Agripedia

पान कोबी हे कोबीवर्गीय पीक आहे. हे पीक थंड हवामानात येणारी असून या पिकाची लागवड सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात करतात. सर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये याची लागवड केली जाते. पान कोबी या पिकामध्ये अ व क ही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर असून ही भाजी आरोग्यासाठी उपयुक्त आहे.या लेखात आपण कोबीच्या काही फायदेशीर वानांबद्दल जाणून घेणार आहोत.

Updated on 10 December, 2021 11:43 AM IST

 पान कोबी हे कोबीवर्गीय पीक आहे. हे पीक थंड हवामानात येणारी असून या पिकाची लागवड सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात करतात. सर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये याची लागवड केली जाते. पान कोबी या पिकामध्ये अ व क ही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर असून ही भाजी आरोग्यासाठी उपयुक्त आहे.या लेखात आपण कोबीच्या काही फायदेशीर वानांबद्दल जाणून घेणार आहोत.

कोबीचे वाण

 पानकोबी च्या जातीचे हळव्या व गरव्या  अशा दोन प्रकार आहेत. ह्या लेखात आपण कोबीच्या हळव्या जातींबद्दल जाणून घेऊ.

  • गोल्डन एकर- गोल्डन एकर जातीचे गड्डे लहान, गोलाकार आणि एक ते दीड किलो ग्रॅम वजनाचे असतात. गोल्डन एकर लावल्यानंतर 70 ते 80 दिवसांनी काढण्यासाठी तयार होते.या जातीच्या कोबीला बाहेर पानेथोडे असतात. गड्डे तयार झाल्यानंतर काढण्याचे काम दहा दिवसांच्याआतसंपवावे.
  • प्राइड ऑफ इंडिया- या जातीचे गड्डे गोल्डन एकर जातीच्या गड्ड्यायापेक्षा एक आठवडा उशिराने तयार होतात. या जातीच्या गड्ड्याची सरासरी वजन दीड ते दोन किलो भरते. या जातीच्या गड्याचा आकार गोल्डन एकर पेक्षा थोडा मोठा असतो.
  • कोपन हेगन मार्केट- या जातीमधून गोल्डन एकर या जातीची निवड केल्यामुळे या जातीची लागवड सध्या फार कमी प्रमाणात केली जाते. या जातीचे गड्डे दोन ते अडीच किलो वजनाची असतात.
  • हरीराणी गोल- ही जात महिको या कंपनीने विकसित केली असून ती पेरणीपासून साधारणपणे 95 दिवसांत काढणीस तयार होते. या जातीची पाने निळसर हिरव्या रंगाची असतात. या जातीचे गड्डे सरासरी 1.92 किलो वजनाचे असतात. ही जात पिवळी आणि काळी सड या रोगांना प्रतिकारक्षम आहे. या जातीचे उत्पादन प्रति हेक्‍टरी 56 ते 60 टन इतके असते.
  • एक्सप्रेस- या जातीचे गुणधर्म गोल्डन एकर या जाती प्रमाणेच आहेत. परंतु गड्डे जरासे लवकर काढणीस येतात.
  • श्री गणेश गोल्ड- कोबीचे ही संकरित जात महिको या कंपनीने विकसित केलेली असून या जातीचे पाणी निळसर हिरव्या रंगाची आहेत.हेगडे बी पेरल्यापासून 90 ते 95 दिवसात काढणीसाठी तयार होतात.
  • या जातीचे गड्डे सरासरी अडीच किलो वजनाची असतात. या जातीपासून प्रति हेक्‍टरी 75 ते 87 टन उत्पादन मिळते.
  • कावेरी- ही संकरित जात इंडो अमेरिकन हायब्रीड सीड्स या कंपनीने विकसित केलेली आहे. या जातीचे गड्डे रोपांची लावणी केल्यापासून 65 दिवसात काढणीला तयार होतात. या जातीचे गड्डे घट्ट चपटे गोलाकार असतात व त्यांचे वजन दोन किलो असते. पानकोबी जी ही जात उष्ण तापमान सहन करणारे असल्याने  याची लागवड उन्हाळ्यात देखील करता येते.
  • क्रांती- ही जात महिको ने विकसित केली असून बियांच्या पेरणीपासून 93 दिवसात या जातीचे गड्डे  काढणीला तयार होतात. गड्डे गोलाकार असून एक किलो वजनाचे असतात. या जातीचे उत्पादन प्रति हेक्‍टरी 50 ते 55 टन मिळते.
English Summary: the benificial veriety of cauliflower crop those get more profit
Published on: 10 December 2021, 11:43 IST