस वाढत असल्याने गव्हाची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक आपले मत व्यक्त करतात. यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न देखील केले जातं आहेत शिवाय सर्व देशवासीयांना चांगले धान्य मिळावे, यासाठी अनेक तंत्रांचा वापर करून आता शेती व्यवसाय केला जाऊ लागला आहे.
कृषी तज्ञांच्या मते, इतर पिकांप्रमाणेच गव्हाच्या सुधारित जातीची निवड केल्यास गव्हाच्या पिकातून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते, त्यामुळे जास्तीत जास्त नफाही मिळवता येतो. यामुळे आज आपण गव्हाच्या सुधारित जातींबद्दल सविस्तर माहिती जाणुन घेणार आहोत.
HI 8759 (पुसा तेजस)
पुसा तेजस ही गव्हाची एक सुधारित जातं आहे. ही वाण उच्च उत्पन्न देणारी सुधारित जातं असल्याचा दावा केला जातो. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, पुसा तेजस ही जात भारतीय कृषी संशोधन परिषद, इंदूरने विकसित केलेली गव्हाची एक सुधारित आणि उच्च उत्पन्न देणारी जात आहे. गव्हाची ही जातं जास्तीत जास्त 55 ते 65 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो. या गव्हाच्या जातीला चार ते पाच वेळा पाणी द्यावे लागते. गव्हाची हे सुधारित वाण 120 ते 125 दिवसांत काढणीसाठी तयार होत असते. या जातीचा वापर पास्ता, ब्रेड आणि लापशी यासारख्या गोष्टी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
करण वंदना
मित्रांनो करण वंदना ही देखील गव्हाची एक सुधारित जात आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या गव्हाच्या सुधारित जातीला DBW-187 असे म्हणूनही ओळखले जाते. गव्हाचे हे वाण उत्पादनाच्या दृष्टीने देखील सर्वोत्तम मानले जाते. या जातीला तांबेरा आणि ब्लास्ट यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतं नसल्याचे सांगितलं जाते. गव्हाची ही सुधारित जात मात्र 120 दिवसांत काढणीसाठी तयार होत असल्याचा दावा केला जातो. या जातींचे प्रति हेक्टरी उत्पादन सुमारे 75 क्विंटलच्या आसपास असते. या सुधारित जातीची वैशिष्ट्ये पाहता ही जात शेतकरी बांधवांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते आणि निश्चितच गहू उत्पादक शेतकरी यापासून चांगला बक्कळ नफा कमवू शकतात.
करण नरेंद्र
करण नरेंद्र ही देखील गव्हाची एक सुधारित आणि नवीन जात आहे. गव्हाच्या या सुधारित जातीला DBW-222 या नावाने देखील ओळखले जाते. गव्हाची ही जातं 2019 मध्ये शास्त्रज्ञांनी विकसित केली होती म्हणजेच अजूनही ही जातं नवीनच आहे. करण नरेंद्र ही गव्हाची सुधारित जात 140 दिवसात उत्पादन देण्यास तयार होत असल्याचा दावा केला जातो. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कमी पाण्यातही यापासून जास्तीत जास्त उत्पादन सहजरीत्या प्राप्त करता येते. या जातीच्या रोपाची लांबी सुमारे 1 मीटर पर्यंत असू शकते. शिवाय या जातीच्या गव्हापासून चांगल्या चपात्या बनत असतात आणि खाण्यास देखील चविष्ट असतात यामुळे याची मागणी देखील बाजारात अधिक असते. या जातीचे सरसरी उत्पादन 65 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत असल्याचा दावा केला जातो.
Published on: 15 May 2022, 10:43 IST