गवारे तसे बहुउपयोगी पीक आहे परंतु आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळते. गवार पिक हे द्विदल वर्गातील आणि कोरडवाहू भागात येणारे पीक असल्यामुळे अगदी कमी पाण्यात देखील चांगले उत्पादन येते.
हे पीक काटक, खोल सोटमूळ असणारे खरीप हंगामात वाढणारे प्रमुख पीक आहे. या पिकाची लागवड वेगवेगळ्या उद्देशाने करण्यात येते जसे की, हिरव्या शेंगा साठी,जनावरांचे खाद्य तयार करण्यासाठी तसेच हिरवळीचे खत तयार करण्यासाठी, गवार गम करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या करण्यासाठी याची लागवड करतात. या पिकापासून गवारगम तयार होत असल्याने या पिकाला नगदी पीक असे संबोधण्यात येते. या गवार गमचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्यप्रसाधने, कागदाचे कारखाने तसेच कापड उद्योग आणि पौष्टिक पदार्थ तयार करण्याच्या कंपन्यांमध्ये करण्यात येतो. गव्हाच्या जाती मध्ये भाजीपाला पीक म्हणून घेण्यात येणार्या जातीया बुटके आणि शेंगामऊअसणाऱ्या असतात तर जनावरांच्या खाद्यासाठी देण्यात येणाऱ्या जाती प्रामुख्याने केसाळ प्रकारचे असतात. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी भाजीपाला पीक म्हणून घेण्यासाठी काही सुधारित जाती विकसित केल्या आहेत. याची माहिती या लेखात करून घेऊ.
गवारच्या या आहेत सुधारित जाती
- फुले गवार- गवार पिकाचा हावान 2016 मध्ये स्थानिक जातींच्या संग्रह मधून निवड पद्धतीने विकसित केला असून पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केला आहे. या वाणाच्या शेंगा फिकट हिरव्या रंगाच्या असून, मध्यम लांबीच्या तसेच चवीला अत्यंत चवदार आहेत. हा वाण खरीप आणि उन्हाळी हंगामात लागवडीसाठी शिफारस केला आहे. या वाहनापासून हिरवे शेंगांचे उत्पादन 90 ते 100 क्विंटल हेक्टरी खरीप हंगामात आणि 120 ते 130 क्विंटल हेक्टरी उन्हाळी हंगामात मिळते.
- पुसा दोमोसमी- ही सुधारित जात खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. उशिरा येणारी आणि भरपूर फांद्या असणारी ही जात आहे. लागवडीपासून 75 ते 80 दिवसांत तोडणीस येते. शेंगांचा भाग-2 असून फिकट हिरव्या रंगाच्या शेंगांची लांबी दहा ते बारा सेंटीमीटर असते.
- पुसा सदाबहार- या सुधारित जातींची शिफारस खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी करण्यात आली आहे.या जातीची झाडे सरळ आणि बिगर फांदयाची असतात.
- या जातीच्या शेंगा हिरव्या रंगाच्या असून 12 ते 13 सेंटिमीटर लांब असतात.
- पुसा नवबहार- या जातीच्या झाडांच्या फांद्या येत नाहीत आणि शेंगांचे गुणवत्ता पुसा दोमोसमीया जाती प्रमाणे असते. ही जात पुसादोमोसमीआणि पुसा सदाबहार यांच्या संकरातून निर्माण केली आहे.
- शरद बहार- ही सुधारित जात एनबीपीजीआर नवी दिल्ली येथून विकसित करण्यात आली आहे. या जातीच्या झाडांना भरपूर फांद्या असतात म्हणजेच प्रति झाड 12 ते 14 फांद्या असतात. या जातीच्या एका झाडापासून 133 शेंगा मिळतात.
Published on: 30 January 2022, 06:53 IST